Maharashtra Election News LIVE : आपला अजेंडा एकच, विकास- एकनाथ शिंदे
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार; मुंबईत ठाकरे बंधूंची संयुक्त सभा तर महायुतीचा वचननामा प्रसिद्ध होणार. जाणून घ्या राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभांचे अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES
-
फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस जाऊन लोकांशी बोलावं लागतं- एकनाथ शिंदे
स्थगिती सरकारनं संभाजीनगराचाही विकास रोखला होता. घरी बसून कामं होत नाही. ठाकरेंसह महाविकास आघाडीने मुंबईप्रमाणे संभाजीनगरातही भ्रष्टाचार केला. फेसबुक लाईव्ह नाही, फेस टू फेस जाऊन लोकांशी बोलावं लागतं अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
-
मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी- एकनाथ शिंदे
मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाला मत देणार का रशीद मामुला उमेदवारी देणाऱ्या उबाठाला मत देणार असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धत्रपती संभाजीनगरमध्ये केलं आहे.
-
-
आम्ही झाडं लावणारे लोक, फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार
काही दिवसांवर महापालिका निवडणुका आल्या असून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात वार-पलटवार सुरु आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधून थेट राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. आम्ही झाडं लावणारे लोक आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये कोणत्या गोष्टी आणल्या याबाबतही माहिती दिली.
-
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा करण्याचा प्रयत्न, शिवसेनेच्या उमेदवाराचा आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास हळद-कुंकू लावलेले मंतरलेले तांदूळ फेकून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे उमेदवार आणि सह संपर्कप्रमुख विलास शिंदे यांनी केला आहे.. या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू असून विरोधकांनी जादूटोणा करण्याऐवजी कामांच्या जोरावर आम्हाला आव्हान द्यावं असं विलास शिंदे यांनी म्हटलं आहे
-
यावल शहरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई
जळगाव : यावल शहरात शनीवारी येथील वाहतुक पोलीस पथकाच्यावतीने विना क्रमांकाची तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहन धारकांविरुद्धच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच हाय सेक्युरेटी आरटीओ प्रमाणीत नंबर प्लेट बसवल्यानंतरचं दुचाकी सोडल्या जात आहे. गेल्या चार दिवसांपासुन सुरू असलेल्या या कारवाईत ६४ दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईत करण्यात आली आहे. -
-
डोंबिवलीत पैसे वाटपाचा आरोप, शिवसेना भाजप कार्यकर्ते आमनेसामने
डोंबिवलीत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रचारादरम्यान पैसे वाटप केल्याचा आरोप करत शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने भिडले आहेत. डोंबिवली प्रभाग क्रमांक 29 तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन इमारतीत भाजपच्या कार्यकर्त्यांतकडून प्रत्यक घरात एक मतदाराला तीन हजार रुपयाचे पाकीट नागरिकांच्या घरी टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
नागपूरमध्ये प्रचाराचा सुपर संडे
आज प्रचाराचा सुपर संडे सगळेच पक्ष लागले कामाला लागेल. पदयात्रा रॅली आणि सभांचा सर्वत्र माहोल पाहायला मिळाला.मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्याच्या उमेदवार पोहचत आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने आज खऱ्या अर्थाने प्रचाराचा शेवटचा संडे आहे. आज सुट्टी असल्याने प्रचाराची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. रत्येकच पक्षाने आपापल्या परीने तयारी केली असून आज थंडीच्या काळात नागपुरात राजकीय पारा वाढला असल्याचे चित्र पाहायला मिळत
-
-
भाजपवर दादा भुसेंची टीका
धुळ्यात देखील गुंडगिरी ,दहशत, काही उमेदवारांना दहशतीने माघार घेण्याचे प्रकार त्यामुळे धुळेकरांमध्ये रोष, मतदानाच्या माध्यमातून मतदार आपल्या भावना व्यक्त करतील. भाजपाने शेवटच्या दिवसापर्यंत युती संदर्भात अडकून ठेवलं, अशी टीका त्यांनी केली. नगरपरिषद निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मतदारांनी विश्वास दाखवला यंदा देखील विश्वास दाखवतील, अशी आशा दादा भुसे यांनी व्यक्त केली.
