कुठं-कुठं दोन्ही NCP एकत्र अन् कुठं स्वबळाचा नारा? अजित पवारांनी निवडणूक रणनितीच सांगितली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यामध्ये अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केले. अजित पवार म्हणाले, सध्या त्यांच्या पक्षाने फक्त दोन महापालिकांमध्ये एकत्र आहोत आणि इतर ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जाईल.
राज्यभरातील महापालिका निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय वर्तुळातील राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या तोफा देखील धडाडतांना दिसताय. अशातच राजकीय बड्या नेत्यांचे विधानं जोर धरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यामध्ये अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केले. अजित पवार म्हणाले, सध्या त्यांच्या पक्षाने फक्त दोन महापालिकांमध्ये एकत्र आहोत आणि इतर ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यांच्या मते, प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात विविध परिस्थिती आणि राजकीय गरजांनुसार निर्णय घेतले जात आहेत.
तर सुनील तटकरेंनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी भाष्य केले. यावेळी दादा स्पष्टच बोलले, ज्या गोष्टी ठरवल्याच नाही त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, आम्ही फक्त स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी एकत्र आलो असल्याचे सांगत दोनच महानगरपालिकेमध्ये एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
