दिशाइतकीच सुंदर आहे तिची बहीण खुशबू; भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून करते काम
Dec 06, 2022 | 12:24 PM
अभिनेत्री दिशा पटानीने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. दिशा तिच्या फिट बॉडीसाठी आणि उत्तम नृत्यकौशल्यासाठीही ओळखली जाते. दिशाप्रमाणेच तिची बहीण खुशबू पटानीसुद्धा फिटनेस फ्रीक आहे. इतकंच नव्हे तर तरी इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट आहे.
1 / 6
दिशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा खुशबूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. खूशबू आणि दिशाला एक छोटा भाऊसुद्धा आहे. त्याचं नाव सुर्यांश पटानी असं आहे.
2 / 6
खुशबूने तिच्या आर्मी ट्रेनिंगदरम्यानचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 6
दिशा जरी बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिची बहीण बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून लांबच राहते. मात्र दिसायला ती दिशाइतकीच ग्लॅमरस असल्याचं पहायला मिळतं.
4 / 6
दिशा आणि खुशबूचे वडील जगदीश सिंह पटानी हे पोलिसांत डीएसपी रेंजचे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रभावामुळेच खुशबूने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं.