Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 26 हजार 133 नवे रुग्ण, 682 जणांचा मृत्यू

| Updated on: May 22, 2021 | 11:14 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात दिवसभरात 26 हजार 133 नवे रुग्ण, 682 जणांचा मृत्यू
corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 May 2021 09:54 PM (IST)

    दिलासादायक ! पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात 5374 रुग्णांची कोरोनावर मात

    पिंपरी चिंचवड

    -शहरासाठी दिलासादायक आज सर्वात जास्त 5374 जण कोरोनामुक्त,641 नवीन रुग्णांची नोंद

    -तर आज 42 जणांचा कोरोनाने मृत्यू

    -शहरातील आतापर्यंत कोरोनाबाधित संख्या 2 लाख 46 हजार 54 इतकी तर कोरोनामुक्त संख्या 2 लाख3 34 हजार 392 इतकी

    -शहरात सध्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सक्रिय रुगांची संख्या 4448 इतकी तर होमआयसोलेशन मध्ये 3352 इतकी

  • 22 May 2021 09:11 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 26 हजार 133 नवे रुग्ण, 682 जणांचा मृत्यू

    राज्यात आज 26 हजार 133 नवे रुग्ण 40 हजार 294 रुग्णांनी केली कोरोनावर मात 682 रुग्णांचा मृत्यू

  • 22 May 2021 09:09 PM (IST)

    खेड तालुक्यातील लाजीरवाणा प्रकार, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारू पार्टी

    खेड, पुणे

    -खेड तालुक्यातील लाजिरवाना प्रकार समोर, जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिकन आणि दारू पार्टी

    -खेड तालुक्यातील टाकळकरवाडी मधील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील घटना

    -या घटनेबाबत शाळेच्या मुख्याधापकानी तक्रार केल्यानंतर खेड पोलिसांनी चार तळीरामा विरुद्ध केला गुन्हा दाखल करत ताब्यत घेण्यात आले होते

    -अनुप टाकळकर,मयूर टाकळकर,निखिल येवले,राजेश पवार असं गुन्हा दाखल केलेल्या तळीराम आरोपीची नावे

    -गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या आवरता दारू,चिकन पार्टीचे प्रकार सुरू होता

    -ह्या चार आरोपी विरुद्ध सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्या अंतर्गत तसेच कलम 188,269 प्रमाणे गुन्हे दाखल

  • 22 May 2021 08:58 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 577 नवे रुग्ण, 11 जणांचा मृत्यू

    उस्मानाबाद कोरोना अपडेट :

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 577 रुग्ण व 11 मृत्यू तर 477 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 120, तुळजापूर 127,उमरगा 49, लोहारा 45, कळंब 65, वाशी 77, भूम 53 व परंडा 41 रुग्ण

    1 मे - 667 रुग्ण - 19 मृत्यू 2 मे - 486 रुग्ण - 09 मृत्यू 3 मे - 814 रुग्ण - 13 मृत्यू 4 मे - 786 रुग्ण - 11 मृत्यू 5 मे - 783 रुग्ण - 07 मृत्यू 6 मे - 813 रुग्ण - 24 मृत्यू 7 मे - 660 रुग्ण - 08 मृत्यू 8 मे - 628 रुग्ण - 11 मृत्यू 9 मे - 712 रुग्ण - 08 मृत्यू 10 मे - 833 रुग्ण - 14 मृत्यू 11 मे - 676 रुग्ण - 11 मृत्यू 12 मे - 569 रुग्ण - 13 मृत्यू 13 मे - 623 रुग्ण - 08 मृत्यू 14 मे - 458 रुग्ण - 15 मृत्यू 15 मे - 607 रुग्ण - 12 मृत्यू 16 मे - 492 रुग्ण - 09 मृत्यू 17 मे - 547 रुग्ण - 07 मृत्यू 18 मे - 400 रुग्ण - 11 मृत्यू 19 मे - 449 रुग्ण - 08 मृत्यू 20 मे - 534 रुग्ण - 11 मृत्यू 21 मे - 514 रुग्ण - 08 मृत्यू 22 मे - 577 रुग्ण - 11 मृत्यू

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4671 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद - 2 लाख 77 हजार 056 नमुने तपासले त्यापैकी 51 हजार 977 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 18.76 टक्के

    46 हजार 136 रुग्ण बरे 88.76 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 1170 तर 2.25 टक्के मृत्यू दर

