Pune Video : अश्लील चाळे करणाऱ्या तरूणाचे वडील म्हणाले, ‘लाज वाटते, त्याने लघुशंका सिग्नलवर नाही तर माझ्या…’

Pune Video : अश्लील चाळे करणाऱ्या तरूणाचे वडील म्हणाले, ‘लाज वाटते, त्याने लघुशंका सिग्नलवर नाही तर माझ्या…’

| Updated on: Mar 08, 2025 | 4:48 PM

पुण्यात सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. येरवडा परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यातील शास्त्रीनगर चौकात आज सकाळच्या वेळेला BMW कारमधील मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका तरुणाने भर चौकातच महिलेसमोर अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना समोर आली. या तरूणाच्या अश्लील चाळे करण्याचा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच या तरूणाचं नाव समोर आलं असून गौरव आहुजा असं या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणामुळे पुणे शहरात एकच संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अशातच पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. गौरव आहुजा याचे वडील मनोज आहुजा यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त करताना ‘गैरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते’, असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, मनोज आहुजा यांनी असेही म्हटले की, माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे, असल्याचे मनोज अहुजा यांनी म्हटलं असून गाडी माझ्या नावावर असल्याने पोलिसांनी मला ताब्यात घेतलं असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 08, 2025 04:48 PM