Womens World Cup 2025 : भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स! आफ्रिकेला नमवलं अन् पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी

Womens World Cup 2025 : भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स! आफ्रिकेला नमवलं अन् पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी

| Updated on: Nov 03, 2025 | 10:40 AM

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या विश्वचषकात ऐतिहासिक विजय मिळवला. डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत भारतानं पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. पंतप्रधान मोदी, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेकांनी संघाचे कौतुक केले.

भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ 246 धावांवर सर्वबाद झाला.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा विजय संपादन केला. कर्णधार हरमनप्रीत कौर महिला विश्वचषक जिंकून देणारी पहिली भारतीय कर्णधार ठरली. या विजयाचे शिल्पकार शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा ठरल्या. शफालीने 87 धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या, तर दीप्तीने 58 धावा केल्या, पाच विकेट्स घेतल्या आणि एक रन आऊटही केले.

हा विजय भारतासाठी एक अभिमानास्पद क्षण असून, संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान मोदी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेकांनी संघाचे कौतुक केले आहे. खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या.

Published on: Nov 03, 2025 10:40 AM