‘भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी’, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा

‘भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी’, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा

| Updated on: Mar 28, 2025 | 5:42 PM

टीव्ही९ नेटवर्कच्या 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' या कार्यक्रमाच्या भव्य मंचावरून पंतप्रधान मोदींनी टीव्ही९ चे कौतुक केले. ते म्हणाले, मी तुमच्या नेटवर्कला आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देतो आणि या शिखर परिषदेसाठी तुमचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मोदी आपल्या संबोधनाच्या सुरूवातीला म्हणाले, आयएमएफचे नवीन आकडे समोर आले आहेत. ते आकडेच सांगतात की, भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी आहे. ज्यांनी १० वर्षात आपल्या जीडीपीला डबल केलं आहे. मागच्या दशकात भारताने २ लाख कोटी डॉलर आपल्या इकोनॉमीत जोडले आहेत. जीडीपी डबल होणं म्हणजे केवळ आकडे बदलणे नाही. त्याचा इम्पॅक्ट पाहा. २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. आणि हे २५ कोटी लोक एक न्यूओ मिडल क्लासचा हिस्सा झाले. हा न्यूओ मिडल क्लास नवीन आयुष्य सुरू करत आहे.

यासह मोदी पुढे असेही म्हणाले की, आपण नव्या स्वप्नांना घेऊन जात आहे. आपल्या इकोनॉमीत योगदान देत आहे. त्याला व्हायब्रंट करत आहे. जगातील सर्वात जास्त तरुण आपल्या देशात आहे. हे तरुण स्किल्ड होत आहे. इनोव्हेशनला गती देत आहे. त्यामध्ये भारताच्या फॉरेन पॉलिसीचा मंत्र झाला इंडिया फर्स्ट. एकेकाळी भारताची पॉलिसी होती, सर्वांपासून समान अंतराव राहण्याची. आजच्या भारताची पॉलिसी आहे सर्वांसोबत जवळ जाऊन चला. सर्वांना सोबत घेऊन चला. जगातील देश भारताची ओपिनियन, भारताचे इनोव्हेशन आणि भारताच्या एफर्टला महत्त्व आज देत आहेत. तसं पूर्वी कधीच झालं नाही. आज जगाची नजर भारतावर असल्याचे मोदींनी म्हटले.

Published on: Mar 28, 2025 05:41 PM