AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक जिंकताच छगन भुजबळ-मनोज जरांगेंमध्ये खडाजंगी; जरांगे म्हणाले, अरे येडपटा तुला…

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी नाशिकच्या येवल्यातील निवडणूक जिंकली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी सरकारला देखील इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी......

निवडणूक जिंकताच छगन भुजबळ-मनोज जरांगेंमध्ये खडाजंगी; जरांगे म्हणाले, अरे येडपटा तुला...
छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
| Updated on: Nov 24, 2024 | 12:59 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचा विजय झाला. नाशिकच्या येवला या मतदारसंघातून 26 हजार 681 मतांनी छगन भुजबळ विजयी झाले आहेत. या मतदारसंघातील ओबीसी विरूद्ध मराठा अशा झालेल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. निवडणूक जिंकल्यानंतर काल झालेल्या विजयी रॅली काढली तेव्हा काही लोकांनी पहाटे तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही, असं म्हणत भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. यावर आता जरांगे यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

येडपटा तुला सांत्वन भेटी कळतात की नाही, मी राज्यात कुठे गेलो का? आलेले सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता कचका आमच्या पॅर्टनचा… मराठा आरक्षण लवकर द्यायचं ,बेमानी करायची नाही. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो. सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यायचं नाही तर पुन्हा मराठे छाताडावर बसणार आहे. आमच्याशी बेमानी करायची नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.

लवकरच उपोषण करणार- जरांगे

तुमचं सरकार स्थापन झाले की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार आहे. सरकार आलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनाने अभिनंदन देखील केल पाहिजे. आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही बाजूला राहिलो. कोणाचेही सत्ता आली तरी मला आणि समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. कोणीही माजात आणि मस्तीत राहायचं नाही हुरळून जायचं नाही. मराठ्यांना छेडण्याचं काम करायचं नाही. मी निवडणुकित सांगितलं होतं मराठा समाज मालक आहे योग्य लोक निवडा… मी मराठा मुक्त केला होता, मी कोणाच्याही दावणीला बांधला नव्हता, असं जरांगे म्हणालेत.

मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. मीच मराठा समाजाला मुक्त केल होतं. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं आहे. मी मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा झाला? एक महिन्याभर थांबा तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले आहेत. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही, असं जरांगेंनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.