युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा; पवार कुटुंबाचा जल्लोष!

युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा; पवार कुटुंबाचा जल्लोष!

| Updated on: Nov 30, 2025 | 5:52 PM

युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यानिमित्त पवार कुटुंब पुन्हा एकत्र आले. सुप्रिया सुळे यांनी मनसोक्त नृत्य केले, तर सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. प्रचारात व्यस्त असल्याने अजित पवार येऊ शकले नाहीत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार कुटुंब कौटुंबिक सोहळ्यांमध्ये एकत्र येते, हे या प्रसंगी पुन्हा अधोरेखित झाले.

युगेंद्र पवारांच्या विवाह सोहळ्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळाले. मोठ्या थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडत आहे. या समारंभात जय पवार, सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या मातोश्री आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

सुप्रिया सुळेंनी मनमुरादपणे नृत्याचा आनंद घेतला, तर सुनेत्रा पवारही सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही पवार कुटुंब अनेक कौटुंबिक सोहळ्यांना एकत्र आलेले दिसले आहे. युगेंद्र पवारांच्या साखरपुड्याला अजित पवार उपस्थित होते. मात्र, आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने ते विवाह सोहळ्याला येऊ शकले नाहीत. “आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं” असे म्हणत त्यांनी गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले. राजकीय मतभेद असले तरी, कौटुंबिक समारंभांमध्ये पवार कुटुंबीय नेहमीच एकत्र येतात, हे या सोहळ्याने पुन्हा दाखवून दिले. हे चित्र टीव्ही ९ मराठीवर पाहता आले.

Published on: Nov 30, 2025 05:52 PM