Marathi News » Automobile » Great wall genesis proton geely and tesla planning to enter in indian auto market
Tesla पाठोपाठ 3 ऑटो कंपन्या भारताचं दार ठोठावणार, जाणून घ्या Great Wall, Genesis, Proton Geely चं प्लॅनिंग
गेल्या काही वर्षांत भारतीय कार बाजार झपाट्याने वाढला आहे. यादरम्यान किआ मोटर्सपासून ते एमजी मोटरपर्यंत अनेक नवीन ब्रँड्सनीही भारतीय वाहन बाजारात एंट्री घेतली आहे. त्यात आता आणखी काही ग्लोबल वाहन निर्मात्या कंपन्यांची भर पडणार आहे.
गेल्या काही वर्षांत भारतीय कार बाजार झपाट्याने वाढला आहे. यादरम्यान किआ मोटर्सपासून ते एमजी मोटरपर्यंत अनेक नवीन ब्रँड्सनीही भारतीय वाहन बाजारात एंट्री घेतली आहे. त्यात आता आणखी काही ग्लोबल वाहन निर्मात्या कंपन्यांची भर पडणार आहे. जागतिक स्तरावरील मोठे ब्रँड्स आता भारताचं दार ठोठावणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया नवीन कंपन्यांच्या भारतातील योजनांबद्दल.
1 / 5
ग्रेट वॉल मोटर्स (Great Wall Motors) ही ऑटो कंपनी भारतात आपली हवल सब्सिडरी लाँच करण्याची योजना आखत आहे. या कंपनीने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये Haval SUV सादर केली होती. Haval SUV चे F5, F7, F7x, H6 आणि H9 मॉडेल्स सध्या उपलब्ध आहेत.
2 / 5
टेस्ला : एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय बाजाराचे दरवाजे उघडण्याची वाट पाहात आहे. कंपनी शक्य तितक्या लवकर भारतीय कार बाजारात आपले वाहन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. नुकतीच माहिती समोर आली आहे की, कंपनी कर (टॅक्स) समस्येमुळे आपली कार लॉन्च करण्यास उशीर करत आहे आणि यासाठी कंपनी भारत सरकारशी सातत्याने चर्चा करत आहे.
3 / 5
जेनेसिस (Genesis) हा Hyundai चा लक्झरी व्हीकल डिव्हिजन आहे. वाढत्या लोकप्रियतेमुळे Hyundai हा विभाग भारतात सादर करणार आहे. Genesis G80 सेडान मॉडेल भारतात आयात केले जातील. मात्र, Hyundai ते कधी लॉन्च करणार हे अद्याप कळलेले नाही.
4 / 5
Proton Geely ही चिनी वाहन उत्पादक कंपनी आहे आणि लवकरच भारतीय कार बाजारात दार ठोठावणार आहे. गीली ही या ब्रँडची पॅरेंट कंपनी आहे. या कंपनीची Proton X 50 ही कार पुण्यात पाहायला मिळाली आहे.