Marathi News » Entertainment » Mazhi Tuzhi Reshimgath two hours special episode of yash and neha wedding
Mazhi Tuzhi Reshimgath: आली समीप लग्नघटिका; यश-नेहाच्या लग्नाचा 2 तासांचा विशेष भाग
मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता जवळ आला आहे. यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी तसंच परीचा निरागस अभिनय याने प्रेक्षकांची मन जिंकली.
1 / 5
मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांना ज्या क्षणाची आतुरता होती तो क्षण आता जवळ आला आहे. यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे.
2 / 5
त्यांचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल मजा मस्ती तर प्रेक्षकांनी पाहिलीच. पण आता यश आणि नेहाचा लग्न सोहळा डोळे दिपून टाकेल असा शानदार पद्धतीने होणार आहे.
3 / 5
नेहा आणि यश हे दृष्ट लागण्याइतके सुंदर दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या नव्वारी साडी मध्ये नेहाचं सौंदर्य अगदी खुलून आलंय तर यश नवरदेवाच्या पोशाखात एकदम राजबिंडा दिसतोय.
4 / 5
पण या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ती म्हणजे चिमुकली परी. तिच्या घेरदार शरारामध्ये परी खूपच गोड दिसतेय. हा दिमाखदार लग्नसोहळा प्रेक्षकांना 12 जून रविवारी रात्री 8 वाजता 2 तासांचा विशेष भागात पाहायला मिळेल.