LIVE UPDATE | त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद; मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडीत तणावाचे वातावरण

| Updated on: Nov 13, 2021 | 3:39 PM

त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडीत आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबरांबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याची वार्ता वाऱ्या सारखी पसरल्यानंतर मुस्लिम समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला.

LIVE UPDATE | त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद; मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडीत तणावाचे वातावरण

मुंबई : त्रिपुरातील एका रॅलीत पैगंबराबद्दल अपशब्द वापरण्यात आल्याने महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमरावती, मालेगाव, भिवंडीत आणि नांदेडमध्ये प्रचंड मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्याला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून दगडफेकीच्या घटना घडल्या. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रू धुराचा वापर करावा लागला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Nov 2021 08:12 PM (IST)

    अशोक चव्हाण बाईट

    त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली

    अशोक चव्हाण यांनी केले शांततेचे आवाहन

    त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले

    महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत

    निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे

    मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे

    या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल

    नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचे पालन करावे

    दादा भुसे बाईट ऑन मालेगाव

    घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे

    पोलीस प्रशासन cctv आणि क्लिपच्या आधारावर घटनेचा मूळ कारण शोधून काढतील

    त्रिपुराच्या घटनेचा निषेध साठी बंद ठेवण्यात आला होता

    काहींनी या शांततेला गालबोट लावलं

    आता परिस्थिती शांत आहे

    संजय राऊत 

    भाजपला देशभरात असं वातावरण निर्माण करायचंय

    असं वातावरण निर्माण करुन निवडणुकीत उतरायचंय

    संजय राऊतांची हिंसाचारावरुन भाजपवर टीका

    त्रिपुरातील अन्याय विरुद्ध महाराष्ट्रात दंगल करण्याचं कारण नाही,

    त्रिपुरातल्या परिस्थिती बद्दल आम्हालाही चिंता आहे.

    मालेगावातील परिस्थिती नियंत्रणात

    मालेगाव येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे

    त्या ठिकाणी दंडाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत

    नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा

    नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची प्रतिक्रिया

  • 12 Nov 2021 08:03 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया

    त्रिपुरात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे

    परिस्थिती नियंत्रणात असून पोलिस प्रशासनाने दक्ष राहावे असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

    राज्य सरकारनं प्रकरणाची दखल घ्यावी: देवेंद्र फडणवीस

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. असं म्हटलंय. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

    छगन भुजबळांचे शांतता राखण्याचे आवाहन

    मालेगावातील दगडफेकीच्या घटनेवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही काहीही बरळतील. कोरोनानंतर आता कुठे आनंदी वातावरण आहे. कृपया डोके गरम करून घेऊ नका, शांतता राखा. पोलीस त्यांचे काम करतील. आपल्या कृतीमुळे कुठल्याही संकटात वाढ होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्या, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलकांना केले आहे.

    दुसऱ्या राज्यातील घटनेवर मालेगावात प्रतिक्रिया उमटण्याचे कारण नाही : चंद्रकांत पाटील

    मालेगावातील तणाव परिस्थिती चिघळू नये. त्रिपुरातील पडसाद इथे कसे उमटू शकतात? असा सवाल करीत दुसऱ्या राज्यातील घटनेवर मालेगावात प्रतिक्रिया उमटण्याचे कारण नाही, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून असे घडत आलं आहे जगात कुठे काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया देशात उमटते. त्रिपुरामध्ये मशीद का पाडली? ते अनधिकृत बांधकाम होत की नाही माहीत नाही. परंतु तिथल्या घटनेचे मालेगावात पडसाद उमटण्याचे कारण नाही. तिथे पोलिसांनी बळाचा वापर करू नये कारण तसे केले तर महविकास आघाडीच्या वोट बँकला धक्का बसेल, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

    एकाही समाज कंटकाला सोडू नका : शंभूराजे देसाई

    मालेगाव, नांदेड, भिवंडी आणि अमरावतीत मुस्लिम बांधवांची माथी भडकवून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कारवाई करा. वातावरण चिघळवणाऱ्या एकाही समाजकंटकाला सोडू नका, असे आदेशच गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) यांना दिले आहेत.

