AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange Patil: …तर सरकारला लय जड जाईल…. काळ्या रानात सरकारशी जरांगेंची कुस्ती… आमरण उपोषणापूर्वी थेट मोठा इशारा

Manoj Jarange Patil Big Statement: मनोज जरांगे पाटील यांनी रखरखत्या उन्हात उपोषणाचा निर्धार व्यक्त केला आहे. ते आता उपोषणस्थळी पोहचले आहेत. कोणता ही मंडप नसताना बाजीवर बसून ते उपोषणाला सुरुवात करत आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सरकारला मोठा इशारा दिला आहे.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारला लय जड जाईल.... काळ्या रानात सरकारशी जरांगेंची कुस्ती... आमरण उपोषणापूर्वी थेट मोठा इशारा
मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 30, 2026 | 10:11 AM
Share

Manoj Jarange Patil Big Statement: मनोज जरांगे पाटील हे रखरखत्या उन्हात उपोषणाला बसत आहेत. काही क्षणातच ते बाजीवर बसून मोकळ्या जागेवर आमरण उपोषणाला बसणार आहेत. राज्यातून मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीकडे कूच केली आहे. काळ्या रानात सरकारसोबत त्यांची कुस्ती होणार आहे. अशाप्रकारचं हे पहिलंच आंदोलन असेल. त्याची देशभरात चर्चा होत आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे.  हे आंदोलन उधळण्याचा प्रयत्न सरकारने करू नये , ते सरकारला जड जाईल असा इशारा त्यांनी दिला. तर उन्हातच सरकारशी चर्चा होणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

सातारा संस्थान जीआर काढायला हरकत नाही

सरकार येतील जातील पण मीं समाजाच्या लेकरांसाठी लढतोय. 2 लाख नोंदी निघाल्यात त्यांना प्रमाणपत्र द्यावेत. शासनाने याबाबत आदेश काढावा. राज्यातील अधिकार्‍यांना सूचना दिली पाहिजे की प्रमाणपत्र द्यावेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर काढलाय त्याप्रमाणे जो अर्ज करेल त्याला प्रमाणपत्र द्यावेत असे आदेश प्रशासनाला काढावेत. सातारा संस्थान जीआर काढायला हरकत नाही. जीआर चांगला काढला किंवा नाही कोणीतरी विरोधात जातेच. मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करणे अवघड नाही. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची आहे. सरकार स्तरावरून अधिकार्‍यांना सूचना जाणे गरजेचे आहे. कितीही चांगला जीआर लढला तरी तो चॅलेंज केला जातो. जीआर केव्हाही काढा त्याला चॅलेंज केले जातेच. उपोषणाला बसलो आणि नाही बसलो तरी मंत्री येणारच नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आंदोलन उधळण्याचा प्रयत्न करू नये

मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एकदा हल्ला झालाय आता पुन्हा ते करू नये. हल्ले करू, पोलिसांना लाठीचार्ज करू असे जर केले तर त्यांना राज्यात अतिजड जाईल. राज्यातील कानाकोपऱ्यात तीन ते चार महिने मग आंदोलन होईल. असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सरकारने आंदोलन उधळण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा त्यांनी केला आहे. फडणवीस यांना विनंती करुन सांगतो, संवाद करुन गोडी गुलाबीने प्रश्न मार्गी काढायचे बघा. आंदोलनावर लाठीचार्ज केला तर राज्यातील एकही भाग शांत राहणार नाही. नोटीस वगैरे असे काही आले नाही. मात्र तरीही सरकारला माझे सांगणे आहे. भाजप किंवा सेना कोणाचाही मंत्री येऊ द्या आम्हाला जीआर शी देणे घेणे आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

Follow Us
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...