  • 22 May 2021 08:49 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी 25 मे ते 1 जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन

    सातारा जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी 25 मे ते 1 जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन

    भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लाॅज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः राहणार बंद

    दूध संकलन केंद्रे फक्त दोन तास राहणार सुरु

    पेट्रोल फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी होणार उपलब्ध

    आरोग्य सेवेशी निगडीत सर्व सेवा राहतील सुरु

    जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश केले लागु

  • 22 May 2021 07:52 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात दिवसभरात 1878 नवे कोरोनाबाधित, 31 रुग्णांचा मृत्यू

    सातारा कोरोना अपडेट :

    सातारा जिल्ह्यात आज 1663 कोरोनामुक्त तर जिल्ह्यात 1878 जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह

    जिल्हयात आज 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात सध्या 17,820 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    सातारा जिल्ह्यात एकूण 3390 कोरोना रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,25,433 रुग्ण झाले कोरोनामुक्त

    जिल्हयात आतापर्यंत एकूण 1,46,656 रुग्ण झाले कोरोना बाधित

  • 22 May 2021 07:49 PM (IST)

    परभणीत जिल्हा परिषद कोविड रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटमध्ये बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

    परभणी :

    शहरातील जिल्हा परिषद कोविड रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांटमध्ये बिघाड

    टेस्टिंग करत असताना प्लांटच्या इगझोस्ट पाईप मध्ये झाला बिघाड

    आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा असल्याने पुढील अनर्थ टळला

    जिल्हाधिकारी आणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळी भेट

  • 22 May 2021 07:02 PM (IST)

    विरोधक हे ब्लॅक फंगस आहेत : संजय राऊत

    पुणे :

    - विरोधक हे ब्लॅक फंगस आहेत,

    - संजय राऊतांचा शिवसैनिकांना सल्ला देतांना विरोधकांवर टीका,

    - कोरोना महामारीत मुंबईत चांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह मोदींनीही कौतुक केलंय, मात्र विरोधक त्यावर टीका करतायत,

    - शिवसैनिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून कामाकडे लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, राऊतांचा भाजप नेत्यावर निशाना,

    - पुण्यात कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्घाटनावेळी संजय राऊत बोलत होते.

    भाजप आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर

    मागच्या दिड वर्षापासुन ब्लँक फंगस हा ह्या महाराष्ट्राला लागला आहे महाविकास आघाडीच्या नावाने महाराष्ट्राला ब्लँक फंगस बोलताना भान ठेवून बोला 2 हजार 200 कोटीचां भ्रष्टांचार महापालिकेत झाला मेलेल्या लोकांच्या टाळुवरच काम शिवसेनेने केल आहे कोरोनाच्या काळात भ्रष्टाचार हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ह्या महाविकास आघाडीच्या काळात झाला - प्रसाद लाड

  • 22 May 2021 06:24 PM (IST)

    नागपूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा, 24 तासांत 2872 रुग्णांची कोरोनावर मात

    नागपूर : - नागपूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा, २४ तासांत २८७२ रुग्णांनी केली कोरोनावर मात

    - जिल्हयात गेल्या २४ तासांत १०६८ नव्या रुग्णांची भर

    - २४ तासांत जिल्ह्यात २६ कोरोनाबाधीतांचा मृत्यू

    - कोरोनामुक्तांचं प्रमाण वाढल्याने, सक्रिय रुग्णसंखा घटली

    - जिल्ह्यात सध्या १५२४२ सक्रिय कोरोना रुग्ण

    - गेल्या २४ तासांत १९६३४ जणांची कोरोना चाचणी

  • 22 May 2021 06:20 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 840 नवे कोरोनाबाधित, 63 रुग्णांचा मृत्यू

    पुणे : - दिवसभरात ८४० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १९४९ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ६३ रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील. - १३०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६४९१६. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२३३०. - एकूण मृत्यू -७९६८. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४४६१८. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११३८०.

  • 22 May 2021 05:54 PM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन शिथिल होणार

    कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या रविवारपासून सुरू होते कडक लॉकडाऊन

    जिल्हा प्रशासनाकडून थोड्याच वेळात घोषणा होणार

    राज्य सरकारच्या लॉकडाऊनचे नियम मात्र कायम राहणार

  • 22 May 2021 05:19 PM (IST)

    वाशिममध्ये 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 312 नव्या रुग्णांची नोंद

    वाशिम  जिल्ह्यात पुनः कोरोनाचा उद्रेक ...

