Maharashtra News LIVE Update | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय (School Reopen) शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र, आता नवीन कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron) धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय पुढे ढकलल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra News LIVE Update | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय (School Reopen) शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. मात्र, आता नवीन कोरोना व्हेरिएंट ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron) धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय पुढे ढकलल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा काही जिल्ह्यातील शाळा 1 डिसेंबर ऐवजी 10 किंवा 15 डिसेंबरला सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उल्हासनगरात ज्या ग्राहकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असतील आणि मास्क घातला असेल, त्यांनाच दुकानात प्रवेश देण्याचा नियम महापालिकेनं लागू केलाय. या नियमांचं उल्लंघन झालं तर दुकानदाराला थेट 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. शहरात विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 01 Dec 2021 21:59 PM (IST)

  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

  मुंबई : उच्च व तंत्रशिक्षममंत्री उदय सामंत यांच्या गाडीला अपघात

  मुंबईमध्ये कार्यक्रमाला जात असताना झाला अपघात

  स्पेशल सिक्योरिटी युनिटची गाडी ब्रेक फेल होऊन उदय सामंत यांच्या गाडीवर आदळली

  गाडीत सामंत एकटेच होते

  सामंत एकदम सुखरूप

  सिक्युरिटी ऑफिसरला दुखापत

  कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

  संरक्षण करणाऱ्या सर्वांच्या औषधोपचाराचा खर्च उदय सामंत करणार

 • 01 Dec 2021 18:26 PM (IST)

  ममत यांनी यूपीए विसर्जित केली आहे का : आशिष शेलार  

  महाराष्ट्रातील मुलांनी काय वडापाव विकायचा का. जे स्वत:च नकारात्मक आणि पराभूत वृत्तीत आहेत. त्यांनी भाजप विरोधात बोलण्याचा विचार करुन नये. यूपीएस संपली म्हटलं जात आहे.  ममत यांनी यूपीए विसर्जित केली आहे का, असं आशिष शेलार म्हणाले.

 • 01 Dec 2021 18:17 PM (IST)

  आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणातील आरोपीस पुणे पोलिसांनी केले अटक 

  पुणे  : आरोग्य विभागाच्या पेपर फुटीच्या प्रकरणातील आरोपीस पुणे पोलिसांनी केले अटक

  विद्यार्थी राहुल कवठेकर व आरोग्य विभागाने केली होती सायबर पोलिसांकडे तक्रार

  विजय प्रल्हाद मुराडे वय वर्ष 29 राहणार नांदी तालुका अंबड जिल्हा जालना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

  पुणे पोलिसांच्या सायबर सेल ने औरंगाबाद मधून केली अटक

  पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर केले असता आरोपीस 7 दिवसांची पोलीस कस्टडी

 • 01 Dec 2021 18:02 PM (IST)

  औरंगाबादेत एसटी कर्मचारी आक्रमक, व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीवर बहिष्कार

  औरंगाबाद : औरंगाबादेत एसटी कर्मचारी आक्रमक

  एसटी कर्मचाऱ्यांनी टाकला व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीवर बहिष्कार

  व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या बैठकीतून कर्मचारी गेले निघून

  औरंगाबादच्या बैठकीला एसटीचे व्यवस्थापकीय संचालक उशिरा आल्याने एसटी कर्मचारी नाराज

  औरंगाबाद जिल्ह्यातील आणि तालुक्यातील एसटी कर्मचाऱ्यांना बोलवलं होते बैठकीला

  एसटीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने उशीर केल्याने एसटी कामगार आक्रमक

 • 01 Dec 2021 17:25 PM (IST)

  हातकणंगले येथे लिपिक लाचलूचपतच्या जाळ्यात

  इचलकरंजी : हातकणंगले येथे लिपिक अँटीकरप्शनच्या जाळ्यात

  तीन हजाराची लाच घेताना जाळ्यात

  सुनील चौधरी वरिष्ठ लिपिक व शिवाजी भोसले अशा दोघांवर गुन्हा दाखल

  विवाह नोंदणीचा दाखला करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती

  अँटीकरप्शनची या महिन्यातील चौथी कारवाई, त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनामध्ये खळबळ

 • 01 Dec 2021 16:31 PM (IST)

  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

  पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले

  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज ‘ ब ‘ वर्गातून उमेदवारी अर्ज भरला

  बॅंकेच्या 21 संचालक पदासाठी निवडणूक होत असून 2 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार

 • 01 Dec 2021 16:25 PM (IST)

