1 एप्रिल 2023 पासून बीएस6 फेज 2 आणि आरडीई एमिशन नियम पाहता महिंद्रा कंपनीने बीएस6 फेज 1 मॉडेल्सवर मोठी सवलत दिली आहे. महिंद्रा थार, बोलेरो आणि एक्सयुव्ही 300 आता खरेदी केल्यास पैशांची बचत होणार आहे.
Mar 16, 2023 | 5:38 PM
महिंद्रा बोलेरो ही देशातील सर्वात लोकप्रिय गाडी आहे. कंपनीच्या पोर्टफोलियोमध्ये सर्वात विक्री होणारी कार आहे. जर तुम्हाला ही गाडी विकत घ्यायची असेल तर सवलतीचा फायदा घेऊ शकता. नवी बोलेरो एसयुव्ही खरेदीवर 60 हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. (Photo: Mahindra)
1 / 5
बोलेरोच्या डिस्काउंटबाबत सांगायचं तर, टॉप स्पेक बोलेरो बी6 (ओ) व्हेरियंटवर 15000 रुपयांची अॅक्सेसरीज आणि 45 हजार रुपयांची कॅश सूट मिळेल. एसयुव्हीच्या दुसऱ्या व्हेरियंटवर 22 हजारांपासून डिस्काउंट मिळेल. (Photo: Mahindra)
2 / 5
महिंद्रा एक्सयुव्ही 300 ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एसयुव्ही आहे. या एसयुव्हीला ग्लोबल एनसीएपी रेटिंगमध्ये 5 स्टार मिळाले आहेत. या एसयुव्हीवर 32 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. तर नुकतीच लाँच झालेल्या टर्बोस्पोर्ट मॉडेलवर 20 हजारांची बचत होईल. (Photo: Mahindra)
3 / 5
महिंद्रा थार 4X4 गाडीची लोकप्रियता अल्पावधीतच वाढली आहे. या गाडीवर 60 हजार रुपयांपर्यंत सूट मिळते. थार 4X4 पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटमध्ये आहे. दोन्ही व्हेरियंटवर चांगली बचत होऊ शकते. (Photo: Mahindra)
4 / 5
या गाडीच्या अॅक्सेसरीजमध्ये सीट कव्हर, ऑडियो एक्विपमेंट्स, ब्लॅक असेंट पीस, टोईंग स्ट्रॅप आणि रिकव्हरी ट्रॅक यांचा सहभाग आहे. त्यामुळे या सवलतीचा फायदा घेऊन पैशांची बचत करता येईल. (Photo: Mahindra)