Special Report | शिवसेना, राष्ट्रवादीनंतर स्वाभिमानीतही फूट? रविकांत तुपकर पक्षावरच दावा ठोकणार?

| Updated on: Aug 05, 2023 | 9:10 AM

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वाभिमीनी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Follow us on

बुलढाणा, 5 ऑगस्ट 2023 | शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वाभिमीनी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे. राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर रविकांत तुपकर यांनी आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बुलढाण्यात शेतकरी मोर्चा काढला. पूरग्रस्त भागात जात शेतकऱ्यांची विचारपूस केली. पण शेट्टी यांच्या या दौऱ्याकडे रविकांत तुपकर फिरकलेच नाहीत. त्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर नाराज झालेल्या रविकांत तुपकर यांना भाजपने पक्षप्रवेशाची ऑफरही दिली आहे. रविकांत तुपकर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर दावा ठोकणार का? अशा चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. आधी शिवसेनेत फूट पडली, नंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आता स्वाभिमानीमध्ये देखील हेच होणार का? यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…