Maharashtra Coronavirus LIVE Update : साताऱ्यात दिवसभरात 881 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह, 28 बाधितांचा मृत्यू 

| Updated on: Jun 11, 2021 | 12:05 AM

राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत

Maharashtra Coronavirus LIVE Update : साताऱ्यात दिवसभरात 881 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह, 28 बाधितांचा मृत्यू 
CORONA

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jun 2021 08:57 PM (IST)

    साताऱ्यात दिवसभरात 881 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह, 28 बाधितांचा मृत्यू 

    सातारा कोरोना अपडेट

    आज 881 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

    आज दिवसभरात 28 बाधितांचा मृत्यू

    1453 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

    आज अखेर सातारा जिल्ह्याची कोरोना आकडेवारी

    एकूण नमुने -889182

    एकूण बाधित रुग्ण – 178232

    घरी सोडण्यात आलेले रुग्ण -163439

    एकूण मृत्यू -3968

    उपचारार्थ रुग्ण-10774

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 10 Jun 2021 07:56 PM (IST)

    सांगली मनपा क्षेत्रात कोरोना नियमाचे उल्लंघन, 3 आस्थापनांवर महापालिकेची कारवाई

    सांगली- मनपा क्षेत्रात कोरोना नियमाचे उल्लंघन

    3 आस्थापनांवर महापालिकेची कारवाई

    मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार उपायुक्त रोकडे यांच्या टीमची कारवाई

  • 10 Jun 2021 07:04 PM (IST)

    नागपुरात आज 91 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    नागपुरात आज 91 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    401 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या - 476179

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 464835

    एकूण मृत्यूसंख्या - 8988

  • 10 Jun 2021 07:04 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 261 जण कोरोनाबधित तर 333 जण कोरोनामुक्त 

    पुणे- पुणे शहरात आज फक्त 10 मृत्यूची नोंद

    शहरात मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली

    दिवसभरात 261 जण कोरोनाबधित तर 333 जण कोरोनामुक्त

    शहरात 3 हजार 457 सक्रिय रुग्ण

    आत्तापर्यंत शहरात ४ लाख 73 हजार 300 कोरोनाबधित रुग्ण

  • 10 Jun 2021 06:24 PM (IST)

    मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महावितरणकडून 5 कोटींचा निधी

    मुंबई : मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी महावितरण आणि महानिर्मितीकडून अनुक्रमे 5 कोटी 17 लाख 34 हजार 631 रुपये आणि 1 कोटी 2 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुपूर्द केला.

  • 10 Jun 2021 06:11 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 51 रुग्ण पॉझिटिव्ह, 278 जण कोरोनामुक्त

    अकोल्यात कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 51 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकचा मृत्यू

    आतापर्यंत 1106 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 53923 जणांची कोरोनावर मात

    तर सध्या 1929 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 278 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 10 Jun 2021 05:53 PM (IST)

    केंद्रिय नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून पुणे विभागासाठी 7 हजार ॲम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन

    पुणे : राज्यासह पुणे जिल्हयात मागील काही आठवड्यापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. यांच्यावर योग्य ते उपचार विविध ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सुरु आहेत. पण म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲम्फोटेरेसिन-बी इंजेक्शनची कमतरता भासत होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने 50 हजार ॲम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले आहेत. पुणे विभागासाठी कंपनीने आज पाच हजार ॲम्फोटेरेसिन-बी इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

  • 10 Jun 2021 05:32 PM (IST)

    उद्यापासून मनमाडमध्ये प्रवाशांना मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट

    मनमाड : उद्यापासून प्रवाशांना मिळणार प्लॅटफॉर्म तिकीट

    10 रुपयात मिळणार प्लॅट फॉर्म तिकीट

    भुसावळ मंडळातील सर्व रेल्वे स्थानकावर मिळणार तिकीट

    कोरोनामुळे काही ठराविकच रेल्वे स्थानकावर मिळत होते प्लॅटफॉर्म तिकीट

    रेल्वे प्रशासनाची माहिती

  • 10 Jun 2021 04:29 PM (IST)

    राज्यात 16 जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार, म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन

    मुंबई : राज्यात दर वर्षी 10  जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त आजपासून ते 16 जून पर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. याकाळात कोरोनापश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले असून गेल्या वर्षभरात कोरोनाकाळातही सुमारे 2 लाख 28 हजार मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • 10 Jun 2021 04:27 PM (IST)

    महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण

    मुंबई : राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 50 लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

    लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात 2 कोटी 7 हजार 70 गरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे 50 लाख 8 हजार 476  एवढी आहे.

