Marathi News » Crime » A lady in satara tried to Self immolation but satara saved her and took her in custody
पेट्रोल अंगावर टाकत महिलेनं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वाचवलं!
Satara : जावली सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेनं केला असून याच्या निषेधार्थ तिनं टोकाचं पाऊल उचललं होतं.
साताऱ्यात एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ यावेळी टळलाय.
1 / 6
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्योती नलावडे या महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या अंगावर पेट्रोल सदृश्य द्रव्य ओतून घेतलेल्या या महिलेनं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
2 / 6
दरम्यान, पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतलं. त्यानंतर या महिलेच्या अंगावर पाणी फवारण्यात आलं. भररस्त्यात घडलेल्या या थरारक प्रकारामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
3 / 6
जावली सहकारी बँकेच्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेल्या महिलेनं केला असून याच्या निषेधार्थ तिनं टोकाचं पाऊल उचललं होतं.
4 / 6
जावली सहकारी बँकेच्या संचालकांवर कारवाई करून दोषारोप दाखल करण्याची मागणी महिलेनं केली होती.
5 / 6
दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न फसलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.