Special Report | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात व्हाईट दुबईची एन्ट्री

Special Report | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात ‘व्हाईट दुबई’ची एन्ट्री

| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 12:39 AM

नवाब मलिक यांनी यापूर्वी या प्रकरणातील काही व्हॉट्सअप चॅट उघड केले होते. त्यानंतर आता मलिक यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के. पी. गोसावीच्या काही ऑडिओ क्लिप्स जाहीर केल्या आहेत.

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स केस आणि आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधातील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. नवाब मलिक यांनी यापूर्वी या प्रकरणातील काही व्हॉट्सअप चॅट उघड केले होते. त्यानंतर आता मलिक यांनी या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के. पी. गोसावीच्या काही ऑडिओ क्लिप्स जाहीर केल्या आहेत. यात गोसावी एका अज्ञात व्यक्तीशी मोबाईलवर संभाषण करत आहे. मलिक यांनी यापूर्वी के. पी. गोसावीचे व्हॉट्स अप चॅट उघड केलं होतं. आता मलिकांनी जाहीर केलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मलिक यांनी गोसावीच्या एकूण 4 ऑडिओ क्लिप ट्विटरवर पोस्ट केल्या आहेत. त्यात के. पी. गोसावी हा एका अज्ञात व्यक्तीशी ड्रग्स प्रकरणाशी संबंधित संशयास्पद संवाद साधत असल्याचं ऐकायला मिळत आहे.