Yugendra Pawar : ‘आम्ही कुटुंब म्हणून एकत्रच, शेवटी रक्ताचं नातं आहे’, युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं

Yugendra Pawar : ‘आम्ही कुटुंब म्हणून एकत्रच, शेवटी रक्ताचं नातं आहे’, युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Apr 22, 2025 | 1:32 PM

Yugendra Pawar On Pawar Family Reunion : युगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस असल्याने सुनेत्रा पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं.

आम्ही कुटुंब म्हणून एकत्रच आहोत. रक्ताची नाती अशी तोडता येत नाही. राजकारणात विचार बदलू शकतात. कुटुंब तोडता येत नाही, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली आहे. आज युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांना प्रेमाने आलिंगन देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर युगेंद्र पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे विधान केलं आहे. ठाकरे कुटुंबाच्या युतीची चर्चा सध्या सुरू आहे. ते एकत्र आल्यावर काय होईल हे बघायला आवडेल असंही यावेळी युगेंद्र पवार यांनी म्हंटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात एकत्र येणार की नाही हा निर्णय पवारसाहेब आणि अजितदादांचा आहे. मात्र कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहे. रोहित पवार, मी आम्ही जुनीअर आहे. आमची भूमिका कायम सकारात्मकच असेल. पण शेवटी याबद्दल पवारसाहेब आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असंही यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी सांगितलं.

Published on: Apr 22, 2025 01:32 PM