Ajit Pawar on Pune Lockdown | पर्यटकांची गर्दी वाढली, पुण्यात विकेंड लॉकडाऊन; अजित पवारांची घोषणा

| Updated on: Jun 19, 2021 | 2:38 PM

कोरोनाचा उद्रेक पाहता पुण्यात वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. शनिवारी आणि रविवारी पुण्यात वीकेंड लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व काही बंद राहणार आहे.

Follow us on

कोरोनाचा उद्रेक पाहता पुण्यात वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लागू करण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला. शनिवारी आणि रविवारी पुण्यात वीकेंड लॉकडाऊन असेल. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व काही बंद राहणार आहे. वाढती गर्दी पाहता प्रशासनानं हा निर्णय घेतल्याची माहिती, भाजप खासदार गिरीश बापट यांनी दिली. गिरीश बापट यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना पुण्यातील वीकेंड लाकडाऊनची माहिती दिली.

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी नियोजन सुरु आहे. कोरोनाचं प्रमाण जरी कमी असलं तरी विदेशात आलेली तिसरी लाट पाहून खबरदारी म्हणून आतापासून नियोजन सुरु आहे. शनिवारी आणि रविवारी नियम लाग होतील. तिसऱ्या लाटेत स्मशानभूमी, कोव्हीड हॉस्पिटल्स अपग्रेड करायची आहेत, असं गिरीश बापट म्हणाले.