‘लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील’ भाजपच्या मोठ्या नेत्याचा वक्तव्याने वादाची ठिणगी
Vilasrao Deshmukh: लातूर महापालिका निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. पण काल प्रचारादरम्यान लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असा दावा भाजपच्या बड्या नेत्याने केल्याने मोठा वाद पेटला आहे. काँग्रेसने या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला आहे. तर अमित देशमुख यांनी सुद्धा या वक्तव्यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh: लातूर शहरामधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नवीन वाद ओढावून घेतला. ते काल लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. सभेत बोलताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच वाद पेटला आहे. काँग्रेसने या वक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर अभिनेत रितेश देशमुख याने सुद्धा या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. लातूरमधील अनेक जुन्या जाणत्या राजकारण्यांनी चव्हाण यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले रवींद्र चव्हाण?
“लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही.” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पण त्यांच्या या वक्तव्यावर लातूरकर नाराज झाल्याचे दिसते. स्थानिक अनेक नेत्यांनी या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. लोकनेत्याचा हा अवमान असल्याची प्रतिक्रिया उमटली. आमदार अमित देशमुख यांनी या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
तर याप्रकरणी वादळ उठताच रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असे चव्हाण म्हणाले. लातूरमध्ये काँग्रेस हे विलासराव देशमुख यांच्या नावाने मत मागत आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने ते वक्तव्य केले. अमित देशमुख माझे चांगले मित्र आहेत. हे वक्तव्य राजकीयदृष्टीने पाहू नये. तरीही आपल्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असे चव्हाण म्हणाले.
अमित देशमुखांची तीव्र नाराजी
रवींद्र चव्हाण यांनी असं विधान करायला नको होते. लातूरची किंवा महाराष्ट्राची ही संस्कृती नाही.मी त्यांच्या विधानाचा निषेध करतो असं अमित देशमुख यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे जनतेच्या मनातील नेत्याचं नाव कुणीही पुसू शकत नाही असे अभिनेता रितेश देशमुख म्हणाले. तर काँग्रेसने याप्रकरणी संताप व्यक्त केला. चव्हाण यांनी याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली.
जो पर्यंत लातूर अस्तित्वात आहे तो पर्यंत विलासराव देशमुख यांचे नाव राहिल. विलासरावांचे नाव हे प्रत्येकाच्या हृदयात आहे, रवींद्र चव्हाण यांचे विधान दुर्दैवी असल्याचे काँग्रेस खासदार डॉ शिवाजी काळगे म्हणाले. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर बोलताना, त्यांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. लातूर मध्ये भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा होता, यावेळी बोलताना कार्यकर्त्यांना त्यांनी जयघोष करायला सांगितला.आणि त्या नंतर त्यांनी या जयघोषानंतर नक्कीच शंभर टक्के या शहरातून विलासरावांच्या आठवणी नक्कीच पुसल्या जातील असं म्हटलं आणि त्यानंतर वाद पेटला.
