Maharashtra Coronavirus LIVE Update : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू
corona

| Edited By: prajwal dhage

May 01, 2021 | 12:10 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले असून, राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 30 Apr 2021 11:17 PM (IST)

  चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

  चंद्रपूर : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या 35 वर्षीय डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

  डॉ. प्रशांत चांदेकर असं मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव,

  डॉ. चांदेकर हे औषधी विभागात असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत होते

  त्यांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

  ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना नागपूरला नेत असताना वरोरा शहराजवळ वाटेतच झाला मृत्यू

 • 30 Apr 2021 10:51 PM (IST)

  सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1280 नवे कोरोना रुग्ण

  सांगली कोरोना अपडेट

  जिल्ह्यात आज दिवसभरात 1280 नवे कोरोना रुग्ण

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 24 रुग्णांचा मृत्यू

  जिल्ह्यातील मृतांचा आकडा 2266 वर

  सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 13148 वर

  तर उपचार घेणारे 1026 जण आज कोरोनामुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 60264 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 75678 वर

 • 30 Apr 2021 08:12 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 4119 नव्या रुग्णांची वाढ 

  पुणे कोरोना अपडेट

  - दिवसभरात 4119 नव्या रुग्णांची वाढ

  - दिवसभरात 5013 रुग्णांना डिस्चार्ज

  - पुण्यात 87 कोरोनाबाधितांचा मृत्यू, २५ रूग्ण पुण्याबाहेरील

  - 1391 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

  - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 419518 वर

  - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या- 43244

  - एकूण मृत्यू - 6797 वर

  - एकूण कोरोनामुक्त -369477

 • 30 Apr 2021 07:51 PM (IST)

  सातारा जिल्हयात 2493 जण कोरोनाबाधित तर 32 कोरोनाबाधितांचा मृत्यू

  सातारा जिल्हयात आज 1851 रुग्ण झाले कोरोनामुक्त

  जिल्हयात 24 तासात 2493 जण कोरोनाबाधित तर 32 कोरोनाबाधितांचा मृत्यू

  जिल्हयात एकूण 82,375 रुग्ण कोरोनामुक्त

  जिल्हयात आतापर्यंत एकूण 2496 कोरोनाबाधितांचा मृत्यू

  सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांची माहिती

 • 30 Apr 2021 07:50 PM (IST)

  वसई विरारमध्ये आणखी 814 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

  वसई-विरार कोरोना अपडेट

  मागच्या 24 तासात 814 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

  तर आज दिवसभरात 15 जणांचा मृत्यू

  680 जणांनी केली कोरोनावर मात

  वसई विरार महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53,843 वर

  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 41,589 वर

  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1100 वर

  कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11154 वर

 • 30 Apr 2021 07:48 PM (IST)

  गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे 548 नवे रुग्ण

  गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

  आज वाढलेले रुग्ण - 548

  आज झालेले मृत्यू - 16

  आज बरे झालेले रुग्ण - 924

  तालुक्यानुसार रुग्णसंख्या

  गोंदिया--------------245

  तिरोडा--------------48

  गोरेगाव--------------42

  आमगाव-------------- 11

  सालेकसा------------- 19

  देवरी------------------ 18

  सडक अर्जुनी ----------- 73

  अर्जुनी मोरगाव-------- 85

  इतर राज्य--------------07

  एकूण रुग्ण - 33035

  एकूण मृत्यू - 539

  एकूण बरे झालेले रुग्ण - 26924

  एकूण उपचार घेत असलेले - 5571

 • 30 Apr 2021 06:15 PM (IST)

  Tv9 ची बातमी पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आमदार निलेश लंके यांना फोन

  अहमदनगर : Tv9 ची बातमी पाहून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आमदार निलेश लंके यांना फोन

  रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांचा आमदार निलेश लंके यांना फोन

  लंके यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरची बातमी पाहून पवारांनी केले लंके यांचं कौतुक

  "तू इतकं चांगलं कोविड सेंटर उभारलं मला कळालं, तू इतरांची काळजी घेतोय मात्र स्वतःची पण काळजी घे"

  "तुझ्या हातून अशीच सेवा घडत राहो, काही मदत लागल्यास कळव"

 • 30 Apr 2021 06:11 PM (IST)

  चंद्रपुरात गेल्या 24 तासात 1667 नव्या रुग्णांची नोंद

  चंद्रपूर: गेल्या 24 तासात, 1667 नव्या रुग्णांची नोंद

  24 तासात 28 मृत्यू

  एकूण कोरोना रुग्ण : 60312

  एकूण कोरोनामुक्त : 42823

  सक्रिय रुग्ण : 16584

  एकूण मृत्यू : 905

  एकूण नमूने तपासणी : 376722

 • 30 Apr 2021 06:11 PM (IST)

