Photo : शाहरुख-सलमानशिवाय ‘या’ पाच कलाकारांची दुबईत आलिशान प्रॉपर्टी

बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांची दुबईमध्ये आलिशान घरे आहेत. (Luxury property of these five artists in Dubai, including Sahrukh Khan and Salman Khan)

1/7
Bollywood stars who own homes in Dubai
संयुक्त अरबमधील दुबई हे सर्वात मोठं शहर आहे आणि हे शहर बॉलीवूड कलाकारांचं सर्वाधिक आवडतं शहर आहे. बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार आहेत ज्यांची दुबईमध्ये त्यांची आलिशान घरं आहेत.
2/7
Shahrukh khan
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान मुंबईतील एका आलिशान बंगल्यात राहतो. त्याच्या मुंबईच्या बंगल्याचे नाव मन्नत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचा दुबईमध्येही व्हिला आहे. अभिनेताचा हा व्हिला पाम जुमेराहमध्ये आहे, याची किंमत 2.8 दशलक्ष आहे, जे सुमारे 20 कोटी आहे. असं म्हणतात की या भव्य व्हिलामध्ये सुंदर 6 बेडरूम आहेत.
3/7
Shilpa Shetty
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं ब्रिटिश आणि भारतीय वंशाचे व्यापारी राज कुंद्रा यांच्याशी लग्न केलं आहे. दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये या जोडप्यानं स्वत:साठी एक आलिशान घर घेतलं आहे.
4/7
Aish Abhishek
जुमिराह मधील सेंचुरी फॉल्समध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan) यांचं घर आहे. प्रोपहेडलाईननुसार या मालमत्तेची किंमत 15 ते 35 दशलक्ष यूएई दिरहॅम दरम्यान आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 2013 मध्ये लक्झरी घर खरेदी केलं.
5/7
Anil Kapoor
आपली टीव्ही मालिका 24च्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर यांनी 2016 मध्ये दुबईत स्वत:साठी 2 बीएचके फ्लॅट घेतला होता.
6/7
salman khan
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा दुबईशी खूप चांगला संबंध आहे. त्याचे अनेक मित्र तिथे आहेत. शहराच्या मध्यभागी त्याचा एक फ्लॅट आहे.
7/7
Sohail Khan
सोहेल खान सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी या अभिनेत्याकडे मुंबईपासून दुबईपर्यंत अनेक मोठ्या संपत्ती आहेत. सोहेलचा दुबईच्या बिझनेस बे येथे फ्लॅट आहे.