शिवसेनेचं खच्चीकरण करायचं राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही काही नेत्यांची छुपी नीती : योगेश कदम

| Updated on: Jan 20, 2022 | 10:45 AM

मंडणगडमधील सत्तेच्या चाव्या आता अपक्ष उमदेवांरांच्या हाती गेल्या आहेत. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

Follow us on

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (Dapoli) आणि मंडणगड (Mandangad) नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी शिवसेनेनं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर दिली होती. दापोलीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पारड्यात मतदारांनी कौल दिला आहे. मात्र, तिथं राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्यात. तर, मंडणगडमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमदेवार पराभूत झाले असून शिवसेना बंडखोर उमेदवारांचं शहर विकास पॅनेलचे उमदेवार विजयी झाले आहेत. मंडणगडमधील सत्तेच्या चाव्या आता अपक्ष उमदेवांरांच्या हाती गेल्या आहेत. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पक्षाला घरचा आहेर दिला आहे. शिवसेना आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधताना मनातील सल बोलून दाखवली आहे. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती, असा गंभीर आरोप योगेश कदम यांनी केला आहे.