  नागपुरात मार्डच्या डॉक्टरांचं प्रतिकात्मक मूक आंदोलन

  नागपुरात मार्डच्या डॉक्टरांचं प्रतिकात्मक मूक आंदोलन

  डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात केलं प्रतिकात्मक मूक आंदोलन

  काही डॉक्टरांनी हातात बॅनर घेऊन डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा नोंदविला निषेध

 • 30 Apr 2021 06:09 PM (IST)

  रेमडेसिव्हीर आणि इतर साहित्य केंद्राच्या हातात आहे, केंद्र सरकारने राज्यावर अन्याय केलाय- नाना पटोले

  - रेमडेसिव्हीर आणि इतर साहित्य केंद्राच्या हातात आहे

  - सेवाभावी संस्थानी पुढे यावं,

  - केंद्र सरकारने राज्यावर अन्याय केलाय

  - देवेंद्र फडणवीस आणि मोदी खोटं बोलत आहेत. त्यांनी हे थांबवावे

  - जागतिक मदत सुरू झाली आहे, अनेक देश आता राज्याला मदत करत आहेत

 • 30 Apr 2021 06:03 PM (IST)

  नागपुरात आज 6461 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 7294 जणांनी केली कोरोनावर मात

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात आज 6461 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  दिवसभरात 7294 जणांनी केली कोरोनावर मात

  बधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची वाढली संख्या

  88 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने वाढली चिंता

  एकूण रुग्णसंख्या - 407787

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 323693

  एकूण मृत्यूसंख्या - 7388

 • 30 Apr 2021 06:00 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, 448 नवे रुग्ण, 6 जणांचा मृ्त्यू

  वाशिम कोरोना अलर्ट

  जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

  जिल्ह्यात आज 06 रुग्णांचा मृत्यू

  नवे आढळलेले रुग्ण- 448

  तर 322 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 30 दिवसात 109 रुग्णांचा मृत्यू

  तर नवे 11385 कोरोना रुग्ण आढळले

  जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 27460

  सध्या सक्रिय  रुग्ण– 4009

  आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले रुग्ण – 23154

  आतापर्यंत एकूण मृत्यू – 296

 • 30 Apr 2021 05:55 PM (IST)

  गडचिरोली जिल्ह्यात 16 जणांचा मृत्यू, 519 नव्या रुग्णांची नोंदो

  गडचिरोली : आज जिल्हयात 519 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तसेच आज 577 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 21177 पैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 16225 वर पोहचली.

 • 30 Apr 2021 04:45 PM (IST)

  ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला, व्यवस्थित नियोजन करावे- देवेंद्र फडणवीस

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये रुग्णालयाला भेट दीली. यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. सध्या रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रुग्णालयांमध्ये स्वच्छता होणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या अडचणी आहेत. त्यामुळे आता विभागीय आयुक्ताना भेटलो. आठवड्याला दोन जास्तीचे टँकर मागवून घेतली आहे. नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा पुरवठा वाढला पाहीजे. सध्या पीएम केअर फंडातून एकूण 4 ऑक्सिजन प्लांट नाशिकमधून मिळत आहेत, असे ते म्हणाले.

  आपल्याला माहिती आहे की देशात सर्वात जास्त ऑक्सिजन मिळाला आहे. जिथे बलशाली नेते तिथे ऑक्सिजन, जिथे बलशाली नेते तिथे रेमडेसिव्हीर अशी परिस्थिती असू नये. उलट रुग्णांच्या संख्येनुसार ही व्यवस्था केली पाहिजे. मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांकडे लक्ष दिलंच पाहिजे. पण त्यांनी आपल्याच जिल्ह्याकडे नेलं पाहिजे असं करणे योग्य नाही. पावरफुल नेत्यांना विनंती करतो की जास्त रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मदत करणे गरजेचे आहे.

  माझ्या परीने जे करता येईल ते मी करतो. केंद्राने ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला दिला. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केलं आहे. राज्यानेसुद्धा तसेच नियोजन करावे. महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन मिळाला आहे.

  केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही. समन्वयाने काम करावे लागणार आहे. उपलब्ध साधनांचा उपयोग कसा करावा याकडे आपण लक्ष  दिले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारने सीरमला 3 हजार कोटी आणि भारत बायोटेकला पंधराशे कोटी दिलेले आहे. त्यामुळे आता लसींचं उत्पादन वाढणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती झाल्यामुळे आपण लसीकरणाची मोहीम राबवू शकतो. लसीच्या उत्पादनाच्या सीमा आपण वाढवल्या आहेत, असे फडणवीस म्हणाले.

 • 30 Apr 2021 04:30 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यात लससाठा संपल्यानं लसीकरण मोहीम थांबली, 140 केंद्रातील लसीकरण बंद

  वाशिम : वाशिम जिल्ह्यातील चार वाजल्यानंतर नंतर लससाठा संपल्यानं लसीकरण मोहीम थांबली

  जिल्ह्यातील 140 केंद्रातील लसीकरण बंद

  आज 40 केंद्रावर लसीकर मोहीम होती सुरू

  जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 59 हजार 200 नागरिकांचे लसीकरण पूर्ण

  जिल्ह्याला आतापर्यंत मिळाले होते 1 लाख 72 हजार 820 हजार डोस

 • 30 Apr 2021 04:29 PM (IST)

  नागपूर जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळणार

  नागपूर : जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीला देण्यात येणार पुरस्कार

  पहिला पुरस्कार 25 लाख रुपये दुसरा 15 लाख तर तिसरा 10 लाख रुपये

  ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीसंदर्भात अनेक गैरसमज

  गैरसमज दूर करून केलं जाणार लसीकरण

  नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी प्रशासन करत आहे प्रयत्न

  नागपूरच्या ग्रामीण भागात लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याचं जिल्हा परिषदेचं आवाहन

  जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांचं आवाहन

  ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत असल्याने लसीकरण आवश्यक

 • 30 Apr 2021 03:24 PM (IST)

  राजीव सातव यांची प्रकृती स्थिर, ऑक्सिजन लेव्हलमध्ये वाढ, विश्वजीत कदम यांची माहिती

  राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत विश्वजित कदम यांची माहिती

  - राजीव सातव यांची प्रकृती स्थिर आहे,

  - काल रात्रीपासून प्रकृतीत सुधारणा,

  - ऑक्सिजन लेव्हलही वाढत आहे,

  - लवकरच ते बरे होतील आणि सार्वजनिक जीवनात परततील,

  - त्यांना मुंबईला हलवण्याची गरज नाहीय,

 • 30 Apr 2021 03:22 PM (IST)

  राजीव सातव यांची प्रकृती स्थिर, मुंबईला हलवण्याची गरज नाही

  - राजीव सातव यांची प्रकृती स्थिर

  - काल रात्रीपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा

  - ऑक्सिजन लेव्हलही वाढत आहे

  - लवकरच ते बरे होतील आणि सार्वजनिक जीवनात परततील

  - त्यांना मुंबईला हलवण्याची गरज नाही

 • 30 Apr 2021 03:19 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर नाशिकमध्ये दाखल, जिल्हा रुग्णालयात पाहणी दौरा सुरू

  नाशिक - देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर नाशिकमध्ये दाखल

  जिल्हा रुग्णालयात पाहणी दौरा सुरू

  थोड्या वेळात विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेणार

 • 30 Apr 2021 03:15 PM (IST)

  राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी थोड्याच वेळात पत्रकार परिषद 

  पुणे : खासदार राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्रकार परिषद

  - या परिषदेस राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि डॉ. गिल हे उपस्थित राहणार

 • 30 Apr 2021 02:37 PM (IST)

  महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात परिस्थिती गंभीर - सर्वोच्च न्यायालय

  सुप्रीम कोर्ट -

  महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात परिस्थिती गंभीर

  केंद्र सरकार 100 टक्के लस का विकत घेत नाही

  सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

  केंद्र जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्ायत यावं

  ऑक्सिजनच्या स्पलायसाठी टॅंकर देण्यात यावे

  राष्ट्रीय स्तरावर हे समस्य़ा सोडवा

  सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल

 • 30 Apr 2021 01:58 PM (IST)

  कराड शहरात पाच दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद

  कराड -

  कराड शहरात आजही लसीकरण बंद

  पाच दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद

  वृध्द नागरिकांना होतायत विनाकारण लसीकरण केंद्रावर हेलपाटे

  लस कधी उपलब्ध होणार याबाबत अधिकाऱ्यांसह नागरीकही संभ्रमात

 • 30 Apr 2021 01:58 PM (IST)

