AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mango Damage : अगोदर अवकाळी आता वाढतं ऊन, आंबा उत्पादकांची उरली-सुरली आशाही मावळली..!

आतापर्यंत अवकाळी आणि ढगाळ वातावरणाचा आंबा फळबागांना धोका होता. यामुळे पहिल्या दोन हंगामातील उत्पादनावर परिणामही झाला आहे. हे कमी म्हणून की काय आता वाढत्या उन्हाचाही परिणाम या फळांच्या राजावर होत आहे. वाढत्या तापमनामुळे आंबा झाडातील पाण्याचे प्रमाण कमी होते तर यामुळे फळगळ व फळ फुटण्याचे प्रमाणही वाढते. म्हणजे यंदा आंबा बागा ह्या निसर्गाच्या लहरीपणातून उबदारच आल्या नाहीत.

Mango Damage : अगोदर अवकाळी आता वाढतं ऊन, आंबा उत्पादकांची उरली-सुरली आशाही मावळली..!
वाढत्या उन्हामुळे कोकणात आता फळगळतीचा धोका निर्माण झाला आहे. अवकाळीनंतर आता वाढत्या उन्हाचा धोका आहे.
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 3:25 PM
Share

सिंधुदुर्ग : आतापर्यंत अवकाळी आणि (Cloudy Climate) ढगाळ वातावरणाचा (Mango) आंबा फळबागांना धोका होता. यामुळे पहिल्या दोन हंगामातील उत्पादनावर परिणामही झाला आहे. हे कमी म्हणून की काय आता वाढत्या उन्हाचाही परिणाम या फळांच्या राजावर होत आहे. वाढत्या तापमनामुळे आंबा झाडातील पाण्याचे प्रमाण कमी होते तर यामुळे (Fruit Leakage) फळगळ व फळ फुटण्याचे प्रमाणही वाढते. म्हणजे यंदा आंबा बागा ह्या निसर्गाच्या लहरीपणातून उबदारच आल्या नाहीत. अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे हंगाम लांबणीवर तर पडलाच पण आता त्याचे परिणाम पाहवयास मिळत आहेत. अवकाळीमुळे 60 ते 65 टक्के आंब्याचे नुकसान झाले होते तर आता उरला-सुरला आंबा उन्हात होरपळणार असेच कोकणातले चित्र आहे. त्यामुळे आंबा उत्पादकांसाठी वेंगुर्ले येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सल्ला दिला असून त्याचा अवलंब केला तर उत्पादनात सुधारणा होऊ शकरणार आहे.

काय आहे वनस्पती शास्त्रज्ञांचा सल्ला ?

दरवर्षी फळधारणेच्या दरम्यान वातावरणात बदल हा ठरलेला आहे. यंदा मात्र, सर्वकाही नुकसानीचे होत आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार तेवढ्यात वाढत्या तापमानाचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय पुढील आठ दिवसात फळगळीत वाढ होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करीत अहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडास पाणी जास्तीत जास्त द्यावे व भर दुपारी आंबे काढणी व भरणी करू नये असा बागायतदारांना सल्ला वेंगुर्ले येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे वनस्पती शास्त्रज्ञ संजय चव्हाण यांनी दिला आहे.

वाढत्या तापमानात नेमके काय होते?

आतापर्यंत अवकाळी आणि गारपिटमुळे आंबा बागांचे नुकसान झाले होते. त्याचा थेट परिणाम पिकावर झाला नसल्याने शेतकऱ्यांना महागडी औषधे विकत घेऊन फवारणी कामेही केली मात्र, आता वाढत्या ऊनाचा थेट परिणाम फळावर होत आहे. वाढत्या ऊनामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आंबा फळगळ व फळे फुटण्याचे प्रकारात वाढ झाली आहे.या वाढत्या तापमानाचा फटका आंबा उत्पादनास बसणार असून येत्या आठ दिवसात फळगळीत वाढ होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करीत अहेत.सततच्या हवामानाच्या लहरी पणाचा सर्वाधिक फटका कोकणच्या आंबा व काजू बागायतदार याना बसला आहे.

अगोदर अवकाळी आता वाढते ऊन

आंबा बागांना मोहर लागताच अवकाळीची सुरु झालेली अवकृपा ही फळतोडणी होतानाही कायम होती. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च तर वाढलाच पण जवळपास 75 टक्के नुकसान झाले होते. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण जो काही खर्च केला आहे तो देखील यंदा पदरी पडणार अशी अवस्था आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून पारा थेट 40 अंश सेल्सिअसवर गेला आहे. वाढत्या तापमानामुळे आहे त्या फळांचीही गळती होऊ लागली आहे. त्यामुळे यंदा केवळ नुकसानीचा सामना आंबा उत्पादकांना करावा लागलेला आहे. आता तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील आंब्याची काढणी काही दिवसांवर येऊन ठेपली होती. मात्र, ऊनामुळे आपोआपच फळगळती होऊ लागली आहे.

संबंधित बातम्या :

Success Story : बिगर मोसमात कलिंगड लागवडीचे धाडस केले, व्यापारी थेट शेतकऱ्याच्या बांधावर आले

Crop Insurance : खरिपापूर्वीच पीकविमा योजनेचा निर्णय, केंद्राबरोबर की राज्याची स्वतंत्र यंत्रणा..!

Agricultural Pump : राज्य सरकारचा निर्णय अन् स्थानिक पातळीवर अंमलबजावणी, रब्बी पिकांना मिळणार का संजीवनी?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.