  नाशिक

  – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पावसाचं सावट – नाशकात जोरदार पाऊस सुरू – पालकमंत्री छगन भुजबळ करतायत कार्यक्रमस्थळी पाहणी – पावसामुळे तयारीच्या कामावर ही होतोय परिणाम – येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होतंय नाशकात साहित्य संमेलन

 • 01 Dec 2021 16:25 PM (IST)

  नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पावसाचं सावट

  नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर पावसाचं सावट

  – नाशकात जोरदार पाऊस सुरू

  – पालकमंत्री छगन भुजबळ करतायत कार्यक्रमस्थळी पाहणी

  – पावसामुळे तयारीच्या कामावरही होतोय परिणाम

  – येत्या 3 ते 5 डिसेंबरदरम्यान होतंय नाशकात साहित्य संमेलन

 • 01 Dec 2021 16:24 PM (IST)

  किरीट सोमय्या

  अर्जून खोतकर यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली आहे.

  बाजार समितीत घोटाळा केला

  आणखी दोन भूखंडाचे घोटाळे माझ्या समोर आले आहेत

  अर्जुन खोतकर प्रकरणात युती आघाडी आणि सत्तेचा प्रश्न येत नाही,

  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही चौकशी सुरू झाली आहे

  उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला पण शिवसेना भाजप युतीच्या काळात ही चौकशी सुरू झाली होती

 • 01 Dec 2021 16:12 PM (IST)

  ममता बॅनर्जी

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते भाजपविरोधात पर्याय देणं महत्वाचं

 • 01 Dec 2021 16:10 PM (IST)

  शरद पवार

  बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं भाजपला राष्ट्रीय स्तरावर नवा पर्याय देण्यासाठी एकत्र काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही मोदींविरुद्ध सक्षण पर्याय तयार करणार

 • 01 Dec 2021 16:08 PM (IST)

  मुंबई

  ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली सिव्हर ओकवर एक तास चालली बैठक राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित

 • 01 Dec 2021 16:08 PM (IST)

  शरद पवार

  बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं

 • 01 Dec 2021 15:36 PM (IST)

  कल्याण

  केडीएमसी हद्दीतील शाळा 15 डिसेंबर रोजी सुरु करणार

  केडीमसी शिक्षण विभागाचे उपायुक्त अनंत कदम याची माहिती

  तत्पूर्वी यासंदर्भात महापालिकेच्या समितीची आणखीन एक बैठक येत्या आठ दिवसात घेतली जाणार

 • 01 Dec 2021 15:30 PM (IST)

  रत्नागिरी

  एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढिचे परिपत्रक एसटीच्या विभागीय कार्यालयात प्राप्त

  परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची केली होती घोषणा

  घोषणेनंतर परिवहन खात्याचे 3 टक्के पगार वाढीचं परिपत्रक राज्यातल्या विविध विभागीय कार्यालयांत पोहोचलं

  एक ते दहा वर्ष एसटीची सेवा झालेल्यांना 5 हजार

  दहा ते वीस वर्षे सेवा झालेल्यांना चार हजार

  वीस वर्षे पुढे सेवा झालेल्यांना अडीच हजाराची पगारवाढ

  एसटी कर्मचाऱ्यांसाठी महागाई आणि घरभाडे भत्ता देखील सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे

 • 01 Dec 2021 15:30 PM (IST)

  नवी दिल्ली

  नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणंबद्दल मोठा निर्णय

  आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणवरील बंदी कायम

  15 डिसेंबरपासून सुरू होणार होती आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाण

  ओमीक्रॉंन मूळ केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

  15 डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरील बंदी कायम राहणार

 • 01 Dec 2021 13:21 PM (IST)

  ममता बॅनर्जींची विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा

  ममता बॅनर्जी व्हाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये

  ममता बॅनर्जींची विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा

 • 01 Dec 2021 11:40 AM (IST)

  ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही – राजेश टोपे

  ओमिक्रॉनचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही

  परदेशातून आल्यास 7 दिवसांचं विलगीकरण बंधनकारक असणार

  निर्बंधांचं पालन करावं हेच नागरिकांना आवाहन

  सहा देशातील नागरिकांसाठी निर्बंध लागू

  आरटी-पीसीआरमधून ओमिक्रॉनची तपासणी करता येऊ शकते

  लसीकरणाबाबत WHO च्या अहवालानंतर स्पष्ट होईल

  ग्रामीण भागात अजून ओमिक्रॉनची भीती नाही

  ग्रामीण भागात आजपासून शाळा सुरु झाल्यात

 • 01 Dec 2021 10:08 AM (IST)

  ममता बॅनर्जींनी वाघिणीप्रमाणं लढून लांडग्यांना पळवून लावलं, संजय राऊतांची प्रतिक्रिया

  ममता बॅनर्जी ज्यावेळी मुंबईत येतात त्यावेळी त्या ठाकरे कुटुंबाची भेट घेतात. ममता बॅनर्जींचं मी आणि आदित्य ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी त्यांनी प्रार्थना केली.  उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृत्वात महाराष्ट्र सरकारी यंत्रणांच्या दहशतवादाला पुरुन उरला आहे. ममता बॅनर्जी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागवल्या.

  ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असून त्यांनी वाघीणीप्रमाणं लढून लांडग्यांना पळवून लावलं आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट देशाच्या राजकारणासाठी महत्त्वाची आहे. शरद पवार देशाचे मोठे नेते आहेत.पश्चिम बंगालमध्ये डावे भूईसपाट झाले, काँग्रेस संपलेला आहे. भाजपच्या बँड बाजातील हवा ममता बॅनर्जींनी काढून घेतली. ममता बॅनर्जी या मूळच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. काही वाद झाल्यानं त्या बाहेर पडल्या आहेत. मात्र, सर्वांना घेऊन पुढं जावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

 • 01 Dec 2021 09:22 AM (IST)

  पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात रिमझिम पावसाला सुरुवात

  -पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात आज सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झालीय

  -सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते

  -साडे आठ च्या सुमाराला शहरात काही भागात तुरळक सरी बरसल्या त्यानंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस शहरात बरसला

 • 01 Dec 2021 09:13 AM (IST)

  रत्नागिरीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात

  रत्नागिरी – रत्नागिरीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात

  हवामान खात्याने दिला आहे कोकणाला ऑरेंज अलर्ट

  सकाळपासून सुरु होती पावसाची रिपरिप

  अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मुसळधार पावसाचा दिला इशारा

 • 01 Dec 2021 08:33 AM (IST)

  कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला यंत्रणेकडून वाटाण्याच्या अक्षता

  कोल्हापूर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला यंत्रणेकडून वाटाण्याच्या अक्षता

  महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर 24 तासानंतर देखील चेकपोस्ट नाही

  कालच कोल्हापुरचे जिल्हाधिकारी यांनी चेक पोस्ट उभा करण्याच्या गेल्या होत्या सूचना

  कोणतीही तपासणी न होता सरसकट वाहनांचा महाराष्ट्रात प्रवेश

 • 01 Dec 2021 07:40 AM (IST)

  नागपूर जिल्ह्यात काल रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, जिल्ह्यात 76 हजार लोकांनी घेतली एकाच दिवशी लस

  नागपूर जिल्ह्यात काल रेकॉर्ड ब्रेक लसीकरण

  जिल्ह्यात 76 हजार लोकांनी घेतली एकाच दिवशी लस

  एकीकडे कोरोना चा नवा व्हेरियन्त ओमायकोन चा धोका वाढत असताना आता नागरिक झाले सतर्क

  लसीकरणाला मोठा प्रतिसाद

  तर नागपूर शहराने गाठला आता पर्यंत 30 लाख लसीकरण करण्याचा टप्पा

  शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात मिळत आहे लसीकरणा ला चांगला प्रतिसाद

 • 01 Dec 2021 07:29 AM (IST)

  मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

  मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता,

  आयएमडीने 1 डिसेंबरला मुंबईसाठी दिला यल्लो अलर्ट तर पालघर जिल्ह्याला ओरेंज अलर्ट

  मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

 • 01 Dec 2021 07:17 AM (IST)

  आज नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळेत किलबिल सुरु होणार

  आज नागपूरच्या ग्रामीण भागातील शाळेत किलबिल सुरु होणार

  तर शहरात अजून वाट पहावी लागेल

  ग्रामीण भागातील पहिली ते सातवी चे वर्ग सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी दिली

  मात्र महापालिका आयुक्तांनी 10 तारखे पर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला

  नवीन व्हेरियनट चा धोका लक्षात घेत महापालिका प्रशासन सावध भूमिकेत

  तर पालकांन मध्ये सुद्धा मुलांना शाळेत पाठवायचं की नाही या विषयी संभ्रम

 • 01 Dec 2021 07:16 AM (IST)

  पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून कारवाई, गुटखा विक्री करणाऱ्याला अटक

  पिंपरी-चिंचवड

  – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निगडीमध्ये केलेल्या कारवाईत गुटखा विक्री करणाऱ्याला अटक करण्यात आलीये