-
बावनकुळेंची चंद्रपूरमध्ये चाय पे चर्चा
चंद्रपूरमधील श्याम नगर येथील प्रचार सभा संपल्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभेच्या जवळच असलेल्या एका चहा टपरीवर चहा घेतला.यावेळी बावनकुळे यांनी चहावाल्या सोबत निवडणुकीचा माहोल कसा आहे याबाबत चर्चा केली.सोबतच त्याला कमळाला मत देण्याचं आवाहन ही केलं.
-
नाना पटोले यांची उद्धव सेनेसह भाजपवर टीका
मुंबई कोणा एक व्यक्तीची नाही. भाजपची तर नाहीच. फडणवीसांनी नाकाची जीभ कपाळावर नेऊ नये. फडणवीसांनी फेकणे बंद करावे. मुंबईत भाजप आणि सेनेची सत्ता असताना त्याची यादी समोर आणावी. त्यानंतर मुंबईची लूट या लोकांनी कशी केली हे समोर येईल. मुंबईचा व्यापार आज गुजरात मध्ये स्थलांतर झालाय.गुंडागर्दी वाढली आहे. उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविकता मांडावी. 25 वर्षात दोघांनी मिळून काय पाप केले याची वास्तविकता मांडावी, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली.
-
लाडक्या बहिणीला पैसे देण्यास आमचा विरोध नाही-नाना पटोले
लाडक्या बहिणीला बेईमान भावांनी बदनाम केलं. लाडक्या बहिणीच्या नावानं सर्व खापर फोडण्याचे काम केले जात आहे. अगोदर पेट्रोल मध्ये राज्य सरकारची कर 30 रूपये प्रति लिटर घेतली जायची आता 40 रुपये घेतली जाते, असे दहा रुपये कर वाढ केली. या पद्धतीने लाडक्या बहिण्याच्या खिशातून पैसे घेतले जात आहेत. निवडणूक काळात पैसे वाटप करून प्रलोभन दिल्याचं काम केले जात असल्याचं प्रश्न निर्माण होतोय. लाडक्या बहिणीला पैसे मिळावे आमचा विरोध नाही, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
-
प्रभाग क्रमांक २२० मध्ये बाईक रॅली
महापालिका निवडणूक प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असून प्रचार अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार जोरदार सुरु आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक २२० च्या भाजप उमेदवार दिपाली मालुसरे यांच्याप्रचारार्थ बाईक रॅली चे आयोजन करण्यात आली.
-
दादा भुसे यांचा ठाकरे बंधूंवर हल्ला..
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकी शिवसेनेच्या शिंदे गटाच्यावतीने मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी दादा भुसे यांचा ठाकरे बंधूंवर हल्ला चढवला. नाशिक येथे पर्यटनासाठी आल्याचा टोला लगावला. काही वर्षानंतर नाशिक येथे ठाकरे बंधू पर्यटनासाठी आले. एकनाथ शिंदे यांच्या वर टीका टिपणी करण्याचा दोघांचा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली.
-
माझ्या घरावर झालेला हल्ला हा राजकीय कट- शिरीष चौधरी
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर झालेला हल्ला हा राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. काही राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्ताने अवैध धंदे करणाऱ्यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. काल रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास तब्बल ५० ते ६० अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात धारदार शस्त्रांसह पेट्रोल बॉम्बचा वापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
-
फॅन्सी क्रमांक असलेल्या दुचाकी वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई
यावल शहरात शनीवारी येथील वाहतुक पोलीस पथकाच्या वतीने विना क्रमांकाची तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहन धारकांविरुद्धच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच हाय सेक्युरेटी आरटीओ प्रमाणीत नंबर प्लेट बसवल्यानंतरचं दुचाकी सोडल्या जात आहे. गेल्या चार दिवसांपासुन सुरू असलेल्या या कारवाईत ६४ दुचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईत करण्यात आली आहे.
-
पुण्यातील प्रभाग 16मध्ये शिवसेनेची दुचाकी रॅली
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या सुपर संडे पाहायला मिळतोय. शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जोरात प्रचारामध्ये उतरली आहे. प्रभाग सोळा मध्ये दुचाकीची रॅली काढून नाना भानगिरे यांनी उमेदवाराच्या प्रचार केलाय. शिवसेना एक विजन घेऊन पुणेकरांसमोर आणि प्रभाग सोळा मध्ये जात आहे. त्यामुळे विकासाच्या आराखड्यासाठी लाडक्या बहिणी लाडके भाऊ शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतील आणि आम्ही प्रचंड मताने निवडून येणार असा विश्वास नाना भानगिरे यांनी प्रचारामध्ये व्यक्त केलाय.
