Maharashtra News LIVE : 4 तारखेला ठाकरे बंधुंच्या भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली
Maharashtra News LIVE : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातील मदर डेअरीच्या जागेवरील 477 झाडांवर पालिका कुऱ्हाड चालवण्याच्या तयारीत आहे. याबाबत बुधवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांत लेखी स्वरुपात या प्रस्तावावर हरकती व सूचना नोंदवा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
सोलापूर शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला
सोलापूर शहरातील पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला आहे. सोलापूर शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा एक दिवस पुढे गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराला मार्च 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा राखीव आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणी तुटवडा होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाकडून दुष्काळी उपाययोजना होत आहेत.
-
पावसाचा मोठा खंड पडल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान
जळगावच्या चोपडा तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने कापूस पिकाचे मोठे नुकसान. पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. मेहनत वाया गेली, लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत. लाल पडलेल्या कापूस पिकामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. लागवडीचा खर्चही निघणार नसल्याची शेतकऱ्यांना भीती.
-
-
ध्वजारोहणापूर्वी गोदा घाट परिसरात युद्धपातळीवर काम सुरू
31 ऑक्टोबर रोजी गोदाघाटावर होणार सिंहस्थाचा ध्वजारोहण सोहळा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, मुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील अनेक मंत्री राहणार उपस्थित. ध्वजारोहण पूर्वी गोदाघाटवरील कामांना आला वेग. घाटांचे सुशोभिकरण, नवीन घाट बांधणे तसेच गोदाघाटचे सौंदर्यीकरण सुरू. कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान.
-
लालबागच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या वीटेची १ कोटी ५५ लाख रुपयांना विक्री
लालबागच्या चरणी अर्पण केलेली सोन्याच्या वीटेची १ कोटी ५५ लाख रुपयांना विक्री. लालबागचा राजाच्या दागिन्यांच्या विक्रीतून ३ कोटी २२ लाख रुपये जमा. लालबागचा राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव काल करण्यात आला.
-
ठाकरे बंधुंच्या भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली
4 तारखेला ठाकरे बंधुंच्या भायखळा येथून निघणाऱ्या मोर्चाची टॅग लाइन ठरली. गर्जना, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी अशी असेल मोर्चाची टॅग लाईन. भायखळा येथील रिचर्डसन अँड कृडास कंपनी ते मुंबई महानगर पालिका असा असेल मोर्चा
-
सांगलीची डीसीसी बँक म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, त्यामुळे कोंबडीचे सगळी अंडी आपल्यालाच मिळावं, यासाठी खासदार-आमदार सहपरिवार अर्ज भरायला लागलेत,अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी अप्रत्यक्षरीत्या खासदार विशाल पाटलांसह विरोधकांवर केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटलांनी आपली पत्नी व आईसर उमेदवारी अर्ज दाखल केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक समविचारी पक्षांना घेऊन आणि जे आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन लढवली जाईल,अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला,त्यानंतर ते बोलत होते.
Published On - Oct 01,2026 8:29 AM
