AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : भुजबळ म्हणजे ठुसका फटाका; मनोज जरांगेंची दिवाळीलाच तुफान आतषबाजी, असा फोडला बॉम्ब

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : तर मंडळी यंदा फराळी चिवड्यासोबत राजकीय फटाकेबाजी काही रंगली नाही बरं का. पण ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी थोडी फार कसर भरून काढण्याचे कसरत मनोज जरांगे पाटील यांनी केली.

Manoj Jarange : भुजबळ म्हणजे ठुसका फटाका; मनोज जरांगेंची दिवाळीलाच तुफान आतषबाजी, असा फोडला बॉम्ब
मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ
| Updated on: Oct 21, 2025 | 2:37 PM
Share

Chhagan Bhujbal Manoj Jarange Diwali : दरवर्षी दिवाळीत चिवड्यासोबत राजकीय फटाकेबाजी आणि फटकेबाजी करमणूक करते. दिवाळीत सर्वसामान्यांची आपली तेवढीच करमणूक होते. यंदा दिवाळीपूर्वीच राजकीय पक्षांनी फटाके फोडले. दिवाळीत त्यामुळे खरा रंग भरला नाही. पण ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी थोडी फार कसर भरून काढण्याचे कसरत मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर टीका केली. काय म्हणाले जरांगे पाटील?

आश्वासन नको थेट मदत द्या

सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या मनापासून त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सरकारचे धोरणच असं आहे की तात्पुरत आनंद द्यायचा. अशी चाल जाणून बुजून सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. एक तर सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजण शेतकऱ्यांचं काहीच होत नाही, फक्त तात्पुरता आनंद द्यायचा. तात्पुरता आनंद म्हणजे त्याचा अर्थ फसवणूक असा होतो. याला खच्चीकरण करण्याचं काम म्हणतात, त्यामुळे हे सरकार तात्पुरता आनंद सत्तेमध्ये आल्यापासून देत असल्याचाही जरंगे पाटील यांनी म्हटलं.फक्त आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही, त्याला प्रत्यक्ष मदत पाहिजे.

दीपावली आणि पाडव्याचे दोन-तीन दिवस जाऊ द्या त्यानंतर शेतकरी तज्ञ अभ्यासक यांना आम्ही फोन करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी कशा स्वरूपाने पुढे जायचं यासाठी कर्जमुक्तीसाठी नुकसान भरपाई पैसे या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात काय करायचं. त्यासाठी सगळ्या पक्षात असलेले सुद्धा आम्ही बोलवणार आहोत. सध्या शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाल्याने वाईट दिवाळी आलेली आहे, त्यामुळे कशीतरी आता करावी लागणार आहे.

सोयाबीन कापूस विकल्यानंतर कसे तरी दोन घास आम्ही लेकरांना गोड देणार होतो मात्र तसं काही करता आलं नाही. याचा बदला आपल्याला घ्यावा लागणार आहे या नेत्यांची खूप फरफट आपल्याला करावी लागणार आहे, यांचे कपडेच आढावा लागणार आहे तेव्हा हे ठिकाणावर येतील असा देखील इशारा जरांगे पाटलांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला दिला

बबनराव तायवाडे यांना जरांगेंचा सल्ला

यावेळी बबनराव तायवाडे यांच्याकडे रोख ठेवत मराठा-कुणबी जीआर रद्द करायची आणि त्याला हात लावायची कोणाचीही टप्पर नाही. आम्ही मराठी कशाला आहोत? तुम्हाला वाटत असेल एकीकडून ओबीसीला खुश करायचं, दुसरीकडे मराठ्यांना सुद्धा सांगायचं की तुम्हाला जीआर दिलाय मात्र प्रमाणपत्र केव्हा वाटप करायला सुरुवात करणार आहे असा देखील सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. तात्पुरत्या आनंदात जगणारा माणूस जरंगे पाटील नाही, असे ते म्हणाले.

मी बबनराव तायवाडे यांच्यावर आतापर्यंत बोललोच नाही, परंतु त्या माणसाची आता मला कीव यायला लागलेली आहे कारण की तुम्हाला आता ते इतके घाण घाण बोलू लागले आहेत तरीपण तुम्ही तिकडचे वाटता असा देखील हल्लाबोल जरांगे पाटलांनी बबनराव तायवाडे यांच्यावर केला. मला आत्ता सात आठ दिवसापूर्वी माहीत झाला की ते कुणबी आहेत म्हणून त्यामुळे कुणबी मराठा एकच आहे. तुम्हाला किती घाण बोलतात ते असल्या लोकांना लाथा खाली तुडून काढलं पाहिजे असा सल्ला देखील जरांगे यांनी बबनराव तायवाडे यांना दिला.तुम्हाला या वयात किती घाण घाण बोलत आहे तुम्ही त्यांना लाथाने ठोकलं पाहिजे. ज्याला कुत्रही विचारत नाही त्यांचे बोलणे तुम्ही खायला लागलात असं म्हणत नाव न घेता ओबीसी नेत्यांवर हल्लाबोल केला.

मराठे आणि फडणवीसाचं जुळलंय

ज्या ठिकाणी बीडमध्ये सभा झाली त्याच ठिकाणी आमची घोंगडी बैठक झाली. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे बोलतात त्यामध्ये चूक काय? बरोबर आहे. त्यांना सरकार मध्ये राहून देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करायचं आहे, कारण मराठ्यांचं आणि फडणवीसंच कुठेतरी आता जुळलेलं आहे असे जरांगे म्हणाले. कुणबी आरक्षणाला नाही धक्का लागत कारण ओबीसी आधी आम्हीच आहोत, तुम्ही आता आलेले आहेत मी दीडशे दोनशे वर्षांपासून आहे धक्का लागू देणार नाही, असे जरांगे म्हणाले.

भुजबळांवर तोंडसूख

ओबीसी नेते जीआर रद्द करण्याची मागणी करत असल्यावर त्यांनी झणझणीत प्रतिक्रिया दिली. तो जी आर रद्द व्हायची कुणाचीही टप्पर नाही, तो आता कधीपर्यंत सुद्धा राहणार आहे. मराठवाड्यातले मराठी आरक्षणामध्ये जाणार, परंतु छगन भुजबळ त्यांना नादी लावत आहेत. ते भेदभाव पसरवत आहेत. बीडची इतकुशिक सभा एवढं त्याला महाएल्गार नाव दिलं. त्या ग्राउंडवर आमची घोंगडी बैठक झालेली आहे आणि आम्हाला उभा राहायला सुद्धा जागा नव्हती, असा टोलाही त्यांनी भुजबळांना लगावला. भुजबळांना कोणत्याच फटाक्याची उपास चालत नाही ते ठुसकी आहेत. छगन भुजबळ हे घुरट आणि ठुसका फटाका आहेत, असा टोला जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.