नाना पटोले ‘डॅशिंग लीडर’, पण… अंतर्गत धुसफूस, यशोमती ठाकुर यांची मोठी प्रतिक्रिया

नाना पटोले ‘डॅशिंग लीडर’, पण… अंतर्गत धुसफूस, यशोमती ठाकुर यांची मोठी प्रतिक्रिया

| Updated on: Feb 09, 2023 | 5:59 PM

एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाल्याचे दिसत आहे. यावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ आता अमरावतीच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही एक मोठं वक्तव्य केलं आहे.

सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे आता कठीण झालंय अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र पाठवले आहे. या आरोपांना नाना पटोले यांनीही उत्तर दिले आहे. एकमेकांवरील या आरोप प्रत्यारोपामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाल्याचे दिसत आहे. यावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पाठोपाठ आता अमरावतीच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनीही एक मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पटोले हे डॅशिंग लीडर आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार पाच वर्ष टिकले असते. नाना पटोले करारी आहेत. त्यांच्यामध्ये डेअरिंग आहे म्हणूनच ते तडकाफडकी निर्णय घेतात. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा त्याच तडफेने दिला. त्यामुळे आम्हाला दु:ख झालं होतं, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस लवकरच मिटेल, असेही त्यांनी सांगितले.

Published on: Feb 09, 2023 05:58 PM