  नागपुरात कोरोना लसीकरणासाठी लोकांची गर्दी

  - नागपुरात कोरोना लसीकरणासाठी लोकांची गर्दी

  - इंदिरा गांधी रुग्णालयातील केंद्रावर गर्दी

  - शहरात सध्या काही वेळ पुरेल येवढाच लसीचा साठा शिल्लक

  - चार वाजेपर्यंय लसीचा पुरवठा न झाल्यास बऱ्याच ठिकाणी लसीकरण होणार ठप्प

  - नागपूरात आज दिवसभरासाठी शिल्लक होता १० हजार लसीचा साठा

  - लसीच्या तुटवड्यामुळे लोकांनी केली लसीकरण केंद्रांवर गर्दी

  - लस तुटवड्यामुळे लोकांमध्ये नाराजी

 • 30 Apr 2021 01:57 PM (IST)

  ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे कोरोनाने हैद्राबाद येथे निधन

  उस्मानाबाद - ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे कोरोनाने हैद्राबाद येथे निधन

  गेली 40 वर्ष त्यांनी लोकमत पुढारी यासह विविध वृत्तपत्र मध्ये काम केले होते

  गेल्या 8 दिवस पूर्वी त्यांचे बंधू पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचेही कोरोनाने निधन झाले होते

  अवघ्या 8 दिवसात उस्मानाबाद येथील 2 ज्येष्ठ पत्रकार यांचे निधन

 • 30 Apr 2021 01:56 PM (IST)

  बुलडाण्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना जेवण मिळण्यास उशीर

  बुलडाणा -

  कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना जेवण मिळण्यास उशीर

  चिखली येथील कोव्हिड सेंटरमधील प्रकार

  पाऊण वाजेपर्यंत जेवण न मिळाल्याने रुग्ण आले बाहेर

  चिखलीच्या कोव्हिड सेंटरमध्ये 150 रुग्ण आहेत भरती

  तर जेवणाचा दर्जा ही खालावल्याचा रुग्णांचा आरोप

 • 30 Apr 2021 01:54 PM (IST)

  सातारा शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

  सातारा शहरातील पोवई नाका परिसरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी

  रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने सातारा पोलीस महत्वाचा निर्णय

  पोवई नाका परिसरासह इतर मुख्य चौकात अॅन्टिजन रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात

  अॅन्टिजन टेस्टमध्ये एका महिलेचा रिपोर्ट आला पाॅझिटीव्ह

 • 30 Apr 2021 11:05 AM (IST)

  कुंभमेळ्यावरून परतलेल्या महामंडलेश्वर महंतांचा कोरोनामुळे मृत्यू

  औरंगाबाद -

  कुंभमेळ्यावरून परतलेल्या महामंडलेश्वर महंतांचा मृत्यू

  कुंभमेळ्यावरून परतल्यानंतर कोरोनाचं झालं होतं निदान

  औरंगाबादच्या वेरूळ येथील कैलास मठाचे होते महंत

  कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार

  उपचार सुरू असताना आज पहाटे झाला मृत्यू

  स्वामी भागवतानंद महाराज असं महामंडलेश्वर यांचं नाव

  15 दिवसांपूर्वी परतले होते कुंभमेळ्यावरून

 • 30 Apr 2021 10:25 AM (IST)

  वसई विरार महापालिकेकडून कोव्हिड-19 तक्रार निवारण कक्ष स्थापन

  वसई-विरार

  - वसई विरार महापालिकेकडून कोव्हिड-19 तक्रार निवारण कक्ष स्थापन

  - खाजगी कोव्हिडं रुग्णालयातील बिला बाबत काही तक्रार असेल तर या कक्षातून होणार निवारण

  - बिलाबाबत तक्रार केल्यास वसई विरार महापालिकेच्या तक्रार निवारण कक्षातून लेखा परीक्षण पथकाकडून लेखापरीक्षण व पडताळणी करून रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा देणारी

  कोव्हिडं 19 तक्रार निवारण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0250-2334546/ 0250-2334547/ 7058911125/ 7058991430 यावर संपर्क करून आपली तक्रार नोंदवावी

  तसेच covidaudit.vvmc@gmail.com या ईमेल आयडी वर बिलांच्या प्रत पाठवाव्यात जेणे करून सदर तक्रारींचे महापालिकेकडून तक्रारींचे निवारण करण्यात येईल

 • 30 Apr 2021 09:44 AM (IST)

  सोलापूर जिल्ह्याला 29 एप्रिलला केवळ 3 लाख 14 हजार 480 डोस

  सोलापूर -

  कोरोनाच्या संसर्गाने मोठा आकडा गाठलेला असताना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात शासनाने हात आखडता घेतला

