Santosh Deshmukh Case : केजमध्ये संतोष देशमुख समर्थक आक्रमक; घोषणाबाजी करत बाजारपेठ बंदची हाक

Santosh Deshmukh Case : केजमध्ये संतोष देशमुख समर्थक आक्रमक; घोषणाबाजी करत बाजारपेठ बंदची हाक

| Updated on: Mar 07, 2025 | 10:30 PM

Beed Crime News : माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. केजमध्ये तरुण आक्रमक झाले असून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर पद्धतीचे फोटो समोर आल्यानंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. केज शहरात या बंदला प्रतिसाद देत सर्व तरुण आज रस्त्यावर उतरलेले आहेत. याठिकाणी तरुण आक्रमक होत घोषणाबाजी करताना बघायला मिळत आहे. केजच्या बाजारपेठेत फिरून हे सर्व तरुण बाजारपेठ बंद करण्याचं आवाहन करत आहेत.

मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडीने आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी आरोपींनी काढलेले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो देखील आहेत. त्यातून अत्यंत क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांचा छळ करून त्यांना मारण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. हे सगळे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर आज संतोष देशमुख यांच्या समर्थकांकडून बीड बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केज शहरात आज तरुणांनी आक्रमक होत बाजारपेठ बंद केली आहे. यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे. तसंच सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी या तरूणांकडून करण्यात आलेली आहे.

Published on: Mar 04, 2025 01:10 PM