  • 10 Jun 2021 04:14 PM (IST)

    नाना पटोले दौऱ्यावर असताना कारंजा येथे कोरोना नियमांचे उल्ल्ंघन, 200 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

    वाशिम : कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे वाशिम जिल्ह्या लेव्हल 3 मध्ये असून निर्बंधांबाबत शिथिलता देण्यात आली आहे. मात्र काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जिल्हा दौऱ्यावर असताना कारंजा येथे इसुफ पुंजानी यांनी 58 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळं सोशल डिस्टस्टिंगचा फज्जा उडल्याचं दिसून आलंय. त्यामुळं नाना पटोले यांनी अवघ्या पाच मिनिटांत कार्यक्रम उरकून वाशिमकडे निघाले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी झाली होती. आज कारंजा पोलिसांनी आयोजकांसह 200 कार्यकर्त्यांवर साथरोग कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • 10 Jun 2021 11:02 AM (IST)

    पोलिसांच्या मुलांचं वॅक्सिनेशन गरजेचं, भाई जगताप यांचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र

    पोलिसांच्या मुलांचं वॅक्सिनेशन गरजेचं, पोलीस कोव्हिड योद्धे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना भाई जगताप यांनी लिहीलं पत्र

    पोलिसांच्या कुटूंबाचं वमक्सिनेशन व्हायला हवं

  • 10 Jun 2021 10:37 AM (IST)

    मुंबई प्रदेश युथ कांग्रेसकडून बीकेसी पोलीस ठाण्यात पलिसांना मास्क आणि सॅनिटायझर, स्टिमचं वाटप

    - मुंबई प्रदेश युथ कांग्रेसकडून बीकेसी पोलीस ठाण्यात पलिसांना मास्क आणि सॅनिटायझर, स्टिमचं वाटप

    - भाई जगताप आणि गृहराज्यमंत्री बंटी सतेज पाटील राहणार उपस्थित

    - वेस्ट झोनचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, एडीशनल सीपी उपस्थित

  • 10 Jun 2021 09:47 AM (IST)

    बीकेसी जम्बो कोव्हिड वॅक्सिनेशन सेंटरमध्ये दोन भविय मंडपाचं काम पूर्ण

    - बीकेसी जम्बो कोव्हिड वॅक्सिनेशन सेंटरमध्ये दोन भविय मंडपाचं काम पूर्ण

    - हजार लोकांच्या बसण्याची क्षमता असलेलं सेंटर तयार

    - तैक्ते चक्रीवादळात मंडपाची दुरावस्था झाल्यानंतर मंडपाची ऊभारणी करण्यात आली

    - आज वॅक्सिनेशन सेंटरमध्ये १० ते ३ पर्यंत होणार आॅनलाईन अपाॅईंटमेंटने व्हॅक्सिनेशन

    - १८ ते ४४ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज, ४५ च्या वरील ८० टक्के लोकांना पहीला तर २० टक्के लोकांना दुसरा डोज दिला जाणार

  • 10 Jun 2021 09:45 AM (IST)

    पुण्यात लॉकडाऊनच्या काळात घरगुती किरकोळ वादाच्या पत्नीविरोधात दीड हजार तक्रारी

    पुणे -

    लॉकडाऊनच्या काळात घरगुती किरकोळ वादात...

    पुण्यात पत्नीविरोधात दीड हजार तक्रारी...

    लॉकडाऊन काळात कौटुंबिक कलहाची झळ पुरुषांनाही...

    दीड वर्षात १ हजार ५३५ पुरुषांनी पत्नी विरोधात पोलीस ठाण्यात केल्या तक्रारी....

    महिलांच्याही दीड वर्षात जवळपास दीड हजार तक्रारी पती विरोधात...

