EP2: Bas Evdhach Swapn | काय आहे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बजेटकडून अपेक्षा | Money9

| Updated on: Jan 28, 2022 | 4:36 PM

यंदा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर कर्ज, शेती क्षेत्रासाठी नवतंत्रज्ञान, कृषी पायाभूत सुविधा, वेगवेगळी पिके, यूरिया वरील अवलंबित्व कमी करणे या सारख्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

Follow us on

YouTube video player

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला (Agriculture) मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं जाहीर केलं होतं. अर्थमंत्री आता 2022 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. जेणेकरून शेती क्षेत्रावर त्याचा चांगला परिणाम होईल. किमान आधारभूत किंमतीमध्ये होणारी वाढ आणि कृषी कायदे मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडून वाढलेल्या आहेत. यंदा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर कर्ज, शेती क्षेत्रासाठी नवतंत्रज्ञान, कृषी पायाभूत सुविधा, वेगवेगळी पिके, यूरिया वरील अवलंबित्व कमी करणे या सारख्या मुद्द्यावर निर्णय होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.