-
गोंदियात डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी घेणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी 4 पिंजरे बसविण्यात आले असून 50 पेक्षा अधिक वनकर्मचारी गस्त घालत आहेत. गोंदियासह भंडारा जिल्ह्यातील रॅपिड रेस्क्यू टीमला पाचरण करण्यात आले आहे.
-
‘इंडियन आयडॉल 3’चा विजेता प्रशांत तमांगचं निधन
‘इंडियन आयडॉल 3’चा विजेता प्रशांत तमांगचं वयाच्या 43 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतल्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्याने प्राण गमावल्याचं कळतंय. वाचा सविस्तर वृत्त..
-
माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावर बोलतो, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय झालेलं फडणवीसांचं एक भाषण दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावर बोलतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
-
पेडणेकरांच्या प्रचाररॅलीत फटाके फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
किशोरी पेडणेकरांच्या प्रचाररॅलीत फटाके फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटी-शर्तींचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
-
धुळे महानगरपालिकेत मतदानाच्या तयारीला सुरुवात
धुळे महानगरपालिकेत मतदानाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. प्रशासनाच्या वतीने मतदान यंत्रावर चिन्ह लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वखार मंडळाच्या गोडाऊनमध्ये मशीन सेटिंग आणि सिलिंगची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या साक्षीने मतदान यंत्रावर चिन्हांच्या प्रती लावल्या जात आहेत.
-
मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून वचननामा जाहीर
मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 24 उमेदवार रिंगणात आहेत. शहराच्या विकासासाठी आज मालेगाव भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कवचे, बंडू काका बच्छाव, सुनील गायकवाड, डॉ.तुषार शेवाळे, यांच्यासह सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढाई मालेगाव शहरातील पश्चिम भागात आहे.
भूमिपुत्रांना रोजगार, वीज, पाणी स्वस्त करणार, भुईकोट किल्ला अतिक्रमण मुक्त, लँड जिहाद कारवाई, शहरातील धूळ,वाहतूक कोंडी मुक्त शहर, शहरासाठी नाट्यगृहासह महत्वाच्या विषयावर भाजपचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
-
मुंबईला बांगलादेश आणि रोहंग्यांपासून मुक्त करू – देवेंद्र फडणवीस
मुंबईला बांगलादेश आणि रोहंग्यांपासून मुक्त करू. वर्षभरात बांगलादेशी शोधून काढू आणि त्यांना पाठवून देऊ. आयआयटीच्या माध्यमातून टूल तयार करून बांगलादेशी शोधू. पश्चिम बंगालमधून येतात. कागदपत्र तयार करून ते मुंबईत येतात. त्यामुळे त्यांना हुडकावं लागतं. त्यामुळे एक टुल तयार करत आहोत. काम सुरू केलं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.
-
महायुतीची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा
मुंबईतील लाडक्या बहिणींना महापालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं, शिलाई मशीन दिलं. आता त्यापलीकडे जाऊन लाडक्या बहिणींना लघुउद्योगासाठी लोन देणार. मागच्यावेळी 1 लाखापर्यंतचं लोन दिलं. आता मुंबईच्या लाडक्या बहिणींना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार आहोत. लाडक्या बहिणींकडून लखपती दिदीकडे त्यांचा प्रवास करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
महायुतीच्या वचननाम्यात काय काय ?
महायुतीच्या वचननाम्यातील महत्वाचे मुद्दे :
– मुंबईत पुढील पाच वर्ष पाणी कर दरवाढ लादली जाणार नाही
– खड्डेमुक्त मुंबई करणार
– मुंबईत पाताललोक संकल्पना मांडली जाणार ( मुबईतले अनेक विभाग अंडर ग्राऊंड रस्त्याने जोडले जाणार )
– फुटपाथचे काँक्रिटीकरण होणार
– मुंबईकरासाठी फेरीवाला धोरण ठरवले जाणार
– भुयारी पार्किगची निर्मिती करणार
– पुरमुक्त मुंबई करणार
– मुंबईचे रस्ते कचरामुक्त करणार
-
पाच वर्षानंतर जनतेच्या समोर जाऊ तेव्हा – काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?
इतर कुणीही वचननामा दिला तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आणि आमच्या ट्रॅक रेकॉर्डमध्ये असलेल्या अंतरामुळे वचननामा पूर्ण करू. पाच वर्षानंतर जनतेच्या समोर जाऊ तेव्हा वचननाम्यावर आधारीत ॲक्शन टेकन रिपोर्ट फॅक्टशीट म्हणून मांडू. काय केलं होतं हे सांगू – वचननामा प्रकाशनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आश्वासन.
-
मुंबई महापालिकेसाठी युतीचा जाहीरमान, महत्वाचे मुद्दे काय ?
मुंबईच्या विकासाचा वेग वाढवणार. येत्या 5 वर्षांत 30 ते 35 हजार घरं मुंबईत बांधण्याचा मानस आहे. क्लस्टरच्या माध्यमातून मुंबईचा सुनियोजित विकास होणार – एकनाथ शिंदे
-
16 तारखेला मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल आणि मेकओव्हर होईल – एकनाथ शिंदे
आजचा वचननामा मुंबईकरांसाठी बदल घडवणारा असेल. केंद्रात एनडीएचं सरकार आहे, राज्यात महायुती सत्तेवर आहे. 16 तारखेला मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल आणि खऱ्या अर्थाने मुंबईचा मेकओव्हर सुरू होईल – एकनाथ शिंदे.
-
मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध
मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा थोड्याच वेळात होणार प्रसिद्ध. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदें व्यासपीठावर उपस्थित. थोड्याच वेळात होणार प्रकाशन
-
गोदाकाठावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन
नाशिक | गोदाकाठावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे बंधूंच्या सभेंवर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपोवनसह कुंभमेळा आणि दत्तक नाशिकच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे देखील नाशिककरांचे लक्ष आहे.
-
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीतील वाळू घाटात फायरिंग झाल्याची चर्चा..
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीतील वाळू घाटात फायरिंग झाल्याची चर्चा सुरु आहे. मध्यरात्री वाळूची वाहतूक घाटातून सुरू असताना फायरिंग झाल्याची घटना घडली. रात्रीला वाळूची वाहतूक करणाऱ्यांमध्ये वाद, वादातून हवेत फायर केल्याची घटन समोर येत आहे. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
-
शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा ?
आनंदवली परिसरात अज्ञाताने मंतरलेले तांदूळ फेकल्याचा आरोप होत आहे. अनेक भागात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना हळद-कुंकू लावलेले तांदूळ आढळून आले. आम्हाला हरवण्यासाठी विरोधकांकडून जादूटोणा आणि करणी झाल्याचा आरोप शिवसेना उमेदवार विलास शिंदे यांनी केला आहे. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
-
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला मुदत द्या…
राज्य निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी करत आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला मुदत द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
-
ऐन महापालिका निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का
शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख दादा पवारांचा ठाकरे गटात प्रवेश. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर सहसंपर्क प्रमुख दादा पवारांना अश्रू अनावर. शेकडो समर्थकासह शिवसेना ठाकरे गटात केला प्रवेश. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींच्या उपस्थितीत केला प्रवेश
-
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार सभांचा धुमधडाका
छत्रपती संभाजीनगर शहरात आज विविध पक्षांच्या प्रचार सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी चार वाजता टीव्ही सेंटर भागात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
-
संजय राऊत यांचा भाजपावर जोरदार निशाणा
महापालिका निवडणुकीत विकासावर बोला असे संजय राऊत यांनी नुकताच भापजाला म्हणत निशाणा साधला आहे.
-
भाजपाने तिसऱ्यांदा घेतली माघार- संजय राऊत
आरोपीला पद देण्याचे धाडस यांच्यात कुठून येते म्हणत संजय राऊत यांनी म्हटले की, भाजपाने तिसऱ्यांदा अशाप्रकारची माघार घेतली आहे.
-
पिंपरी-चिंचवडसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. आज दुपारी ४ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा सादर केला जाईल. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचा वचननामा प्रसिद्ध केला होता, त्याला उत्तर देताना अजित पवार पिंपरी-चिंचवडकरांसाठी कोणत्या नवीन घोषणा आणि विकासाचे मुद्दे मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि शहरातील पायाभूत सुविधांवर या जाहीरनाम्यात भर राहण्याची शक्यता आहे.
-
देवेंद्र फडणवीसांनंतर नितीन गडकरींची प्रकट मुलाखत
नागपूरमध्ये निवडणुकीच्या प्रचाराने वेगळीच रंगत सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘तर्री पोहा विथ देवभाऊ’ या कार्यक्रमानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही आगळीवेगळी मुलाखत पार पडणार आहे. भाजप शहर शाखेच्या वतीने १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता चना पोहा विथ नितीनजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरची प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक या कार्यक्रमात नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत घेणार आहे. त्यांच्याकडून नागपूरच्या भविष्यातील विकासावर चर्चा केली जाणार आहे. या अनोख्या उपक्रमामुळे नागपूरच्या राजकीय कट्ट्यावर आता चना पोह्याची चर्चा रंगू लागली आहे.
-
भाजपचा नागपूरसाठी वचननामा २०२६ आज होणार प्रसिद्ध; काय असणार खास?
नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. वचननामा- २०२६ या नावाने हा जाहीरनामा सकाळी १० वाजता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, हा जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजपने आधीच नागपूरकरांकडून त्यांच्या सूचना आणि मते मागवली होती. त्यामुळे जनतेने दिलेल्या अपेक्षांपैकी कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा या ‘वाचननाम्यात’ समावेश करण्यात आला आहे, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
-
नंदुरबारमध्ये माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला, दगडफेक करत गाडी जाळण्याचाही प्रयत्न
नंदुरबारमध्ये राजकीय वादातून शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले असून, हल्लेखोरांनी बाहेर उभी असलेली गाडी जाळण्याचाही प्रयत्न केला. शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुपारी किरकोळ वाद झाला होता, त्याचे रूपांतर रात्री या हल्ल्यात झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, ३० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-
पुण्याचे भविष्य कसे असेल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मांडणार विकासाचे व्हिजन
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी ७ वाजता संवाद पुणेकरांशी या विशेष कार्यक्रमातून शहराच्या विकासाचा आराखडा मांडणार आहेत. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक या पुणेकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणार आहेत. हा कार्यक्रम जरी निमंत्रितांसाठी असला, तरी तो शहरातील १०० हून अधिक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवला जाणार आहे. याद्वारे सुमारे ५ लाख पुणेकर मुख्यमंत्र्यांचे पुण्यासाठीचे ‘व्हिजन’ जाणून घेतील.
-
नागपूर मनपा निवडणूक: ठाकरे आणि पवार गटाची हातमिळवणी; एकमेकांच्या उमेदवारांना जाहीर केला पाठिंबा
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रभागांमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तिथे पवार गट त्यांना साथ देणार, तर जिथे पवार गटाचे उमेदवार रिंगणात आहेत तिथे ठाकरे गट त्यांना पाठिंबा देणार आहे. एकमेकांविरुद्ध उमेदवार न उभे करता मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही नवी रणनीती आखली आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांनी अधिकृत पत्रक काढून आपल्या कार्यकर्त्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत, ज्यामुळे नागपूरच्या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.
-
नागपुरात आज प्रचाराचा धडाका, शेवटच्या रविवारी रॅली आणि सभांनी रंगणार सुपर संडे
नागपूरमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. १५ जानेवारीला मतदान होणार आहे, त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी आज उमेदवारांचा जोर पाहायला मिळणार आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पदयात्रा, रॅली आणि सभांचे आयोजन करण्यात आले आहे. थंडी असली तरी नागपूरचे राजकीय वातावरण आज चांगलेच तापणार असून प्रत्येक उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर देत आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. मुंबईत आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक संयुक्त सभा होणार आहे. शिवशक्तीच्या या जागरामुळे सर्वांचे लक्ष शिवाजी पार्ककडे लागले आहे. तर दुसरीकडे, महायुती आज मुंबईसाठीचा वचननामा प्रसिद्ध करणार आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोफा धडाडणार आहेत. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी आज आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, राजकारण, मनोरंजन, क्रीडा क्षेत्राताली महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Jan 11,2026 8:58 AM
