Lookalike : मॉर्डन मधुबाला, ‘पवित्र रिश्ता’ मालिकेत मिळाला होता ब्रेक

अनेक मुली मधुबालासारखं दिसण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासारखं दिसण्यासाठी अनेक जण शस्त्रक्रिया देखील करतात. (Modern Madhubala Priyanka Kandwal, got break in the 'Pavitra Rishta')

1/6
Priyanka Kandwal
बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला यांच्या चाहत्यांची कमी नाही. मधुबाला आता आपल्या सोबत नसली तरी लोक तिच्या अभिनयाबद्दल, तिच्या सौंदर्य आणि हास्याचे वेडे आहेत. अनेक मुली मधुबालासारखं दिसण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासारखं दिसण्यासाठी अनेक जण शस्त्रक्रिया देखील करतात. आज आपण मधुबालासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. ही व्यक्ती फक्त मधुबालासारखी दिसत नाही तर टीव्ही इंडस्ट्रीचा एक चेहरा बनली आहे.
2/6
Priyanka Kandwal
ही आहे प्रियंका कंदवाल. गेल्या वर्षी प्रियंकानं तिच्या टिक टॉक अकाऊंटवर एकापाठोपाठ एक अनेक व्हिडीओ शेअर केले तेव्हा तिला खूप लोकप्रियता मिळाली.
3/6
Priyanka Kandwal
या व्हिडीओंमध्ये प्रियंका अगदी मधुबालासारखी दिसत होती. जरी आता भारतात टीक टॉकवर बंदी आहे, मात्र त्यावेळी प्रियंकाला टिक टॉकची मधुबाला या नावानं ओळख मिळाली.
4/6
Priyanka Kandwal
प्रियांकानं इतकी लोकप्रियता मिळविली की तिला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम मिळू लागलं. प्रियंकानं झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमाचा पहिला ब्रेक घेतला. यानंतर तिनं एकामागून एक अनेक मालिकांमध्ये काम केलं.
5/6
Priyanka Kandwal
प्रियांका मधूबालासारखी दिसते. तिचं सौंदर्य आणि हसू पाहून तुम्हीही फसवले जाऊ शकता की ती मधुबाला आहे की नाही.
6/6
Priyanka Kandwal
प्रियांका केवळ सुंदरच नाही तर स्टायलिशही आहे. जर तिला मॉडर्न मधुबाला म्हटलं तर काहीही चूक होणार नाही.