Palghar News : वाह.. डेरिंगची कमाल… फरफटत नेले, हल्ला केला तरीही ‘ती’ भिडली चोरट्यांना अन्…
एक आरोपी काजोलच्या धाडसी मुळे पोलिसांच्या ताब्यात आला आहे तर दुसऱ्याचा शोध सध्या पोलीस प्रशासनाकडून घेतला जात आहे. काजोलने केलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होते आहे. पोलिसांनी एक आरोपीला ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा तपास सुरू आहे.
आपल्या जीवाची परवा न करता पालघरच्या आदर्श नगर परिसरातील काजोल चौहान या तरुणीने या चोरट्याना भिडण्याचं धाडस केलं. काजोलने जोखीम घेत दोन पैकी एका चोरट्याला धरून ठेवलं. जर चोराला पकडलं नसतं तर दोन्ही चोरटे या घरांमधील लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले असते. सध्या दहा ते बारा लाखांचा सोन्याचा ऐवज चोरीला गेला असला तरी या चोरीत सामील असलेला एक चोरटा काजोलच्या धाडसामुळे ताब्यात आला आहे. या पकडलेल्या एका चोराकडून चोरी केलेल्या लाखों रुपयांचा सोन्याचा ऐवज ही पुन्हा मिळाला आहे. तर दुसरा चोरटा अंधाराचा फायदा घेऊन 10 ते 12 लाखांचा सोन्याचा ऐवज घेऊन पसार झाला आहे.
काजोल काल संध्याकाळी आपल्या पती सोबत केळवे येथे फिरायला गेली होती. रात्री 8 च्या सुमारास ते दोघे घरी परतले. यावेळी घरातून चोरटे चोरी करून पळून जात असताना काजोल थेट चोरट्यांशी भिडली. यावेळी त्यांनी तिच्यावर हल्ला केला फरफटत नेले मात्र काजोल घाबरली नाही. यावेळी चोराला एका हाताने पकडले तर दुसऱ्या हातात चोरट्याने केलेला मुद्देमाल पकडून ठेवला. बघा नेमकं काय घडलं?
