Special Report | ‘मंत्री असाल घरचे’, नीलम गोऱ्हे गुलाबराव पाटील यांच्यावर का संतापल्या?

| Updated on: Aug 19, 2022 | 12:05 AM

उपसभापती निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना आपण मंत्री असाल घरचे, अशा शब्दात फटकारलं आणि याच शब्दप्रयोगावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्षेप घेत, कामकाजातून तो शब्द काढण्याची मागणी केली. विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली

Follow us on

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये, चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. वाद एवढा वाढला की, उपसभापती निलम गोऱ्हेंनी(Neelam Gorhe) पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना(Gulabrao Patil) खडेबोल सुनावले. पण इथंच गुलाबराव पाटील आणि उपसभापतींमधला वाद शांत झाला नाही..खाली बसण्यास सांगितल्यावरही गुलाबराव पाटील बोलतच होते, त्यानंतर आपण मंत्री असाल घरचे, अशा शब्दात निलम गोऱ्हेंनी सुनावलं. हा वाद सुरु झाला, शिक्षकांच्या प्रश्नावरील चर्चेवरुन. शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रश्नाला उत्तर देत असताना, गुलाबराव पाटील खाली बसून कुजबुजत होते. त्यावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आक्षेप घेत, मंत्री दादागिरीची भाषा करत असल्याचं म्हटलं आणि वादाची ठिणगी पडली. यानंतर वाद टोकाला पोहोचला आणि उपसभापती निलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना आपण मंत्री असाल घरचे, अशा शब्दात फटकारलं आणि याच शब्दप्रयोगावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्षेप घेत, कामकाजातून तो शब्द काढण्याची मागणी केली. विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली. तर विधान सभेतही शाब्दिक चकमक झालीच.शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विषय मांडला, त्यावर नितेश राणेंनी आम्हाला विचारा म्हटलं.,आणि भास्कर जाधवांनी नितेश राणेंना फटकारलं. विधान परिषदेत पहिल्यांदाच खडसे आणि फडणवीसांमध्येही जुंपली. सचिवालयाचं मंत्रालय होणार का ? असा खोचक सवाल खडसेंनी केला. विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच खडसे-फडणवीसांमध्ये सामना झाला…त्यामुळं हा फक्त ट्रेलर आहे, यापुढेही बरंच काही बाकी आहे.