AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! राज ठाकरेंना सलग दुसऱ्या दिवशीही धक्का, असंख्य पदाधिकाऱ्याचा भाजमध्ये प्रवेश, मनसेत खळबळ

Raj Thackeray : राज ठाकरेंना सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंची चिंता वाढली आहे.

मोठी बातमी ! राज ठाकरेंना सलग दुसऱ्या दिवशीही धक्का, असंख्य पदाधिकाऱ्याचा भाजमध्ये प्रवेश, मनसेत खळबळ
Big Blow For Raj ThackerayImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jan 07, 2026 | 6:22 PM
Share

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय पक्ष जोमाने प्रचार करत आहेत. सर्वत राजकीय नेते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. मात्र या काळात अनेक नेते पक्षांतर करत असल्याचेही समोर आले आहे. राज ठाकरेंना सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंची चिंता वाढली आहे. या पक्षांतराचा परिणाम थेट निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीत कोणत्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली ते जाणून घेऊयात.

मनसेला मोठा धक्का

महानगर पालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे डोंबिवली उपशहर अध्यक्ष योगेश म्हात्रे, शाखा अध्यक्ष अनिकेत गायकवाड, शाखा अध्यक्ष दिपेश धुरी, मनविसे डोंबिवली शहर सचिव चैतन्य सावंत, मनविसे विभाग सचिव सर्वेश लोंढे, योगेश पडवळ, निलेश निरकर, अनिकेत सावंत, अभिषेक गायकवाड, रोहन वगळ यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपची ताकद वाढली असून मनसेची चिंता वाढली आहे. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी नगरसेवक मंदार टावरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगळवारी मनसेला दोन धक्के

काल मुंबईतील मनसेचे नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे ऐन निवडणुकीत मनसेची ताकद कमी झाली होती. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीमध्ये नुकसान होत असल्याने संतोष धुरी यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्यांनी पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

संतोष धुरी यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि सरचिटणीस राजाभाऊ चौगुले यांनी राज ठाकरेंची साथ सोडत एकनाश शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. राजाभाऊ चौगुले यांच्यासह मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ऍड.देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर आज अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरल्याने राज ठाकरेंची चिंता वाढली आहे.

समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.