LIVE | अमरावतीतून दिलासादायक बातमी, मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह

LIVE | अमरावतीतून दिलासादायक बातमी, मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह

सिंधुदुर्गात उद्या आठवडा बाजार राहणार बंद, मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद

सिंधुदुर्गात उद्या आठवडा बाजार राहणार बंद, उद्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. उद्या सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुका होत असून मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था आबादीत रहावी, मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 14 Jan 2021 20:07 PM (IST)

  सिंधुदुर्गात उद्या आठवडा बाजार राहणार बंद, मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद

  सिंधुदुर्गात उद्या आठवडा बाजार राहणार बंद, उद्या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. उद्या सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुका होत असून मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था आबादीत रहावी, मतदारांना त्यांचा हक्क बजावता यावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

 • 14 Jan 2021 20:03 PM (IST)

  कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी 4 सदस्यांपैकी 1 सदस्याने समितीमधून स्वतः ला केले बाहेर

  कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी 4 सदस्यांपैकी 1 सदस्याने समितीमधून स्वतः ला बाहेर केले. भुपेंदर सिह मान यांनी स्वतः ला कृषी कायद्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या समितीमधून बाहेर ठेवलं. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि सरकारमध्ये बातचीत करण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन केला आहे.

 • 14 Jan 2021 20:00 PM (IST)

  अमरावतीतून दिलासादायक बातमी, मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह

  अमरावती जिल्हाला दिलासादायक बातमी, मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटीव्ह, मृत्यू पावलेल्या पक्षांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट, सहा ठिकाणी मृत पावलेल्या पक्षाचे नमुने पाठवले होते तपासणीला, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

 • 14 Jan 2021 18:16 PM (IST)

  पवारांच्या भेटीनंतर आता विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

  सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे प्रकरणात आज मोठमोठ्या घडामोडीघड आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणी रोखठोक भूमिका घेतलीय. थोड्या वेळापूर्वीच आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर जाऊन त्यांची भेट घेतलीय. त्यानंतर नांगरे पाटील आता सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

 • 14 Jan 2021 17:49 PM (IST)

  विश्वास नांगरे पाटील शरद पवारांच्या भेटीला

  विश्वास नांगरे पाटील शरद पवारांच्या भेटीला, सिल्वर ओकवर नांगरे पाटील दाखल
 • 14 Jan 2021 17:44 PM (IST)

  मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल : कृष्णा हेगडे

  “मनसे कार्यकर्ते मनीष धुरी यांच्याशी देखील रेणू शर्मा असं वागली आहे. धुरी यांचा मला फोन आला होता, ते सुद्धा हेच सांगत होते,” असे भाजप नेते कृष्णा हेगडे म्हणाले. मी कोणत्याही महिलेवर उगाचच आरोप कशासाठी करु. एखाद्या महिलेला बदनाम करून मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे, म्हणून आता याबाबत तक्रार नोंदवली, असेही कृष्णा हेगडेंनी सांगितले.

 • 14 Jan 2021 17:06 PM (IST)

  भाजपा नेते कृष्णा हेगडे रेणू शर्मा विरोधात तक्रार देण्यासाठी अंबोली पोलिस ठाणे पोहोचले

  भाजपा नेते कृष्णा हेगडे रेणू शर्मा विरोधात तक्रार देण्यासाठी अंबोली पोलिस ठाणे पोहोचले

  थोड्याच वेळात रेणू शर्माविरोधात तक्रार दाखल करणार

 • 14 Jan 2021 16:39 PM (IST)

  माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, केस मागे घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून शर्मा कुटुंबावर दबाव, तक्रारदार महिलेच्या वकिलाचा आरोप

  रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली गेली की तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेल,

  रेणू शर्मा यांच्या वकिलाचा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप

  – आम्हाला पोलीस सहकार्य करत नाहीयेत – अर्ध स्टेटमेंट्स घेतलं आहे – कोर्टात जाऊ – 4 दिवस झले तरी FIR घेतला जात नाही – मुंडे दबाव टाकत आहेत

