रश्मी शुक्ला वर्दीतल्या RSS कार्यकर्ता, राऊतांच्या टीकेवर भाजपचा पलटवार, राऊत विदूषक रोज काहीतरी बडबड…

रश्मी शुक्ला वर्दीतल्या RSS कार्यकर्ता, राऊतांच्या टीकेवर भाजपचा पलटवार, राऊत विदूषक रोज काहीतरी बडबड…

| Updated on: Jan 10, 2026 | 1:18 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाष्य केलंय रश्मी शुक्ला ह्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या आहेत. शुक्लांचे पूर्ण कुटुंब भाजपसाठी काम करतात असं देखील राऊत म्हणाले, त्यामुळे त्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाष्य केलंय रश्मी शुक्ला ह्या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या आहेत. शुक्लांचे पूर्ण कुटुंब भाजपसाठी काम करतात असं देखील राऊत म्हणाले, त्यामुळे त्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही. यावर भाजप नेते अमित साटम यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बडबड करतो यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही. राऊतांना जास्त गांभीर्याने घेऊ नका असं साटम म्हणाले.

खोट्या गुन्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मीरा-भाईंदरच्या एका प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा हा अहवाल आहे. डीजीपी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या निवृत्तीच्या 5 दिवस आधी सरकारकडे हा अहवाल दिला आहे. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करा, अशी शिफारस या अहवालातून रश्मी शुक्ला केली आहे. त्याचबरोबर पोलीस उपयुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची शिफारस अहवालातून केली आहे.

मीरा-भाईंदरच्या एका प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना या गुन्ह्यात अडकवण्यासाठी संजय पांडेंनी दबाव आणला असा एक खुलासा चौकशी अहवालात करण्यात आला आहे. सरकारकडून या अहवालावर कारवाई केली जाते का? याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर कारवाई जर केली जाते तर ती कशापद्धतीने केली जाते याकडे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

Published on: Jan 10, 2026 01:09 PM