    जिल्ह्यात आज 14 रुग्णांचा मृत्यू ...

    312 नवे रुग्ण आढळले तर 588 जणांना देण्यात आला डिस्चार्ज...

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 8 दिवसात 51 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 3286 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 4008 कोरोनामुक्त झालेत...

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 37971

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 3756

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 33807

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 407

  • 22 May 2021 04:15 PM (IST)

    केंद्र सरकारकडून म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा पुरवठा कमी : नितीन राऊत

    नितीन राऊत :

    - म्युकरमायकोसिसचे रुग्ण शहरात वाढताहेत,

    - या आजारावरील इंजेक्शन हे केंद्र सरकारकडून प्राप्त होतात

    - एका रुग्णाला तीस तीस इंजेक्शन लागतात, मात्र मिळतात फक्त 200 इंजेक्शन

    - मुळात इंजेक्शनचा तुटवडा आहे, केंद्र सरकारला आम्ही कोटा वाढवून देण्याची मागणी केली होती, मात्र कोटा वाढवून दिलेला नाही,

    - इंजेक्शनची निर्मिती केंद्र सरकारनं आपल्याकडे घेतली आहे, ते ज्या पद्धतीनं देतील त्या पद्धतीनं वाटप होईल,

    - कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे, अमरावती चे उदाहरण आपल्यापुढं आहे, त्यामुळं लॉक डाऊन काढतांना हळू हळू आणि ज्यांना दुकानं उघडण्याची परवानगी मिळेल त्यांची चाचणी आणि लसीकरण करण्यासंदर्भात नियमावली तयार केलीय,

    - लहान मुलांसाठी 700 बेड्स चे कोविड सेंटर उभं केलं जाणार आहे, सुरुवातीला 350 ब्रेड्स उपलब्ध होतील, 50 कोटी रुपये csr मधून निधी मी उपलब्ध करून दिलाय,

    - मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणासंदर्भात दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली, यातील कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत, मी त्यांना एक पत्रही दिलाय, मंत्रिमंडळातील उपसमितीची बैठक घेण्याची विनंती केली आहे, बैठक झाली की निर्णय करू,

    - चक्रीवादळा नुकसान झालं असलं तरी प्राणहानी झालेली नाही, उर्जा विभागाचं नुकसान कमी आहे, 90 टक्के काम आमच्या विभागाचं झालेलं आहे, दोन दिवसात इतर कामे पूर्ण होतील

  • 22 May 2021 01:06 PM (IST)

    रत्नागिरीत म्युकरमायकोसिस संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

    रत्नागिरीत म्युकरमायकोसिस संशयित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

    संशयित रुग्ण राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या संस्थेमध्ये ड्रायव्हर असल्याची माहिती.

    म्युकर मायकोसिसचा कोकणातही शिरकाव

    संशयीत रुग्ण चिपळूण मधील नायशी गावातला रहिवासी.

    संशयित रुग्णाचा कोरोना अहवाल होता पॉसिटीव्ह.

    चिपळूण मधील कामथे रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास

  • 22 May 2021 12:13 PM (IST)

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बाणेरच्या कोविड सेंटरला भेट देणार

    पुणे -

    - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थोड्याच वेळात बाणेरच्या कोविड सेंटरला भेट देणार,

    - बाणेरच्या कोविड सेंटरसाठी चंद्रकांत पाटील यांनी एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे,

    - या माध्यमातून कोविड सेंटरसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याची पहाणी आणि आढावा पाटील घेणार आहेत,

    - यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त विक्रम कुमार, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित राहणार आहेत.

  • 22 May 2021 11:27 AM (IST)

    जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत कोवॅक्सिनचा समावेश नाही

    जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत कोवॅक्सिनचा समावेश नाही

    स्वदेशी करोवॅक्सिन लस घोतलेल्या नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर रोख लागण्याची शक्यता,

    सीरमच्या कोविशील्ड लशीचा आपत्कालीन यादीत समावेश

  • 22 May 2021 11:24 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी

    - पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी

    - जिल्ह्यात एकूण ३५३ म्युकर मायकोसिस रुग्ण

    - सर्वाधिक ११ मृत्यू पुणे शहर हद्दीत

    - उपचारानंतर २१२ रुग्ण म्युकर मायकोसिसमधून बाहेर

    - सध्या ११५ जणांवर उपचार सुरु

  • 22 May 2021 11:21 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात गेल्या वीस दिवसात मास्क न घालणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई

    पुणे -

    - पुणे जिल्ह्यात गेल्या वीस दिवसात मास्क न घालणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई

    - वीस दिवसात प्रशासनाने वसूल केला तब्बल ५ कोटी दंड

    - १ लाख ४ हजार ८१ जणांवर मास्क न घातल्याची कारवाई

    - कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही नागरिक मात्र बेफिकीर

    - पुणे शहरात २० दिवसात तब्बल ७५ हजार नागरिकांवर कारवाई

    - पुणे जिल्ह्यात कोरोना महामारीमध्ये सव्वा वर्षात तब्बल ३० कोटीहून अधिक दंड वसूल

  • 22 May 2021 08:36 AM (IST)

    सोलापूर रेल्वे हॉस्पिटल उभारणार ऑक्सिजन प्लांट

    सोलापूर- रेल्वे हॉस्पिटल उभारणार ऑक्सिजन प्लांट

    रेल्वे हॉस्पिटलच्या प्रांगणात होणार प्लांटची उभारणी

    तासाला 240 लिटर ऑक्सिजन निर्मितीची  क्षमता असणार

  • 22 May 2021 07:28 AM (IST)

    औरंगाबादेत गेल्या 10 दिवसात 220 लहान मुलांना कोरोनाची लागण

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    औरंगाबादेत लहान मुलांभोवती कोरोनाचा फास अवळायला सुरुवात

    गेल्या 10 दिवसात 220 लहान मुलांना कोरोनाची बाधा

    पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात लहान मुलांना झाला कोरोनाचा संसर्ग

    0 ते 5 वयोगटातील 48 लहान मुलांना कोरोनाची बाधा

    तर 6 ते 18 वर्ष वयोगटातील 171 मुलांना कोरोनाची बाधा

    लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढू लागल्यामुळे वाढली चिंता

  • 22 May 2021 07:20 AM (IST)

    नागपुरात भाजीपाला फेकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी सुरु

    - नागपुरात भाजीपाला फेकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी सुरु

    - जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांना कारणं दाखवा नोटीस

    - नागपूर पोलीस आयुक्तालयातून बदावला ‘शो कॅाज’ नोटीस

    - पोलीस उपनिरीक्षक यांच्यावर कारवाईचे संकेत

    - नागपूर पोलीस पोलीसांच्या ट्वीटरवरुन दिले कारवाईचे संकेत

  • 22 May 2021 07:19 AM (IST)

    कोल्हापुरातील एचआयव्ही ग्रस्त अनाथ मुले कोरोनाच्या विळख्यात

    कोल्हापूर

    कोल्हापुरातील एचआयव्ही ग्रस्त अनाथ मुले कोरोनाच्या विळख्यात

    शिये इथल्या करूणालाय बालगृहातील 8 मुले कोरोना पॉझिटिव्ह

    बालगृहातील एकूण 27 जणांची करण्यात आली होती तपासणी

    सर्व बाधित मुलांची प्रकृती स्थिर

    सर्वांना शिवाजी विद्यापीठाच्या डीओटी सेंटर मध्ये हलवल

  • 22 May 2021 07:17 AM (IST)

    सासवड शहरात विनापरवाना कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट करणारी लॅब सील

    पुणे -

    - सासवड शहरात विनापरवाना कोविड रॅपिड अँटिजेन टेस्ट करणारी लॅब सील,

    - खासगी रुग्णालयाशी संलग्न या पॅथेलाॅजी लॅबवर तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी कारवाई केलीय,

    - या लॅबमध्ये आरोग्य विभागाची परवानगी नघेता रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या जात होत्या,

    - या संबंधित लॅबमधील शासन यंत्रणेच्या परस्परचे विनापरवाना तपासणीचे कर्मचाऱ्यांमार्फतचे कामकाज थांबावे, यासाठी ही लॅब सील करण्यात आली.