  -या प्रकरणी उत्तम वाघमारे, याला अटक करण्यात आलीय तर विलास ससाणे आणि गणेश पवळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचा शोध सुरू आहे

  -या कारवाईत 3 लाख 15 हजार रुपयांचा गुटखा , 8500 रुपये रोख आणि 70 हजार रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय

 • 01 Dec 2021 07:15 AM (IST)

  दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच आता करता येणार केएमटीतून प्रवास

  कोल्हापूर –

  दोन डोस पूर्ण केलेल्यांनाच आता करता येणार केएमटीतून प्रवास

  ओमीक्रॉंन च्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाचा निर्णय

  आजपासून होणार निर्णयाची अंमलबजावणी

  लसीकरण पूर्ण न करणाऱ्या नागरिकांवर प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याचा महानगरपालिकेचा विचार

  पहिला डोस पूर्ण होऊन 84 दिवसापेक्षा अधिक दिवस झालेले शहरात तब्बल 52 हजार नागरिक

 • 01 Dec 2021 07:14 AM (IST)

  कार्यक्रम पत्रिकेत भाजप नेत्यांचे नावं वगळल्याचा आरोप, साहित्य संमेलनावर महापौरांचा बहिष्कार

  नाशिक – साहित्य संमेलनावर महापौरांचा बहिष्कार

  कार्यक्रम पत्रिकेत भाजप नेत्यांचे नावं वगळल्याचा महापौरांचा आरोप

  केंद्रीय मंत्री भरती पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची नावे नसल्याने व्यक्त केली नाराजी

  ग्रंथ दिंडी व्यतिरिक्त कार्यक्रमाना हजेरी लावणार नसल्याची महापौरांनी स्पष्टोक्ती

  साहित्य संमेलनाला विशिष्ट पक्षाचा कार्यक्रम करण्याची धडपड असल्याचा महापौरांचा आरोप

  महापालिकेकडून संमेलनास 25 लाख निधी..

  महापौरांच्या भूमिकेमुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ

 • 01 Dec 2021 07:14 AM (IST)

  नाशिक शहरातील नामांकित ‘मॉडर्न कॅफे’ हॉटेलचे अतिक्रमण जमीनदोस्त

  नाशिक शहरातील नामांकित ‘मॉडर्न कॅफे’ हॉटेलचे अतिक्रमण जमीनदोस्त

  उच्च न्यायालयात सुनावणीच्या दिवशीच हॉटेल जमीनदोस्त

  दुपारी 3 वाजता होणार होती कारवाईबाबत न्यायालयात सुनावणी

  तत्पूर्वीच महापालिकेने अतिक्रमण तोडल्याने महापालिका प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता

  सुनावणी असल्याची माहिती असून देखील कारवाई का केली ? असा सवाल उपस्थित

  सेनेच्या बड्या नेत्याच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याची चर्चा

 • 01 Dec 2021 07:13 AM (IST)

  नाशकात ओमिक्रॉन व्हेरिएंटची धास्ती, एकाच दिवसात लसीकरणाचा उच्चांक

  नाशिक – ओमिक्रॉन व्हेरिएंटची धास्ती, एकाच दिवसात लसीकरणाचा उच्चांक

  एका दिवसात 26 हजार 884 नागरिकांनी घेतली लस

  लसीकरण केंद्रांवर पुन्हा लागल्या रांगा

  वेळ पडल्यास आणखी लसीकरण केंद्र वाढवण्याची प्रशासनाची तयारी

 • 01 Dec 2021 07:13 AM (IST)

  ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्शवभूमीवर नाशिक महापालिका प्रशासन हाय अलर्टवर

  नाशिक – ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्शवभूमीवर महापालिका प्रशासन हाय अलर्टवर

  घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर महापालिका प्रशासनाचा भर

  आतापर्यंत लस न घेतलेल्या नागरिकांचा शोध सुरु

  लस उपलब्ध, मात्र धोका वाढल्यास कमतरता पडू शकते असा तज्ञांचा अंदाज

 • 01 Dec 2021 06:37 AM (IST)

  भिवंडी तालुक्यातील मातोश्री वृद्धाश्रमातील आणखी 17 जण पॉझिटिव्ह

  भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या सौरगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आणखी 17 जण पॉझिटिव्ह

  दोन दिवसां पूर्वी या मातोश्री वृध्दाश्रमातील सुमारे 62 ज्येष्ठ नागरीकांना कोरोनाची लागण झाली होती.त्यांच्या निकटवर्तीयांच्या तपासणीत हे नवे रुग्ण आढळले आहेत .

Published On - 6:27 am, Wed, 1 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI