Politics | BJP नगरसेवकाच्या कार्यालयात Congressचा राडा, Nagpurमधील घटना
नागपूर (Nagpur) महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयासमोर आणि कार्यालयात भाजपा (BJP) आणि काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय.
नागपूर (Nagpur) महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांच्या कार्यालयासमोर आणि कार्यालयात भाजपा (BJP) आणि काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. भाजपा नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांचा आरोप आहे, की काँग्रेस कार्यकर्ता बाबूखान आणि त्याच्यासोबत आलेल्या काही महिला पुरुषांनी भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात वाद घातला. नंतर तोडफोड करत तिथल्या साहित्याची नासधूस केली. वीरेंद्र कुकरेजा प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक आहेत. मात्र समता नगर आणि सुगत नगर परिसरात त्यांचे लक्ष नाही. काँग्रेस कार्यकर्ता बाबू खानच्या नेतृत्वात आज काही लोकांनी कुकरेजा यांचे जनसंपर्क कार्यालयात जाऊन तक्रार करण्याचा प्रयत्न केले असता तिथे वाद होऊन त्याची परिणती कुकरेजा यांच्या कार्यालयातील तोडफोडीमध्ये झाली. सध्या दोन्ही पक्षांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