  -रेणू विरुद्ध खोटे केस केले जात आहेत

  – माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, बहिणीला केस widraw करायला सांग नाही तर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू असं धंनजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना धमकावले

  – आज अर्ध स्टेटमेंट झालं आहे उद्या 11 वाजता पुन्हा स्टेटमेंट रेकॉर्डसाठी बोलावलं आहे

  -पोलिसांनी रेणू शर्मा यांना मीडियाला टाळत मागील दाराने बाहेर काढलं

 • 14 Jan 2021 16:20 PM (IST)

  धनंजय मुंडे यांना लक्ष्य करुन पवारांना पक्षातले कुणाचे पंख छाटायचे आहेत?, गोपीचंद पडळकर यांचा सवाल

  धनंजय मुंडे यांना लक्ष्य करुन पवारांना पक्षातले कुणाचे पंख छाटायचे आहेत?, गोपीचंद पडळकर यांचा सवाल

  राष्ट्रवादीमध्ये बंडाळी माजली आहे, वाद आहेत…. महाविकास आघाडीच्या नेत्यांना वेगळे नेते आहेत का?

 • 14 Jan 2021 16:03 PM (IST)

  मी राजीनामा दिलेला नाही, मला पक्षाने राजीनामा मागितलेला नाही : धनंजय मुंडे

  मी राजीनामा दिलेला नाही, मला पक्षाने राजीनामा मागितलेला नाही, मी माझी भूमिका पक्षासमोर मांडलीय- धनंजय मुंडे
 • 14 Jan 2021 15:48 PM (IST)

  राजीनामा देण्याची चर्चा तथ्यहीन, मुंडे यांच्या निकटवर्तीयांची माहिती

  राजीनामा देण्याची चर्चा तथ्यहीन, मुंडे यांच्या निकटवर्तीयांची माहिती

  पक्षानं राजीनामा मागितलेला नाही, सुत्रांची‌ माहिती

 • 14 Jan 2021 15:44 PM (IST)

  रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करायची, भाजप नेते कृष्णा हेगडे यांचा गौप्यस्फोट

  भाजप नेते कृष्णा हेगडे आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिस स्थानकात जाणार

  रेणू शर्मा मला वारंवार मेसेज करायची

  शेवटचा मेसेज 06 जानेवारी 2021 ला केला होता. मात्र मी मेसेजला उत्तर दिलं नाही..

  फ्रेंडशीप किंवा संबंधात राहू यासाठी ती महिला प्रयत्नशील होती, पण मी तिला रिस्पॉन्स दिला नाही

  4 ते 5 वर्ष तिचे कॉल आणि मेसेज आले परंतु मी तिला एंटरटेन केलं नाही

  मी तिला दूर ठेवलं…

  06 जानेवारी आणि 07 जानेवारीला तिने मला मेसेज केला…. आप मुझे भूल गये क्या

 • 14 Jan 2021 15:33 PM (IST)

  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची कोणतीही चर्चा झाली नाही- जयंत पाटील

  धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत, पक्षात चर्चा होतीय…

  धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जातं होतं. मुंडे यांनी आधीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिस निष्कर्ष काढतील. त्याअगोदर आपण निकर्ष काढणं योग्य नाही. ते आता हायकोर्टात गेले आहे.

  पोलिसांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, पोलिस पोलिसांचं काम करतील

  राजीनाम्याची कोणतीही चर्चा झाली नाही- जयंत पाटील

 • 14 Jan 2021 15:25 PM (IST)

  धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे : गिरीश महाजन

  राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.

  भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी गिरीश महाजन आलेले होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 • 14 Jan 2021 15:22 PM (IST)

  राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही : प्रकाश आंबेडकर

  -शरद पवार म्हणाले हा गंभीर गुन्हा आहे हा कसा घ्यावा हे मुंडे यांनी ठरवावं – राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही – राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो -मुंडे यांच्या राजीनामा हा कोर्टाचा विषय आहे, लोक निवडणूक आयोगाकडे का जातात

 • 14 Jan 2021 15:01 PM (IST)

  कुणी बलात्काराचे आरोप केले तर त्याला लगेच फाशीवर चढवणार का?, मुंडे प्रकरणावर अनिल परब यांची प्रतिक्रिया

  या प्रकरणाची चौकशी होऊ देत. निष्कर्ष येऊ देत. मुंडे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय. खुलासेवार चौकशी, निष्कर्ष येतील त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील.

  तक्रार करणे किरीट सोमय्या यांचा धंदा आहे. त्यांनी तक्रार केली म्हणून कारवाई करायची, याने एकाप्रकारे अन्याय होऊ शकतो. त्यामुळे कुणी काही म्हणोत, सत्य बाहेर येऊ देत मगच निर्णय होईल…

  किरीट सोमय्या यांनी तक्रार केली म्हणजे लगेच कुठली ऍक्शन होत नाही. त्या तक्रारीची व्यवस्थित छाननी होईल. त्यात सत्य तपासून मग निर्णय होईल.

  आरोपांची शहानिशा होते मग निर्णय होतो. उद्या आम्ही कुणावर बलात्काराचे आरोप केले तर त्याला लगेच फासावर चढवणार का? कायदा कायद्याप्रमाणे चालतो…

  मी पुन्हा सांगतो विरोधकांनी आरोप केले असले तरी त्याची शहानिशा होईल मगच निर्णय होईल…

 • 14 Jan 2021 14:50 PM (IST)

  चहूकडून अडचणीत, तरीही धनंजय मुंडे नेहमीप्रमाणे जनता दरबारास उपस्थित

  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात जनता दरबारास उपस्थित राहून जनतेच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावले.

 • 14 Jan 2021 14:45 PM (IST)

  राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातील बैठकीनंतर प्रफुल पटेल शरद पवार यांच्या भेटीला

  राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातील बैठकीनंतर प्रफुल पटेल शरद पवार यांच्या भेटीला

  सिल्व्हर ओकवरती शरद पवार आणि प्रफुल पटेल चर्चा सुरु

  अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील शरद पवार यांना देण्याची शक्यता

 • 14 Jan 2021 14:37 PM (IST)

  धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा, किरीट सोमय्या यांची मागणी

  सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

 • 14 Jan 2021 14:32 PM (IST)

  मी माझी भूमिका मांडलीय, आता निर्णय पक्ष आणि पवारसाहेब घेतील : धनंजय मुंडे

  मी माझी भूमिका मांडली आहे. वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे. आता पक्ष आणि पवारसाहेब यावर निर्णय घेतील, असं धनंजय मुंडे म्हणाले.

 • 14 Jan 2021 14:27 PM (IST)

  धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात पोहचले

  माध्यमांशी न बोलताच सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे  चित्रकूट बंगल्यावरुन पक्ष कार्यालयाकडे निघाले होते. आता काही वेळापूर्वी ते पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. जनता दरबारसाठी मी कार्यालयात जातोय, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

 • 14 Jan 2021 14:15 PM (IST)

  माध्यमांशी न बोलताच धनंजय मुंडे पक्ष कार्यालयाकडे

  सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे चित्रकूट बंगल्यावरुन राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडे निघाले आहेत. जनता दरबारसाठी ते पक्ष कार्यालयात पोहोचत आहेत.

 • 14 Jan 2021 14:07 PM (IST)

  धनंजय मुंडे जनता दरबारसाठी रवाना

  सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडे जनता दरबारसाठी चित्रकूट बंगल्यावरुन रवाना

 • 14 Jan 2021 14:04 PM (IST)

  धनंजय मुंडेंनी मला भेटून परिस्थितीची सविस्तर माहिती दिली : शरद पवार

  धनंजय मुंडे काल मला स्वत: भेटले. मला भेटून एकंदर त्यांच्या आरोपाची स्थितीची सविस्तर माहिती मला दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यानंतर काही तक्रारी झाल्या. त्याबाबत चौकशी सुरु झालेली असेल. हे प्रकरण असं होईल, व्यक्तीगत हल्ले होतील असा अंदाज त्यांना असावा, त्यामुळे त्यांनी हायकोर्टात यापूर्वीच जाऊन आपली भूमिका मांडली आणि कोर्टाचा एकप्रकारचा एक आदेश हायकोर्टाचा आदेश होता त्यावर भाष्य करण्यात अर्थ नाही : शरद पवार