  • 22 May 2021 07:17 AM (IST)

    आता नागपुरातही तयार होणार म्युकरमायकोसिसचं इंजेक्शन

    - आता नागपुरातही तयार होणार म्युकरमायकोसिसचं इंजेक्शन

    - युनिझुल्स लाईफ सायन्सेस कंपनीला अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मंजुरी

    - वर्ध्यानंतर आता नागपूरातंही तयार होणार एमफोटेरेसीन बी इंजेक्शन

    - नागपूरातील उत्पादनाने विदर्भात एमफोटेरेसीन बी चा तुटवडा कमी होणार

    - सध्या नागपूरात म्युकरमायकोसीस इंजेक्शनचा मोठा तुटवडा

  • 22 May 2021 07:16 AM (IST)

    पुणे महापालिकेला सरकारकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने आज शहरातील लसीकरण मोहीम बंद राहणार

    पुणे -

    - महापालिकेला सरकारकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने आज शहरातील लसीकरण मोहीम बंद राहणार,

    - शहरात सध्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू आहे,

    - पालिकेला मंगळवारी साडे सात हजार कोव्हीशील्ड व बुधवारी अडीच हजार कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली,

    - त्यानुसार बुधवारी व गुरुवारी शहरात लसीकरण झाले.

    - मात्र त्यानंतर लस उपलब्ध न झाल्याने सलग दोन दिवस सर्व लसीकरण केंद्र बंद आहेत,

    - आतापर्यंत साडे नऊ लाख नागरिकांचा पहिला आणि दुसरा डोस पूर्ण झालाय.

  • 22 May 2021 07:15 AM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रम विकसित करण्याचे सूचना

    पुणे -

    - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रम विकसित करण्याचे सूचना,

    - ससुन रुग्णालयास जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांचे पत्र,

    - कोरोना विषाणूच्या वेगाने पसरत असलेल्या संसर्गामुळे प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत,

    - महामारी काळातील मार्गदर्शक तत्वे अभ्यासक्रमाच्या स्वरूपात अंतर्भूत करावीत अशा स्वरूपाचे पत्र ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना देण्यात आले,

    - जिल्हा परिषद आणि ससूनच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासक्रम तयार करण्यात येणार,

    - अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र किंवा डिप्लोमाची पदवी दिली जाणार.

  • 22 May 2021 07:06 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 955 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    नाशिक :

    गेल्या 24 तासांत पूर्ण बरे झालेले रुग्ण - 2394

    गेल्या 24 तासांत पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 955

    नाशिक मनपा - 468 नाशिक ग्रामीण - 465 मालेगाव मनपा - 022 जिल्हा बाह्य - 00

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4280

    गेल्या 24 तासांत एकूण मृत्यु - 46 नाशिक मनपा - 25 मालेगाव मनपा - 00 नाशिक ग्रामीण - 21 जिल्हा बाह्य - 00

  • 22 May 2021 07:00 AM (IST)

    कोरोनायोद्धा डॉक्टरची कोरोनामुळे मृत्यूशी झुंज सुरू, आर्थिक मदतीसाठी डॉक्टरच्या मित्रांचा सोशल मीडियावर टाहो

    औरंगाबाद :-

    कोरोनायोद्धा डॉक्टरची कोरोनामुळे मृत्यूशी झुंज सुरू

    लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तरुणावर औरंगाबादेत उपचार सुरू

    आर्थिक मदतीसाठी डॉक्टरच्या मित्रांचा सोशल मीडियावर टाहो

    औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचीही मदतीसाठी पोस्ट

    राहुल पवार असं मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाचे नाव

    फ्रंटलाईन वर्कर्स असूनही उपचारावरील खर्चासाठी सरकारकडून दुर्लक्ष

    लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करायचा आरोग्य सेवा

    आरोग्य सेवा करताना झाला होता कोरोनाचा संसर्ग

    आई-वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे उपचारावरील खर्चासाठी मिळेनात पैसे

    रुग्णालयातील सहकाऱ्यांनी उपचारासाठी जमवले 2 लाख

    तर आतापर्यंत उपचारावर झाला 8 लाखांचा खर्च

    मदतीसाठी सोशल मीडियात पोस्ट व्हायरल

  • 22 May 2021 07:00 AM (IST)

    कोरोनाची माहिती लपवली, सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी अंत

    कोरोनामुळे एकाच घरातील तिघांचा मृत्यू झालाय

    या कुटुंबाने कोरोना होऊनही माहिती लपवली होती

    ते घरीच उपचार घेत होते

    सांगली जिल्ह्यातील निरज तालुक्यातील टाकडी गावात संबंधित घटना घडली

Published On - May 22,2021 9:54 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.