  जिल्ह्यात लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना पुरवठा मात्र कमी

  सोलापूर जिल्ह्याला 29 एप्रिलला केवळ 3 लाख 14 हजार 480 डोस

  यातून दोन लाख 66 हजार 970 जणांना पहिला

  43 हजार 381 जणांना दुसरा डोस

  चार दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा ठणठणाट असल्याने लसीकरण केंद्रे बंद

  लस उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात सुद्धा नागरिकांची ओरड

 • 30 Apr 2021 09:42 AM (IST)

  राज्याला 21 एप्रिलनंतर रेमडेसीव्हीरचा कमी पुरवाठा, सरकारचा दावा

  राज्याला 21 एप्रिलनंतर रेमडेसीव्हीरचा कमी पुरवाठा, सरकारचा दावा

  खासगी हॉस्पिटल्सनी रेमडेसीव्हीर अंदाधुंद प्रिस्क्राईब केल्याचाही सरकाराचा दावा

  रेमजेसिवीरबाबत नागपूर खंडपीठात सरकारतर्फे सादर केलं प्रतिज्ञा प्रत्र

  2 लाख रेमजेसिवीर व्हायल्स कमी मिळाल्याचा दावा

 • 30 Apr 2021 09:41 AM (IST)

  नागपूरमध्ये रोज होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यात घोळ असण्याची शक्यता

  - नागपूरमध्ये रोज होणाऱ्या मृत्यूच्या आकड्यात घोळ असण्याची शक्यता

  - प्रशासनाकडून मृत्यूची रोज देण्यात येणाऱ्या आकडेवारीत आणि प्रत्यक्ष होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या आकड्यात तफावत.

  - जाहीर करण्यात येत असलेल्या आकडेवारीच्या तुलनेत तिप्पट अंतीमसंस्कार होत असल्याचं वास्तव.

  - मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी या प्रकरणात प्रशासनाला मागितला अहवाल

 • 30 Apr 2021 08:42 AM (IST)

  बुलडाणा जिल्ह्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शन वाटपाबाबत साशंकता

  बुलडाणा

  जिल्ह्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शन वाटपाबाबत साशंकता

  वाटपातील अनियमिततेमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

  जिल्ह्यात सुरुय 55 ठिकाणी कोव्हिड रुग्णांवर उपचार

  अनेक रुग्णालयांना 25 टक्के पेक्षाही कमी इंजेक्शन दिल्या जात आहेत

  तर काही रुग्णालयांना रुग्ण संख्येच्या जास्तीचे वाटप केल्या जातेय

  मात्र प्रत्येक रुग्णसंख्येच्या संख्येनुसार वाटप करणे आवश्यक आहे

 • 30 Apr 2021 08:40 AM (IST)

  औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरच्या इमारतीजवळ विद्युत रोहित्राला आग

  औरंगाबाद -

  कोव्हिड सेंटरच्या इमारतीजवळ विद्युत रोहित्राला आग

  रोहित्राला लागलेल्या आगेमुळे कोविड सेंटर मध्ये पसरले होते भीतीचे वातावरण

  अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेतच विझवली आग

  विद्युत रोहित्राच्या पेटीत मांजर अडकल्याने झाले शॉर्ट सर्किट

  अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे टाळला अनर्थ

  सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी नसून,कोरोना रुग्ण सुरक्षित

 • 30 Apr 2021 08:38 AM (IST)

  रेमडेसीव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या करमाळा पंचायत समितीच्या कर्मचार्‍याची ऑडिओ वायरल

  सोलापूर -

  रेमडेसीव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या करमाळा पंचायत समितीच्या कर्मचार्‍याची ऑडिओ वायरल

  रुग्णांना इंजेक्शनची गरज असल्यास रुग्णालयात पोहोच करण्याची जबाबदारी पंचायत समितीची

  अशा परिस्थितीत जाधव नावाच्या कर्मचाऱ्याने करमाळ्यातील डॉक्टर पवार यांना पाच इंजेक्शन विकले

  विक्रीनंतर 17 हजार रुपये मिळाले उर्वरित सात हजार रुपये मिळाले नसल्याने जाधवने डॉक्टरांना केला पैशासाठी फोन

  तुम्ही खोऱ्याने पैसे ओढत आहात, मी हॉस्पिटल तपासणी करण्याच्या कमिटीवर आहे, तुमच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे पैसे देण्यासाठी टाकला दम

