Gulabrao Patil : सर्व दाढीवाले वरती बसलेत, मोदी, शिंदे आणि… गुलाबराव पाटील यांची सुस्साट टोलेबाजी

Gulabrao Patil on Beard Politics : राज्याच्या राजकारणात गंभीरच नाही तर अनेक खुमासदार विषय आणि मुद्दे पण आहेत. पण ते पाहण्याची खास नजर तुमच्याकडे असली पाहिजे. शिवसेनेची मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनी असाच एक मुद्दा हेरला आहे.

Gulabrao Patil : सर्व दाढीवाले वरती बसलेत, मोदी, शिंदे आणि... गुलाबराव पाटील यांची सुस्साट टोलेबाजी
गुलाबरावांच्या भाषणाने पिकली खसखस
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 2:14 PM

गेल्या तीन एक वर्षात राज्याचं राजकारण कुणाच्या वळचणीला गेले आहे, याचा थांगपत्ता न लागण्या इतपत परिस्थिती ढवळून निघाली आहे. पक्षांची इतकी शक्कल झाली आहे की आज या गोटात असलेला माणूस उद्या कोणत्या पक्षाच्या मंचावर दिसेल, त्याचा अंदाज सुद्धा लावता येत नाही. राज्याच्या राजकारणात गंभीरच नाही तर अनेक खुमासदार विषय आणि मुद्यांची रेलचेल आहे. सध्या राजकारणात दाढीवाल्यांची चलती आहे. शिवसेनेची मुलूख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांनी असाच एक मुद्दा हेरला आहे.

योगायोगाने सर्व दाढीवाले वरती

योगायोगाने सर्व दाढीवाले वरती बसले आहे. नरेंद्र मोदी दाढीवाले आहेत. एकनाथ शिंदे दाढीवाले आणि गुलाबराव पाटील सुद्धा दाढीवाला आहे. काय सांगता येत गुलाबराव पाटील आज बोलतो आहे उद्या नाहीये. पण तुमचं जर काम करून गेलो .. तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील गुलाबराव पाटील सारखा एक आमदार होता की ज्याने आमचं काम केलं. मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाढीवाले आहेत, असे सांगत त्यांनी एकच खसखस पिकवली.

हे सुद्धा वाचा

हे सरकार महिलांसाठी काम करणारं

आमचे मुख्यमंत्री महिलांसाठी खूप प्रयत्न करत आहेत.. आता मुलगी जन्माला आली की कंटाळा करायचं काम नाही असं काम मुख्यमंत्र्यांनी केला आहे. निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे. एसटीमध्ये महिलांना अर्धा तिकीट केल्यामुळे आता एसटी पटापट भरायला लागलेली आहे आणि हे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोणताही दवाखान्यामध्ये जा. उपचारासाठी पाच लाख रुपयांची मर्यादा करणारा हा आमचा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्याने एवढे सुंदर काम करण्याचा प्रयत्न केला आहे. एस. टी मध्ये अर्धं तिकीट, तीन सिलेंडर आणि लाडकी बहीण अशा महिलांसाठी खूप योजना या सरकारने सुरू केली आहे. वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचं काम कोणी केला असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांनी केला आहे, असे ते म्हणाले.

आदमी बेईमान हो जाएगा, मगर मेरी बहन बेइमान नही होगी

एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजना आणली आणि आता लाडक्या बहिणींचा खात्यावर पैसे जमा व्हायला लागले. लोक अफवा फैलावतात की निवडणुका आहे म्हणून पैसे आले. कोणी कितीही लालूच येऊ द्या. मात्र आदमी बेईमान हो जाएगा, मगर मेरी बहन बेइमान नही होगी, असे गुलाबराव पाटील म्हणाले. त्यामुळे लाडक्या बहिणी हे पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा यांचा सरकार निवडून देणार. एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे.. पुन्हा आमचं सरकार आलं तर दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अनेक लोक आपल्याला येड बनवायला येतील मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....