Devendra Fadnavis : अजितदादा की शिंदे? संवादात कोण चांगलं? फडणवीसांनी कसलाच विचार न करता थेट सांगितलं…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाबद्दल असो किंवा विरोधकांवर टीका करण्याबद्दल असो, त्यांच्या विधानांमुळे अनेकदा फडणवीस हे चर्चेत आलेले आहेत. आज त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंबद्दल काय म्हटलं?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही संवादात चांगले नाहीत, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकच चर्चांना उधाण आले आहे. एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोण चांगला संवाद साधतो असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘दोघीही संवाद साधण्यात चांगले नाहीत’, यानंतर एकच हशा पिकला. इतकंच नाहीतर देवेंद्र फडणवीस पुढे असेही म्हणाले, मला आशा आहे की, मी व्यक्त केलेल्या माझ्या मताबाबत त्यांना वाईट वाटणार नाही आणि ते मला माफ करतील.’
Published on: May 29, 2025 02:20 PM
