उन्हाची झळ तुळजाभवानीला बसू नये म्हणून आजही जपली जातेय ‘ही’ विशिष्ट प्रथा

| Updated on: Apr 01, 2023 | 7:55 PM

VIDEO | महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला चैत्र महिन्यात कडक उन्हाच्या झळा बसू नये म्हणून हाताने वारा घालण्याची प्रथा

Follow us on

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला चैत्र महिन्यात कडक उन्हाच्या झळा बसू नये आणि उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी हाताने पंखा घालण्यास सुरुवात केली आहे. तुळजाभवानी देवी ही सजीव असल्याची मान्यता असून जसे मनुष्याला उन्हाचा त्रास होतो तसा देवीला होऊ नये यासाठी कपाळी चंदनाचा लेप आणि हाताने पंखा घालण्याची प्रथा गेली अनेक वर्षांपासून सुरु आहे. तुळजापूर येथील पलंगे परिवाराला हा मान देण्यात आला आहे. 3 ते 7 एप्रिल दरम्यान तुळजाभवानी देवीची चैत्र यात्रा आहे. मातेच्या मंदिरात चैत्र पौर्णिमेची तयारी सुरु असून चैत्र ते मृग नक्षत्र पाऊसपडेपर्यंत दररोज अखंडपणे दुपारी 1 ते 4 या वेळेत हाताने पंखा घालण्यात येतो. यावेळी कोणत्याही इलेक्ट्रीक साधनांचा वापर आवर्जून टाळण्यात येतो.