    मात्र यंदा पत्नी विरोधात तक्रारी देण्याचे प्रमाण वाढले

    पुणे पोलिसांच्या भरोसा सेल कडे झालेल्या आकडेवारीत बाब समोर...

    आत्तापर्यंत भरोसा सेल कडून २ हजार ३९४ तक्रारी निकाली काढण्यात आल्यात

  • 10 Jun 2021 09:42 AM (IST)

    कर्जत उपविभागीय अधिकारी वैशारी परदेशी यांनी कर्जत आणि खालापुर तालुक्यातील 23 ठिकणी प्रवेश बंदी

    रायगड -

    खालापुर - कर्जत

    कर्जत उपविभागीय अधिकारी वैशारी परदेशी यांनी कर्जत व खालापुर तालुक्यातील 23 ठिकणी प्रवेश बंदी केली आहे

    हवामान खात्याने १० व ११ जुन रोजी रायगड जिल्ह्यामध्ये अतिव्रुष्टी व वादळीवा-याचा ईशारा दिला आहे.

    त्या अनुषगांने खालापुर तालुक्यातील १२ व कर्जत तालुक्यातील ११ धबधबे, धरण, तलाव क्षेत्रात नागरिकांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली आहे.

  • 10 Jun 2021 08:17 AM (IST)

    सांगलीतील जनजीवन येत आहे पूर्वपदावर

    सांगली -

    सांगलीतील जनजीवन येत आहे पूर्वपदावर

    जिल्ह्यातील बहुतांश व्यवहार होत आहेत सुरळीत

    मात्र कापडपेट ,सराफ बाजार व्यापारी दुकानं उघडणे च्या प्रतीक्षेत

    कोरोनाच्या संख्या कमी झालेने शासनाने थोडीशी शिथिलता दिली

    मात्र कोरोना नियमाचे पालन करावे

    असे प्रशासनानं केले आवाहन

    सध्या कोरोना ची संख्या 800 ते 900 च्या घरात

  • 10 Jun 2021 07:52 AM (IST)

    नाशकात कोरोनानंतर डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुगणांची संख्या वाढली

    नाशिक - कोरोनानंतर डेंग्यू, चिकनगुनियाच्या रुगणांची संख्या वाढली

    मनपाकडून उपाययोजनांवर भर

    जून महिन्यात डेंग्यूचे 44 रुग्ण आढळले

    मनपा च्या आरोग्य विभागाकडून शहरात तपासणी मोहिमेला सुरुवात

  • 10 Jun 2021 07:04 AM (IST)

    राज्यातील वैद्यकीय परीक्षा आजपासून, करोनामुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुन्हा संधी

    मुंबई-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा आज गुरुवारपासून सुरू होत

    ज्या विद्यार्थ्यांना करोनामुळे परीक्षेस उपस्थित राहता येणार नाही, त्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली

  • 10 Jun 2021 07:02 AM (IST)

    केरळमध्ये ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आजारी व्यक्तींचे घरोघरी जाऊन लसीकरण

    केरळ, बिहार, जम्मू-काश्मीर, ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश ही राज्ये, तर वसई-विरारसारखी पालिका घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवत असताना केंद्र सरकारची त्यासाठी नकारघंटा का,

    अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

  • 10 Jun 2021 07:01 AM (IST)

    आठवडय़ाभराचा लससाठा उपलब्ध केल्यास नोंदणीतील समस्या दूर

    राज्य सरकारने आठवडा महिन्यासाठीचा लससाठा उपलब्ध केला तर ‘कोविन’ या संकेतस्थळावरून तेवढ्या दिवसांसाठीची लसीकरण नोंदणी योजना आखणे शक्य होईल, असा दावा मुंबई पालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात केला.

  • 10 Jun 2021 07:00 AM (IST)

    लसीकरणाचा लाखाचा टप्पा पूर्ण

    शहरात लसीकरणासाठी पालिकेने ५० केंद्रांचे नियोजन केले आहे

    सध्या ३३ केंद्रांवर लसीकरण होत आहे

    ३ लाख ८९ हजार जणांना एक मात्रा

    १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण सुरू झाले

    आतापर्यंत १ लाख ९९६ नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत

Published On - Jun 10,2021 6:22 AM

Follow us
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.