  जाधवने डॉक्टर पवार यांना परस्पर विकले होते इंजेक्शन

  जिल्हा प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू

 • 30 Apr 2021 08:25 AM (IST)

  जळगाव राज्यातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित

  जळगाव

  राज्यातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित

  अनेक तृतीयपंथी बांधवांकडे लसीकरांसाठी आवश्यक कागदपत्रे नाहीत

  आधार कार्डची अट शिथिल करावी तसेच लसीकरण साठी घेतला जाणारा शुल्क माफ करावा

  तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीची मागणी

 • 30 Apr 2021 08:18 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्याला कोव्हिशिल्डचे पाच हजार डोस मिळाले

  रत्नागिरी -

  जिल्ह्याला कोव्हिशिल्डचे पाच हजार डोस मिळाले

  आज फक्त फ्रंन्टलाईन वर्कसचे लसीकरण होणार

  फ्रंन्टलाईन वर्कसना दिला जाणार पहिला आणि दुसरा डोस

  आरोग्य कर्मचारी, पोलिस, सरकारी कर्मचारी अशांना दिली जाणार लस

  नागरिकानी विनाकारण लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये

  जिल्हा प्रशासनाच्या रत्नागिरीकरांना सुचना

 • 30 Apr 2021 07:37 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 29 टक्यांनी घट

  रत्नागिरी -

  जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

  रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात 29 टक्यांनी घट

  रत्नागिरी जिल्ह्याचे पहिल्या लाटेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.47 टक्के

  दुसऱ्या लाटेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.79 वर

  रुग्ण वाढत्या संख्येचा परिणाम

 • 30 Apr 2021 07:34 AM (IST)

  कोल्हापुरात लसीकरणासाठी महिलांची आरोग्य कर्मचारी महिलेला धक्काबुक्की

  कोल्हापूर

  लसीकरणासाठी महिलांची आरोग्य कर्मचारी महिलेला धक्काबुक्की

  कोल्हापूर शहरातील फिरंगाई लसीकरण केंद्रावरील प्रकार

  या प्रकरणी माजी नगरसेवक महेश सावंत यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल

  नोंदणी न करता लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी घातला गोंधळ, वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत ही घातला वाद

  गोंधळा नंतर केंद्रा बाहेर पोलीस बंदोबस्त

  उपायुक्त निखिल मोरे यांनी ही दिली लसीकरण केंद्राला भेट

 • 30 Apr 2021 07:08 AM (IST)

  गोकुळच्या आणखी एका ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू

  कोल्हापूर :

  गोकुळच्या आणखी एका ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू

  गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री इथल्या सज्जन तोडकर यांचा उपचारा दरम्यान मृत्यू

  दोन आठवड्यात गोकुळ च्या तिसऱ्या ठरावधारकाचा बळी

  ठरावधारकांमध्ये भीतीचं वातावरण

  गोकुळ दूध संघासाठी येत्या रविवारी होणार आहे मतदान

 • 30 Apr 2021 06:53 AM (IST)

  गुरुवारी पुण्यात 6 हजार 648 जेष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस

  पुणे :

  गुरुवारी पुण्यात 6 हजार 648 जेष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस

  लसींचा तुटवड्यामुळे पुण्यात फक्त महापालिका केंद्रावर दिला जातोय जेष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस

 • 30 Apr 2021 06:52 AM (IST)

  ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले

  राज्यातील लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय

  ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 15 मेपर्यंत वाढविले

  राज्यात 15 मेपर्यंत संचारबंदी राहणार

  कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर उपाय म्हणून आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहेत, असंही राज्य सरकारनं आदेशात म्हटलं

  आता लॉकडाऊन 1 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे

 • 30 Apr 2021 06:51 AM (IST)

  लॉकडाऊन काळात जिह्याबाहेर प्रवासासाठी खोटी कारणे देऊन बनावट ई-पास काढून देणारा जेरबंद

  पुणे :

  लॉकडाऊन काळात जिह्याबाहेर प्रवासासाठी खोटी कारणे देऊन बनावट ई-पास काढून देणारा तरुण जेरबंद

  चुकीची कारणे देत तब्बल १८ जणांना डिजिटल पास काढून दिला बनावट ई-पास

  धनाजी मुरलीधर गंगनमले (वय २९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव

  धनाजी गंगनमले हा स्वत:च्या घरात वेबसाईटवरुन ई पास तयार करुन त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करत महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरुन ई पासची करत होता विक्री

Published On - Apr 30,2021 11:17 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें