सोनं, 24 कॅरेट शुद्ध असतानाही, दागिन्यांमध्ये ते का नाही वापरले जात? वाचा सविस्तर
सोनं खरेदी करणं ही आपल्या संस्कृतीतली परंपरा आहे, पण यामागे वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारणंही आहेत. 24 कॅरेटचं सोनं शुद्ध असलं, तरी दागिन्यांसाठी ते योग्य नाही, मग दागिने बनवताना किती कॅरेटच सोन वापरतात आणि 24 कॅरेटचं दागिन्यांसाठी का योग्य नाही ? वाचा सविस्तर

भारतात सोनं केवळ एक धातू नाही, तर ते समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. सण, लग्न किंवा इतर खास प्रसंगांमध्ये सोनं खरेदी करणं नेहमीच शुभ मानलं जातं. याशिवाय, सोनं हे एक उत्तम गुंतवणूक साधन आहे, ज्यामुळे ते प्रत्येकाच्या घरात एक विशेष स्थान राखतं. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की 24 कॅरेटचं शुद्ध सोनं असूनही, त्याचा वापर दागिन्यांसाठी का केला जात नाही? यामागचं कारण काय आहे? चला, यावर एक नजर टाकूया.
24 कॅरेटचं सोनं शुद्ध असलं तरी दागिन्यांसाठी योग्य आहे का ?
24 कॅरेटचं सोनं हे 99.9 टक्के शुद्ध असतं, म्हणजेच त्यापेक्षा जास्त शुद्ध सोनं असूच शकत नाही. परंतु, तुम्ही यापासून दागिने तयार करण्याची इच्छा व्यक्त केली, तर सोनार तुम्हाला नकार देईल. कारण 24 कॅरेटचं सोनं अत्यंत मऊ आणि लवचीक असतं. हे सोनं हाताने दबवून पाहिल्यास किंवा आकार देण्याचा प्रयत्न केल्यास ते तुटू शकतं किंवा त्याचा आकार बदलू शकतो. अशा परिस्थितीत, दागिने बनवण्यासाठी ते अत्यंत अवघड आणि अपायकारक ठरते.
दागिन्यांसाठी कीती कॅरेटचे सोन वापरणे योग्य आहे ?
दागिने तयार करण्यासाठी सुनार 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट सोनं वापरतात. यामध्ये शुद्ध सोनं कमी असतं, पण त्यात तांबं, चांदी, किंवा झिंक सारख्या मिश्रधातूंचा समावेश केला जातो. या मिश्रधातूंचं प्रमुख कार्य सोन्याला अधिक कणखर आणि मजबूत बनवणं आहे. उदाहरणार्थ, 22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोनं असतं, तर 18 कॅरेटमध्ये 75 टक्के शुद्ध सोनं असतं. त्यामुळे, हे सोनं टिकाऊ आणि दागिन्यांसाठी योग्य ठरते.
24 कॅरेटचं सोनं कसं खरेदी करायचं?
जर तुम्हाला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, तर ते दागिन्यांच्या रूपात मिळणार नाही. 24 कॅरेट सोनं बिस्किट्स किंवा विटांच्या स्वरूपात मिळतं, ज्याचा उपयोग दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून केला जातो. याशिवाय, तुम्ही शुद्ध सोन्यापासून बनवलेले सिक्के देखील खरेदी करू शकता, जे एक सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक मानली जातात.
सोन्याची किंमत नेहमी ग्रॅममध्येच का मोजली जाते?
सोन्याची किंमत नेहमी प्रति ग्रॅम मोजली जाते, कारण ग्रॅम हा एक आंतरराष्ट्रीय प्रमाण आहे. त्यामुळे, सोन्याच्या किंमतींची तुलना करणं सहज होतं. सोनं अत्यंत मौल्यवान धातू आहे, आणि त्याची किंमत मोजण्यासाठी लहान एकक म्हणजेच ग्रॅम वापरणं व्यावहारिक ठरते. यामुळे ग्राहकांना सोन्याच्या किंमतीचा नीट समज होतो, आणि ते सोप्या पद्धतीने खरेदी करू शकतात.