  • 12 Nov 2021 07:51 PM (IST)

    अमरावतीत मुस्लिम संघटनांकडून त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ दुकानं बंद

    त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.

    नांदेडमध्ये मुस्लिम समाजाच्या मोर्चाला गालबोट, जमावाकडून दगडफेक आणि तोडफोड

    त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटले आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागलं आहे. जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि काही भागात जाळपोळ करण्यात आलीय. नांदेडमध्ये दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक भागात दगडफेक केली. त्यात अनेक वाहनं, दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

    मालेगावात बंदला गालबोट, आंदोलकांकडून दगडफेक

    त्रिपुरा राज्यात आयोजित एका रॅलीमध्ये पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रातही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुस्लिम समाज आक्रमक झाला असून रॅली मार्फत याचा निषेध नोंदवण्यात येत होता. नाशिकमधील मालेगावातही मुस्लिम संघटनांनी बंद पुकरला होता. या बंदला सायंकाळी गालबोट लागले. आंदोलकांकडून रॅली दरम्यान दगडफेक करण्यात आली.

    मालेगाव अपडेट

    * जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल ..

    *जमावाला पांगविण्यासाठी अश्रू धुराच्या कांड्याचा वापर

    * मोठ्या प्रमाणावर दगडफेक

    * काही नागरिक व पोलिस किरकोळ जखमी ..

    * परिस्थिती नियंत्रणात ..वातावरण तणावपूर्ण

    * मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात ..

    * प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून ..

    त्रिपुरातील मुस्लिम धार्मिक संस्थांवरील अत्याचाराविरोधात परभणीत जोरदार निदर्शने

    परभणीत विविध पक्ष, संघटनांसह मुस्लिम समाजबांधवांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने त्रिपुरा राज्य सरकारला तातडीने बरखास्त करावे, धूमाकूळ घातलेल्या, घालणार्‍या तसेच कायदा व सुवस्था निर्माण करणार्‍या व्यक्ती व संस्थांविरुध्द कठोर कारवाई करावी. त्रिपुरा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. दंगलीत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. उद्ध्वस्त झालेल्या धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करावी. हल्लेखोरांना सहकार्य करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना सेवेतून बडतर्फ करावे तसेच तेथील वकील व पत्रकारांविरुध्दचे खटले मागे घ्यावेत यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

    भिवंडी
    भिवंडीतील रजा अकादमीच्या बंदमध्ये संध्याकाळी वादाची घटना पारनाका येथे शुक्रवारी नमाजनंतर 30 ते 40 दुचाकीवरून आलेल्या युवकांनी दुकाने बंद करण्यासाठी दुकानदारांना धमकावण्याची घटना घडली
    शहर पोलीस ठाण्यात धमकविणाऱ्या टोळक्या विरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू घटनास्थळाचा व्हिडीओ व्हायरल
    या प्रकरणी अजून गुन्हा दाखल झाला नाही
    भाजपच्या वतीने उद्या अमरावती बंदची हाक
    त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजातील लोकांवर हल्ले करून मशिदीची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून अमरावतीत मुस्लिम समाजातील लोकांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चाला गालबोट लागलं व हिंसक वळण आलं. यावेळी गाड्या व 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे अमरावती शहरात लुटमार, तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली असा आरोप भाजपने केला तर पोलीस यंत्रणा मूकदर्शक बनली होती. संपूर्ण अमरावती शहर प्रचंड दहशतीत होते. शहराला वाचवण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आला. तर या मुस्लिम मोर्चाचा निषेध म्हणून उद्या अमरावती शहर बंदचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले. तसेच उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील भाजप काढण्यात येणार आहे. दुकाने तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे.

Published On - Nov 12,2021 7:47 PM

Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....