Video | शेतातील गोठ्याला आग, जनावरांसह साहित्य जळून शेतकऱ्याचं 25 लाखांच नुकसान

| Updated on: Mar 01, 2021 | 6:51 PM

पंढरीनाथ देवतळे यांचे या आगीमध्ये जवळपास 25 लाखांचे नुकसान झाले आहे. Wardha Hinganghat fire kajalsara

Follow us on

वर्धा: हिंगणघाट तालुक्यातील काजळसरा येथे शेतातील गोठ्याला आग लागली.या आगीत शेतकरी पंढरीनाथ देवतळे यांचे जवळपास 25 लाखांचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आलं नाही. पंढरीनाथ देवतळे यांच्या डोळ्यासमोर त्यांनी मोठ्या कष्टानं जमवलेलं साहित्य जळून खाक झालं ( Wardha Hinganghat fire borke at kajalsara village in farm of Pandharinath Devtale)

आगीत 25 लाखांचं नुकसान

पंढररीनाथ देवतळे यांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत  5 मोठे बैल ,2 गाय ,1 श्वान, 80 कोंबड्या ,20 क्विंटल हळद , ३० क्विंटल सोयाबीन १० बॅग यूरीया, तसेच सर्व शेतीचे सामान जळून खाक झाले.आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला.मात्र, आग इतकी भीषण होती की आगीने संपूर्ण गोठा काही क्षणातच भस्म केला. या आगीत शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं असून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

व्हिडीओ

Wardha Hinganghat fire borke at kajalsara village in farm of Pandharinath Devtale