 • 14 Jan 2021 14:03 PM (IST)

  नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही : शरद पवार

  नवाब मलिकांच्या नातेवाईकावर आरोप झालाय, याबाबत संबंधित यंत्रणेने अटक केलं आहे, त्यामुळे त्या यंत्रणेने पूर्ण सहकार्य केलं आहे, तपास यंत्रणा त्या पद्धतीने काम करेल अशी अपेक्षा आहे. त्यांना पूर्ण सहकार्य संबंधितांकडून केलं जाईल याची काळजी घेतली जाईल, नवाब मलिकांवर वैयक्तिक आरोप नाही. ते अनेक वर्षापासून महाराष्ट्रासाठी काम करतात. विधीमंडळात ते काम करतात. त्यांच्यावर आजपर्यंत आरोप झालेला नाही : शरद पवार

 • 14 Jan 2021 13:59 PM (IST)

  धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घेण्याची आवश्यकता : शरद पवार

  धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत, पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घेण्याची आवश्यकता, विश्वासात घेऊन पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा, पक्षप्रमुख म्हणून काही काळजी आणि निर्णय घ्यावे लागतील

 • 14 Jan 2021 13:25 PM (IST)

  धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेला किरीट सोमय्या भेटणार

  भाजप नेते किरीट सोमय्या डीएन नगर पोलिस ठाण्यात, धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेची घेणार भेट, संबंधित पोलिसांशीही चर्चा करणार

 • 14 Jan 2021 13:01 PM (IST)

  राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक, धनंजय मुंडे प्रकरणी चर्चेची शक्यता 

  राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल बैठकीला उपस्थित, धनंजय मुंडे प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता 

 • 14 Jan 2021 12:19 PM (IST)

  धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणारी महिला डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये

  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणारी महिला मुंबईच्या डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याठिकाणी ही महिला सहायक पोलीस आयुक्तांना भेटणार आहे. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती ती पोलिसांनी देईल. यापूर्वी सदर महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.

 • 14 Jan 2021 10:49 AM (IST)

  रत्नागिरी ग्रामपंचायतीसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण

  रत्नागिरी ग्रामपंचायतीसाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण, मतदानासाठी एव्हीएम आणि व्हिव्हि पॅट यंत्रांचे आज करण्यात आले वाटप, कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर योग्य खरबदारी घेवून प्रशासनानी केली तयारी पूर्ण, रत्नागिरी जिल्ह्यातील 360 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

 • 14 Jan 2021 10:48 AM (IST)

  मकरसंक्रांतच्या पार्श्वभूमीवर नायलॅान मांजामुळे अपघात होऊ नये, नागपुरातील सदर उड्डाणपूल आज बंद

  नागपुरातील सदर उड्डाणपूल आज बंद, नायलॅान मांजामुळे अपघात होऊन नये म्हणून उड्डाणपूल बंद, मकरसंक्रांतीमुळे आज पतंग उडवणाऱ्यांचं मोठं प्रमाण, नायलॅान मांजामुळे दोन दिवसांपूर्वी नागपूरात तरुणाचा मृत्यू, खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणपूल बंद ठेवण्याचा पोलीसांचा निर्णय

 • 14 Jan 2021 10:36 AM (IST)

  केंद्राला शेतकरी आडमुठे वाटतात, शेतकऱ्यांना सरकार आडमुठे वाटतात : संजय राऊत

  केंद्राला वाटतंय की शेतकरी आडमुठे आहेत, शेतकऱ्यांना वाटतंय सरकार आडमुठेपणा करतंय, कायदे न्यायालयाने बनवलेले नाहीत, ते सरकारने तयार केले आहेत, सरकारने शेतकऱ्यांकडे एक पाऊल पुढे टाकावं, त्यामुले काही सरकारवर आभाळ कोसळणार नाही

 • 14 Jan 2021 10:33 AM (IST)

  कौटुंबिक विषयात कुणीही राजकारण करु नये : संजय राऊत

  विरोधी पक्षाने थेट आरोप केलेला नाही, कौटुंबिक विषयात कुणीही राजकारण करु नये, धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया

 • 14 Jan 2021 10:31 AM (IST)

  यामुळे महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येणार नाही : संजय राऊत

  असं केल्याने महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल तर तो भ्रम आहे

 • 14 Jan 2021 10:27 AM (IST)

  हा धनंजय मुंडेंचा व्यक्तीगत प्रश्न, तो त्यांच्यावर सोडायला हवा – संजय राऊत

  काही गोष्टी खाजगी असतात, त्या त्यांच्यावर सोडायला हवं, त्यामध्ये राजकीय भूमिका आणवे हे योग्य वाटत नाही, हा धनंजय मुंडेंचा व्यक्तीगत प्रश्न, ते त्यातून मार्ग काढतील, राष्ट्रवादीचं नेवृत्त्व सक्षम आहे त्यावर निर्णय घ्यायला

 • 14 Jan 2021 09:20 AM (IST)

  मराठवाड्यातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य बर्ड फ्लूपासून सुरक्षित

  मराठवाड्यातील सर्वात मोठं पक्षी अभयारण्य बर्ड फ्लूपासून सुरक्षित, जायकवाडी पक्षी अभयारण्यवर प्रशासनाची कडक नजर, जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरवर पसरलं आहे पक्षी अभयारण्य, धरण क्षेत्रात दरवर्षी येतात लाखो स्थलांतरित पक्षी, लाखो किलोमीटरचा प्रवास करून येतात परदेशी पक्षी, मात्र अजून एकही पक्षी दगवल्याची घटना नाही, वनविभाग आणि प्रशासन अभ्यासकांकडून पक्षांचे निरीक्षण सुरू

 • 14 Jan 2021 08:27 AM (IST)

  रत्नागिरी जिल्ह्यात बर्ड फ्यू सर्वेक्षणाचे आदेश, पशुसंवर्धन आयुक्तांकडून जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

  रत्नागिरी जिल्ह्यात बर्ड फ्यू सर्वेक्षणाचे आदेश, पशुसंवर्धन आयुक्तांकडून जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी, दापोलीतील मृत कावळ्यांमध्ये बर्ड फ्यू आढळल्यानंतर उपाययोजना, रत्नागिरीसह कोकणातल्या इतर जिल्ह्यात बर्ड फ्यू संर्वेक्षणाची मोहिम राबवली जाणार, पोल्ट्री व्यवसायिकांना र्निजंतुकीकरण करण्याचे आदेश

 • 14 Jan 2021 08:26 AM (IST)

  हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव शिवारात आठ मोर मृतावस्थेत आढळले

  हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव (दातार) शिवारात आठ मोर मृतावस्थेत आढळले, मोरांचा मृत्यू आजाराने की कशाने, कारण अज्ञात, पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे मोरांचे नमुने , अहवालानंतर कळेल मोरांच्या मृत्यूचे कारण,  मृत आठ मोरांमध्ये एक नर तर सात मादी

 • 14 Jan 2021 08:25 AM (IST)

  नायलॅान मांजाच्या घातक परिणामांची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल, स्वत:च दाखल करुन घेतली जनहित याचिका

  नायलॅान मांजाच्या घातक परिणामांची गंभीर दखल, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली दखल, स्वत:च दाखल करुन घेतली जनहित याचिका, आज नायलॅान मांज्याच्या परिणामांवर हायकोर्टात सुनावणी, नायलॅान मांजरामुळे दोन दिवसांपूर्वी प्रणय ठाकरेचा मृत्यू

 • 14 Jan 2021 08:23 AM (IST)

  ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समीर खानच्या घरावर एनसीबीचा छापा

  ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समीर खानच्या वांद्रे स्थित घरावर एनसीबीचा छापा, समीरच्या घरात सुरु आहे सर्च ऑपरेशन, ब्रिटीश नागरिक आणि ड्रग सप्लायर करण सजनानी प्रकरणात समीरला अटक, एनसीबीच्या  सूत्रांच्या माहितीनुसार, करण सजनानी आणि समीर या दोघांमधील ड्रग्ज बाबतटचे चॅट आणि पैशांची देवाण-घेवाणचे पुरावे सापडले आहेत

 • 14 Jan 2021 06:55 AM (IST)

  नांदेड जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज

  नांदेड जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान, प्रशासन सज्ज, 13 लाख 21 हजार मतदार या निवडणुकीत मतदान करणार, त्यासाठी जवळपास तीन हजार कर्मचारी तैनात करण्यात आलेत, भयमुक्त वातावरणात आणि  शांततेत मतदान व्हावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सांगितलं

 • 14 Jan 2021 06:54 AM (IST)

  कोव्हिड लस सोलापुरात दाखल, 34 हजार डोसेस जिल्हा प्रशासनाला प्राप्त

  कोव्हिड लस सोलापुरात दाखल, 34 हजार डोसेस जिल्हा प्रशासनाला प्राप्त, सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशील्ड लस प्राप्त, सीरम इन्स्टिट्यूटमधून विशेष वाहनाने सिव्हील हॉस्पिटलमध्ये लस दाखल, आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजून केले स्वागत, सिव्हील हॉस्पिटलमधून 19 केंद्रावर लस पाठविण्यात येणार, लातूर शहरातील पाच तर ग्रामीण भागातील 14 केंद्रावर लसीकरणासाठी कोव्हिशील्ड पाठविण्यात येणार, पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करण्यात येणार लसीकरण

 • 14 Jan 2021 06:51 AM (IST)

  पुण्यावरुन निघालेली कोरोना व्हॅक्सिन वॅन मध्यरात्री नागपुरात पोहोचली

  पुण्यावरुन निघालेली कोरोना व्हॅक्सिन वॅन काल मध्यरात्री नागपुरात पोहोचली, तब्बल 18 तासांचा प्रवास करत ही व्हॅक्सिन वॅन नागपुरात पोहोचली, या दरम्यान व्हॅक्सिन वॅनमध्ये गरजेनुसार तापमान नियंत्रित ठेवण्यात आलं
 • 14 Jan 2021 06:41 AM (IST)

  नाशकात गेल्या 24 तासात 205 जण कोरोना पॉझिटीव्ह

  नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 205 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, तर 181 रुग्णांनी कोरोनावर केली मात,  2 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू, जिल्ह्यातील मृत्युचा एकूण आकडा गेला 2018 वर

 • 14 Jan 2021 06:40 AM (IST)

  ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिकांच्या जावयाला अटक

  करण सजनानी ड्रग्स कनेक्षनमध्ये समीर खान यांच नाव समोर आलं होतं, एनसीबीने त्यांना चौकशीला बोलावलं आणि त्यांचा रोल संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक केलेली आहे, उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे

 • 14 Jan 2021 06:37 AM (IST)

  आता बंगले पाडत आहात, नंतर कामगारांची घरं पाडाल?, एनआरसी कामगारांचा संतप्त सवाल

  आता बंगले पाडत आहात आणि नंतर कामगार वसहतीमधील कामगारांची घरं पाडाल, असा संतप्त सवाल करीत एनआरसी काँलनी मधील बुधवारी बंगल्याचे पाडकाम कामगारांनी बंद पाडले, कल्याण जवळील आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनी गेले तेरा वर्ष बंद पडलेली आहे, यामुळे सुमारे 3500 कामगार बेकार झाले, कामगारांची थकीत देणीबाबत कामगार युनियनच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई सुरु

 • 14 Jan 2021 06:31 AM (IST)

  डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई

  अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकन संसदेने महाभियोगाची कारवाई सुरु केली, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई करता यावी म्हणून संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) मतदान झालं, ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याच्या बाजूने डेमोक्रॅटच्या 222 तर रिपब्लिकन पक्षाच्या 10 खासदारांनी मतदान केलं

Published On - 8:07 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI