Maharashtra Breaking News : यवतमाळ जिल्ह्यातील वणीत मनसेची मेगा भरती, 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश

| Updated on: Oct 11, 2021 | 1:02 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra Breaking News : यवतमाळ जिल्ह्यातील वणीत मनसेची मेगा भरती, 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Oct 2021 09:26 PM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील वणीत मनसेची मेगा भरती, 200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश

    पुणे, नाशिक पाठोपाठ विदर्भातंही मनसे सक्रिय

    – यवतमाळ जिल्ह्यातील वणीत मनसेची मेगा भरती

    – राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात अनेकांचा मनसेत प्रवेश

    – आठवडाभरात २०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा मनसे प्रवेश

    – मनसेकडून निवडणूकीची जोरात तयारी सुरु

    – राज ठाकरेंच्या आदेशानं विदर्भातील मनसेचे नेते सक्रिय

    – पक्ष मजबूत करण्याचे राज ठाकरेंचे आदेश

    – निवडणूका असलेल्या ठिकाणी मनसे जास्त सक्रिय

    – विदर्भात मनसेकडून आगामी निवडणूकीची तयारी

  • 10 Oct 2021 09:09 PM (IST)

    पुष्पक एक्सप्रेस दराेडा बलात्कार प्रकरण, सर्व आठ आराेपींना पकडण्यात कल्याण जीआरपींना यश

    कल्याण, पुष्पक एक्सप्रेस दराेडा बलात्कार प्रकरण

    सर्व आठ आराेपींना पकडण्यात कल्याण जीआरपींना यश

    आठपैकी दाेघांनी केला हाेता महिला प्रवाशावर लैंगिक अत्याचार

    आराेपींपैकी काही सराईत असल्याचे उघड

  • 10 Oct 2021 08:22 PM (IST)

    महाराष्ट्र बंदला मनसे व्यापारी सेनेचा विरोध

    महाराष्ट्र बंदला मनसे व्यापारी सेनेचा विरोध

    आधीच व्यापारी संकटात, त्या बंद कशाला? मनसेचा सवाल

  • 10 Oct 2021 08:02 PM (IST)

    पुण्यात उद्याच्या महाराष्ट्र बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा

    पुणे :

    उद्याच्या महाराष्ट्र बंदला व्यापारी महासंघाचा पाठिंबा,

    दूपारी 3 पर्यंत व्यापारी पुण्यातील दूकानं ठेवणार बंद,

    व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांची माहिती,

    तर पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ मात्र दूकानं सुरुच ठेवणार,

    किराणा मालाची दूकानं मात्र सुरुच ठेवणार रिटेल व्यापारी संघाची भूमिका,

    पुण्यात महाराष्ट्र बंदवरून दोन वेगवेगळ्या संघटनांचे वेगवेगळे निर्णय,

    पुण्यात महाराष्ट्र बंदला 100 टक्के व्यापाऱ्यांचा पाठिंबा नाहीच,

    महाराष्ट्र बंद यशस्वी होणार ?

  • 10 Oct 2021 07:23 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात 15 दिवसात दुसऱ्यांदा ढगफुटी, मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो

    उस्मानाबाद जिल्ह्यात 15 दिवसात पुन्हा दुसऱ्यादा ढगफुटी, मदतीसाठी शेतकऱ्यांचा टाहो

    विमानतळ उद्घाटन, हारे तुरे घ्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ, बांधावर येऊन मदत कधी देणार?  शेतकऱ्यांचा आक्रोश

    पवार साहेब पावसात भिजून चालत नाही, शेतकरी खरा पावसात आता भिजलाय, आता कुठे आहात? शेतकऱ्यांचा सवाल

  • 10 Oct 2021 07:21 PM (IST)

    ऐन दिवाळीत वीज संकट गहिरे होण्याची शक्यता

    चंद्रपूर :

    महाऔष्णिक वीज केंद्रातील संच क्र. 3 आणि 5 ठप्प,

    कोळसा पुरवठा रखडल्याने वीज केंद्र प्रशासनाचा निर्णय,

    अपु-या कोळसा पुरवठ्याच्या आधारे वीज निर्मितीवर झालाय विपरीत परिणाम,

    सध्या 2930 स्थापित क्षमता असताना 1200 MW होत आहे वीज निर्मिती,

    ऐन दिवाळीत वीज संकट गहिरे होण्याची शक्यता

  • 10 Oct 2021 06:53 PM (IST)

    चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे चार एकर ऊस जळून खाक

    जळगाव :

    चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे चार एकर ऊस जळून खाक

    शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान

    पाच लाख रुपये नुकसान झाल्याची शक्यता

  • 10 Oct 2021 06:27 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू

    चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू, मूल तालुक्यातील चिचोली येथील घटना, राजेंद्र ठाकरे असे 40 वर्षीय मृतकाचे नाव, वनपथक पोहोचले घटनास्थळी, स्थानिकांनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली

  • 10 Oct 2021 06:25 PM (IST)

    'उद्या बंद करा, अन्यथा हाेणाऱ्या नुकसानीसाठी तुम्ही जबाबदार', कल्याणमध्ये काँग्रेसचा इशारा

    कल्याण : उत्तर प्रदेशातील लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ उद्या महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि महिलाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्य बाजारपेठेत असलेल्या दुकानात जाऊन दुकान मालकाना उद्या दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बंदला साथ द्या, अशी मागणी केली. नाहीतर उद्या होणाऱ्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही, असे सांगितले आहे.

  • 10 Oct 2021 06:07 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 118 नवे कोरोनाबाधित, 183 जणांना डिस्चार्ज

    पुणे : १० ॲाक्टोबर दिवसभरात ११८ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १८३ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. -१७५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२४६५. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४१५. - एकूण मृत्यू -९०५३. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१९९७. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९२७.

  • 10 Oct 2021 05:51 PM (IST)

    नवी मुंबईची एपीएमसी मार्केट उद्या बंद राहणार, भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम होणार

    नवी मुंबईची एपीएमसी मार्केट उद्या बंद राहणार, भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम होणार, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, त्यामुळे उद्या मुंबई एपीएमसी देखील बंद राहणार आहे

  • 10 Oct 2021 05:21 PM (IST)

    एनसीबी कार्यालयाजवळ चित्रपटाची शूटिंग, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

    एनसीबी कार्यालयाजवळ रविवार सुट्टीचा दिवस असुनही फिल्मची शूटिंग सुरू होती

    पोलिसांच्या गाड्या एनएसजी वाहनसोबत वाहतूक आणि खाकी वर्दीतील पोलीस स्टाफ रस्त्यावर उभे होते

    पोलीस पाहून लोकांची बाघण्यास गर्दीही जमली होती

    अनेकांना गैरसमज झाला की एवढा पोलीस बंदोबस्त का वाढविला गेला आहे ?

    चौकशी केल्यावर सामोर आला की एका नामांकित फ़िल्म प्रोडक्शन तर्फे फ़िल्मचे दृश्य शूट केले जात होते

    मात्र या दरम्यान कोरोना नियमांचा उल्लंघन केल्याचं दिसून आलं

    कारण शूटिंगमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी मास्क न घेतलेल्याचे दिसून आले

  • 10 Oct 2021 04:55 PM (IST)

    उमेदवारी देताना अनेकांची नाराजी, पण काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात : अजित पवार

    अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    पाऊस सुरुय. बाहेरील बाजूच्या लोकांची गैरसोय होतेय. पण थोडं भिजा. पावसात भिजलं तर काय होतं हे साताऱ्याच्या सभेनं दाखवून दिलंय. त्यामुळं पाऊस येणं हे शुभशकून

    उमेदवारी देताना अनेकांची नाराजी पण काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात अनेकांनी आपापल्या परीने कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला शक्य तेवढं योगदान दिलं

    पावसामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं

    बाबुर्डीत बंधाऱ्याचे ढापे चोरीला गेलेत. आता यावरही आम्हीच लक्ष ठेवायचं का? तुमची काहीतरी जबाबदारी नाही का? १९२ ढापे चोरीला जातात. त्याच्यामागे कोणतरी असेल. मला गुपचुप नाव सांगा. मी पोलिसांना सांगून कारवाई करायला सांगतो लखिमपूर घटनेत शेतकऱ्यांना चिरडले. आरोपी सापडत नाहीत. या घटनेचा देशभरातून निषेध झाला तर अशा घटनांना आळा बसेल त्यामुळे उद्या सकाळपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा.. आंबेगावमध्ये वीज पडून दु:खद घटना घडली पाऊस येताना झाडाखाली उभा राहू नका झाडात वीज पडते. त्यातून दुर्घटना घडतात खबरदारी घेण्याचं आवाहन

  • 10 Oct 2021 04:51 PM (IST)

    राज्य सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला : गिरीश महाजन

    नाशिक :

    गिरीश महाजन यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    गिरीश महाजन ऑन ओबीसी - राज्य सरकारने ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय केला तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नाही त्याचा फटका समाजाला सरकार तुमचे असतांना ही वेळ का ? अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठाला नको आणि अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसीला नको ओबीसी संदर्भात हे अभियान आम्ही हाती घेतले

    गिरीश महाजन ऑन महाराष्ट्र बंद - पवार साहेब ज्येष्ठ नेते असून राज्यात शेतकर्यांवर राज्यात अन्याय होतो महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात अजून सरकारने कोणालाच मदत केली नाही एक दमडी फेकली नाही शेतकरी संपुष्टात आले आहे आणि उत्तर प्रदेशच्या घटनेमुळे महाराष्ट्र बंद म्हणायचे हा राजकीय हेतूने घेतलेला निर्णय

    व्यापारी कोरोनामुळे आधीच त्रस्त झाले आहेत अशावेळी महाराष्ट्र बंदच्या राजकीय हाकेला कोणी साथ देणार नाही

    गिरीश महाजन ऑन अजित पवार धाडसत्र - शरद पवार बोलले उत्तर प्रदेशच्या घटनेबद्दल बोलले आणि त्यानंतर लगेच या धाडी सुरु झाल्या असे काहीही नाही ते स्वतः म्हंटले आहेत की पाहुणे जाऊद्या म्हणून अजित पवारांच्या धाडीसंदर्भात जे काही असेल ते समोर येईलच

    गिरीश महाजन ऑन आर्यन खान प्रकरण - ड्रग्सच्या बाबतीत ncp ने एवढा पुढाकार घेतला आजची तरुण पिढी ब्राबत्त होते आहे यात राजकारण आणावं हे चुकीचे शेतकरी असो किंवा ईतर कुठलाही मुद्दा असला की त्यात राजकारण आणायचे हे या सरकारने ठरवलेले दिसते

    गिरीश महाजन ऑन खडसे - खडसे यांच्या पाठीशी खूप बहुमत होते असे काही नव्हते पूर्वीपासून ते काठावर निवडून येत होते कोणाला दोष देऊन उपयोग नाही कधी म्हणता फडणवीसांमुळे पडले कधी म्हणता माझ्यामुळे दोन वर्षानंतर त्यांना कळलं मी त्यांना पाडले म्हणून

    गिरीश महाजन ऑन जळगाव सहकारी बँक निवडणूक - राज्यातील अनेक सहकारी बँका डबघाईला आलेल्या आहेत जळगाव जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी आम्ही जळगावला एकत्र आलो सर्व पक्ष एकत्र, बिनविरोध निवडणुका आम्ही करू

    गिरीश महाजन ऑन जळगाव नगरसेवक परतणार - अनेक नगरसेवक पुन्हा परत यायचं म्हणतायत १७ ते १८ जण संपर्कात आहेत अजून विचार केलेला नाही

  • 10 Oct 2021 03:50 PM (IST)

    सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराची सांगता 

    बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराची सांगता

    - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार सांगता सभा

    - पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचीही उपस्थिती

    - सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर पॅलेस मंगल कार्यालयात होतेय सभा

    - थोड्याच वेळात अजित पवार यांचं होणार आगमन

  • 10 Oct 2021 03:36 PM (IST)

    8 वर्षाचे बालक वीज पडून जखमी, उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

    उस्मानाबाद - 8 वर्षाचे बालक वीज पडून जखमी

    शेतात काम करताना पडली वीज

    वाडी बामणी गावातील घटना, गणेश राजेंद्र औटी असे मुलाचे नाव

    उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

  • 10 Oct 2021 02:59 PM (IST)

    हिंदू विरुद्ध शीख युद्ध पेटवण्याचा प्रयत्न होतोय, लखीमपूर दुर्घटनेप्रकरणी वरुण गांधी यांचा भाजपला घरचा आहेर

    लखीमपूर दुर्घटनेप्रकरणी वरुण गांधी यांचा भाजपला घरचा आहेर

    वरुन गांधी भाजपचे खासदार

    हिंदू विरुद्ध शीख युद्ध पेटवण्याचा प्रयत्न होतोय

    एका पिढीसाठी हे धोकादायक आहे

    क्षुल्लक राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ नये

  • 10 Oct 2021 01:57 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात, शेतकऱ्यांच्या मागे लागलेले अस्मानी संकट सुटेना

    उस्मानाबाद - जिल्ह्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात

    शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेले अस्मानी संकट सुटेना

    अगोदरच पाऊसने सोयाबीनचे नुकसान झालेले असताना पून्हा पाऊस

    अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 10 Oct 2021 01:41 PM (IST)

    7 महिन्यांनंतर शिर्डीचं साईबाबा मंदिर उघडलं, सुट्टीच्या दिवशी भाविकांची गर्दीच गर्दी

    सुट्टीच्या दिवशी शिर्डीत भाविकांची गर्दी सात महिन्यानंतर उघडले आहे साई मंदिर मंदिर उघडल्यावर पहिल्याच रविवारी शिर्डीत दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी गेल्या 3 दिवसात 40 हजार हुन अधिक भाविकांनी घेतले साईदर्शन शिर्डीत भक्तांच्या गर्दीमुळे व्यावसायिक समाधानी

  • 10 Oct 2021 01:13 PM (IST)

    जरंडेश्वरचा मालक कोण, किती हजारांचे घोटाळे केले?, सोमय्यांचे पवारांना सवाल

    - पवारांना माझा प्रश्न आहे की जरंडेश्वरचा मालक कोण आहे, किती हजारांचे घोटाळे केले… पवारांना प्रश्न विचारणार… आशा करतो की त्यांच्यात उत्तर देण्याची हिम्मत असावी…

    - बुधवारी पुण्यात अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा आणखी एक खुलासा बाहेर काढणार…

    - यांनी इतके घोटाळे केले आहेत, लूट माजवली… पवार शेतकरी दादा म्हणतात, त्यात कारखाने, रोहित पवार, सुनंदा पवार यांच्या नावाने कारखाने… लुटतात ते…

    चार दिवस रेड सुरू आहे, त्यामुळे आत्ता हा घोटाळा पाच हजार कोटीपेक्षा मोठा घोटाळा आहे…

    -यांना तुरूंगात जावंच लागेल… कायद्याने होत असलेल्या कारवाईला सामोरं जावंच लागेल…

    - मविआने स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांनी लूटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल, मोदींनी करून दाखवलं…

    - घोटाळेच जाळणार… अब्रू नुकसानीचे दावे करतात, अजित पवार, हसन मुंश्रीफ, किशोरी पेडणेकर, नवाब मलिक यांपैकी कुणाचीही हिम्मत झाली नाही की मला त्यांनी प्रश्न विचारावा की एकही पुरावा मी खोटा दिलाय…

    - घोटाळा केलाय तर हिशोब द्यावाच लागेल…

  • 10 Oct 2021 01:11 PM (IST)

    नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीला बळजबरीने लॉजवर नेत विनयभंग

    अल्पवयीन मुलीला बळजबरीने लॉजवर नेत केला विनयभंग - नाशिकच्या अशोकामार्ग परिसरातील कालची धक्कादायक घटना - शाळेत जाणाऱ्या मुलीला तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलावले सांगून कारमध्ये बसवत नेले लॉजवर - पिडीत मुलीने घरी येऊन आईला सर्व प्रकार सांगताच उघड़कीस आली घटना - मुलीच्या नातेवाईकांनी संशयित आरोपी दानिश खानला केली मारहाण - दानिशवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु - संशयित आरोपी दानिश खान विरोधात काल संध्याकाळी मुंबई नाका पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल - आरोपी पिडीत मुलीच्या कुटुंबियांचा ओळखीतील व्यक्ती असल्याची पोलिसांची माहिती

  • 10 Oct 2021 12:33 PM (IST)

    लखीमपूरचं सत्य सांगणार, काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

    नवी दिल्ली - काँग्रेसचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार, लखीमपुर घटनेचा

    राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सात जणांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

    लखीमपूर बाबतचं सत्य राष्ट्रपतीपर्यंत मांडण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार

  • 10 Oct 2021 12:05 PM (IST)

    चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना एनसीबीकडून पुन्हा समन्स

    चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना एनसीबीने पुन्हा समन्स बजावले

    सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले

    कालही NCB ने इम्तियाज खत्रीची 8 तास चौकशी केली होती

  • 10 Oct 2021 11:39 AM (IST)

    महाराष्ट्र बंदला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा

    11 तारखेच्या महाराष्ट्र बंदला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा,

    शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत असल्याचं केलं जाहीर,

    उद्या राज्यभरात महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलीये,

    संभाजी ब्रिगेड उद्याच्या बंदमध्ये होणार सहभागी,

    परिपत्रक काढत दिली माहिती

  • 10 Oct 2021 11:37 AM (IST)

    पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा-बलात्कार प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपी अटक

    पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा, बलात्कार प्रकरण

    आतापर्यंत पाच आरोपी अटक,

    तीन फरार आरोपींचा शोध

    पाचवा आरोपीचे नाव काशिनाथ तेलग,

    लुटण्यात आलेल्या 9 पैकी 3 मोबाईल पोलिसांनी केल्या हस्तगत

  • 10 Oct 2021 11:35 AM (IST)

    कोरोना काळात आई वडिलांंचं छत्र हरपलेल्या मुलांच्या खात्यावर 5 लाख डिपॉझिट

    कोरोना काळात ज्या मुलांना आपले आई, वडील गमवावे लागले आशा मुलांच्या नावावर महिला बाल विकास विभागाच्या वतीने 5 लाख रुपये फिक्स डिपॉजिट करण्यात आले आहेत. आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते, अशा 10 मुलांना हे 5 लाख रुपयांचे फिक्स डिपॉजीटचे प्रमाणपत्र देण्यात आले. मुलांना हे ही रक्कम वयाच्या 21 वर्षानंतर तर मुलींना 18 वर्षानंतर काढता येणार आहे.

  • 10 Oct 2021 11:14 AM (IST)

    पुण्यातील मोतीबागेतील RSS च्या कार्यालयाबाहेर संशयास्पद बॅग आढळली

    पुण्यातील मोतीबागेतील RSS च्या कार्यालयाबाहेर संशयास्पद बॅग आढळली

    बीडीडीएसच्या पथकाला केलं तात्काळ बॅगची केली तपासणी

    संशयास्पद बॅग आढळल्याने काही काळ या परिसरामध्ये तणाव

    बॅगमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, त्यामुळे वातावरण निवळलं

  • 10 Oct 2021 11:02 AM (IST)

    राज ठाकरे पुण्यात 24 तारखेला तळजाई टेकडीवर करणार आंदोलन

    24 तारखेला राज ठाकरे पुण्यात तळजाई टेकडीवर करणार आंदोलन

    सकाळी 7 वाजता आंदोलनाला सुरूवात होणार

    तळजाई टेकडीवर होत असलेल्या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे मैदानात

    शहराध्यक्ष वसंत मोरेंची माहिती

    पुण्यात भाजपा मनसे युतीची कोणतीही चर्चा राज ठाकरेंच्या बैठकीत झाली नाही

    महापालिका निवडणूकीची तयारी सुरू झालीये

    या वर्षी पुण्याचा महापौर मनसे ठरवणार

    वाढदिवसानिमित्त पुणेकरांना दिला मोफत प्रवास

  • 10 Oct 2021 09:52 AM (IST)

    अजित पवारांच्या हस्ते बारामतीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन विभागाचं लोकार्पण

    महाविद्यालयातील आयसीयू वॉर्ड लवकर सुरु करा.. जेणेकरुन रुग्णांची सोय होईल.. सीटी स्कॅन युनिटही लवकर सुरु करा. गोरगरीबांचं जीवन सुखकर होण्यासाठी सुविधा लवकर द्या सीएसआरमधून मिळणारी उपकरणं लोकांसाठी वापरा डॉक्टर्स आणि कर्मचारी मेहनत घेतायत ५०० बेडची क्षमता असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय वापरता आले नाही याची खंत काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत द्या.. ती पाळली नाही तर मग आम्ही पुढील कारवाई करु

    आम्ही वैद्यकीय महाविद्यालय लोकांना दाखवण्यासाठी केलेलं नाही.. लोकांच्या आरोग्याची सुविधा करण्यासाठी हे महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालयाला ज्या कंपन्यांनी विविध उपकरणे दिलीत त्यांचे आभार कोरोना काळात सर्वच रुग्णालये जीवनवाहिनी झाली.. आजारी रुग्णांना जीवदान देण्याचं काम रुग्णालये करतायत डॉक्टर्स, नर्सेस काम करतायत मुंबईतील हॉस्पिटल्समध्ये ज्या तोडीची व्यवस्था ती व्यवस्था बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात करुन दिली आहे इथे कोणत्याही सुविधा बंद राहिल्या नाही पाहिजेत..

    आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारावी सकाळी लवकर उठलं पाहिजे.. बारामती मेडीकल हब होवू पाहतंय बारामतीच्या आयुर्वेद महाविद्यालयासाठी २२५ कोटींच्या निधीला मंजूरी

  • 10 Oct 2021 09:13 AM (IST)

    - नाशिकमध्ये प्रथमच संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) ची आज पूर्व परीक्षा

    - नाशिकमध्ये प्रथमच संघ लोकसेवा आयोगाची (UPSC) ची आज पूर्व परीक्षा - शहरातील 10 केंद्रांवर होणार परीक्षा - 3445 विद्यार्थी 10 केंद्रांवर बसणार परीक्षेला - नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची या परीक्षेसाठी समन्वयक पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती - परीक्षेकरिता 480 अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती - कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचं पालन करून परिक्षेचे नियोजन - 9:30 ते 11:30 या दरम्यान GS तर दुपारी 2:30 ते 4:30 या दरम्यान CSAT हे पेपर होणार

  • 10 Oct 2021 09:00 AM (IST)

    उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविला

    उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविला. वीस हजार क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग वाढविला. काल रात्री नऊ वाजता पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास झाली होती सुरूवात. उजनी धरणाचे सोळा दरवाजे ३५ सेंटीमीटर ने उघडून वीस हजार क्युसेक्स ने पाणी भीमा नदीच्या पात्रात. नदी काठच्या गावांना व नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.

  • 10 Oct 2021 09:00 AM (IST)

    सोलापूर- बार्शी तालुक्यातील 48 गावांना पंचनाम्यातुन वगळले

    सोलापूर- बार्शी तालुक्यातील 48 गावांना पंचनाम्यातून वगळले

    तालुक्यात पडत आहे सातत्याने पाऊस

    अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीचे झाले आहे नुकसान

    तालुक्यातील अनेक भागात सुरू आहेत पंचनामे

    मात्र तालुक्‍यातील चार मंडळातील 48 गावांना अतिवृष्टीमधून वगळले

    48 गावांचा समावेश करण्याची शेतकऱ्यांची मागणी

  • 10 Oct 2021 08:59 AM (IST)

    सोलापुर -नवरात्रीमुळे जिल्ह्यात तीन लाख डोस शिल्लक

    सोलापुर --नवरात्रीमुळे जिल्ह्यात तीन लाख डोस शिल्लक

    उपवासामुळे लसीकरणाचा प्रतिसाद मंदावला

    हवामान बदलाने आजारी पडण्याचे प्रमाण वाढले

    परिणाम होऊन बसतं असा वेग मंदावला

  • 10 Oct 2021 08:46 AM (IST)

    कोरोना लसीकरणचे मिशन कवच कुंडल अभियान

    कोरोना लसीकरणचे मिशन कवच कुंडल अभियान

    कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन

    52 टक्के लाभार्थ्यांना पहिला तर 20.85 टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण

    आतापर्यंत 6 लाख 82 हजार (52 टक्के) लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 2 लाख 73 हजार (20.85 टक्के) लाभार्थ्यांना दुसरा डोस देऊन संरक्षित

  • 10 Oct 2021 08:46 AM (IST)

    सोलापूर-- लसीकरणाची वेळ आता सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत

    सोलापूर-- लसीकरणाची वेळ आता सायंकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत

    शेतकरी, कामगार, ग्रामस्थ रात्री  कामावरून उशिरा घरी येत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

    जिल्ह्यात एकही डोस न घेतलेले 16 लाख नागरिक

    मिशन कवच-कुंडल अभियानांतर्गत जिल्ह्यातील शंभर टक्के नागरिकांना लस देण्यात येणार

  • 10 Oct 2021 08:45 AM (IST)

    सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गसाठी 33 गावातील 660 हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

    सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गसाठी 33 गावातील 660 हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

    सांजा गावातील श्रीराम मंदिर, तुळजाभवानी देवस्थानसह सरकारी, खासगी, प्लॉटधारक भूखंडाचा समावेश

    पुढील आठवड्यात प्रत्यक्ष भूसंपादन कारवाईला होणार सुरुवात

  • 10 Oct 2021 08:33 AM (IST)

    चंद्रपुरात घरफोडी करणार्‍या बंटी-बबलीला अटक

    घरफोडी करणार्‍या बंटी-बबलीला अटक

    दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    भरदिवसा व रात्रीच्या सुमारास विविध ठिकाणी घरफोडी करणार्‍या बंटी-बबलीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.

    आरोपींडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 1 लाख 54 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

  • 10 Oct 2021 08:21 AM (IST)

    कळंबा जेलच्या आयटीआय सेलमध्ये आढळला मोबाईल

    कळंबा जेलच्या आयटीआय सेलमध्ये आढळला मोबाईल

    जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

    खिडकी जवळील चपतीच्या गठ्ठ्यांमध्ये मोबाईल सापडला

  • 10 Oct 2021 08:08 AM (IST)

    पिंपरी चिंचवडकरांनो, महाराष्ट्र बंदमध्ये सामिल व्हा, महाविकास आघाडीचं आवाहन

    उत्तरप्रदेश राज्यातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या मंत्री पुत्राने धावते वाहन घातले. यात पाच शेतक-यांचा दुर्दैवी अंत झाला. याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे

    -या बंद मध्ये पिंपरी- चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या सहभागी व्हावे असे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसने केले.

    - पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे.

  • 10 Oct 2021 07:49 AM (IST)

    आप आणि तृणमूल काँग्रेस काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देतायत- राहुल गांधी

    आप आणि तृणमूल काँग्रेस काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत.

    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मनातील खंत.

    शिवसेना मुखपत्र 'सामाना'त आज प्रसिद्ध झालेल्या 'रोखठोक' सदरात संजय राऊत यांनी राहुल गांधींशी दिल्लीत झालेल्या गप्पांचा तपशील लेखात सांगितला.

    गोव्यात काही संबंध नसताना तृणमूल व आप आली. आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत श्री. राहुल गांधींनी बोलून दाखवली. ती खरीच आहे.

    उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला निघाले आहेत. त्यामुळे 'खुलकर' कुणीच लढत नाही. श्री. राहुल गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा.

    पंजाबचा तिढा नक्कीच सुटेल. सगळे आमदार काँग्रेस सोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवर त्यांची नाराजी होती. सिद्धू सुद्धा शांत होतील असा दावा राहुल गांधी यांनी संजय राऊत यांच्याशी मारलेल्या गप्पांमध्ये व्यक्त केला.

  • 10 Oct 2021 07:42 AM (IST)

    आर्यनला अटक झाल्यानंतर बायजूस लर्निंग अॅपने शाहरुख खानसोबतचे संबंध तोडल्याची माहिती

    आर्यन खानला अटक झाल्यानंतर बायजू लर्निंग ऐप या मोठ्या ब्रँडने शाहरुख खान सोबतच संबंध तोडल्याची सुत्रांची माहीती… - एडवांस पेमेंट दिल्यानंतर देखील या ब्रँडने शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. - शाहरुख खानच्या मोठ्या प्रोजेक्टस पैकी हा एक प्रोजेक्ट असल्याचं म्हंटलं जातंय. - इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार काही जाणकारांनी सांगितलं, एडटेक स्टार्टअप या कंपनीला गेल्या काही दिवसात ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या ट्रॉलिंगचा सामना करावा लागला. - यानंतर त्यांनी जाहिरातींसाठी ॲडव्हान्स बुकिंग होऊनदेखील शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. - बायजू या ब्रॅण्डने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. - बायजू हे लर्निंग अॅप शाहरुखसोबतचा करार मोडणार असल्याच्या चर्चा आहे. - मात्र बायजू ॲपच्या प्रवक्त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिलाय

  • 10 Oct 2021 07:41 AM (IST)

    औरंगाबाद शहरात कवच कुंडल योजना संकटात

    औरंगाबाद शहरात कवच कुंडल योजना संकटात..

    महापालिकेला मिळेनात लस देणारे कर्मचारी..

    कमी मनुष्यबळातच राबवावी लागतेय कवचकुंडलं मिशन योजना..

    कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कवच-कुंडल योजना संकटात सापडण्याची शक्यता..

    विविध वैद्यकीय विभागांना डाटा एंट्री ऑपरेटर आणि लस देणार्‍यांची केली होती मागणी मात्र प्रतिसाद मिळेना

  • 10 Oct 2021 07:31 AM (IST)

    सोमवारी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र

    सोमवारी महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र

    चौका चौकात करणार निदर्शन

    बंद यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्षांनी घेतली बैठक

    उत्तर प्रदेश मधील लखीमपूर मध्ये घडलेल्या घटने विरोधात महाराष्ट बंद

    राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यालयात घेण्यात आली बैठक

  • 10 Oct 2021 07:24 AM (IST)

    आयकर विभागाच्या कारवाईनंतर प्रथमच अजित पवार यांचा बारामती दौरा

    आयकर विभागाच्या कारवाईनंतर प्रथमच अजित पवार यांचा बारामती दौरा

    - अजित पवार यांची नियमीत कामे सुरु..

    - सकाळी ६ वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात..

    - शारदानगर येथील कृषी महाविद्यालयाच्या बैठकीनंतर अजित पवारांचा विकासकामांचा पाहणी दौरा

  • 10 Oct 2021 07:16 AM (IST)

    अहमदनगर शहरात जोरदार पाऊस, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

    अहमदनगर शहरात जोरदार पाऊस

    विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

    पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप तर पावसाच्या पाण्याने गाड्या बुडून गेल्या

    पावसामुळे सखोल भागात पाणी साचले

  • 10 Oct 2021 07:15 AM (IST)

    राज्यातील महाविद्यालयातीव रिक्त प्राचार्य पदांची भरती करा, शिक्षण उच्च संचालनालयाचे आदेश

    राज्यातील महाविद्यालयातीव रिक्त प्राचार्य पदांची भरती करा,

    शिक्षण उच्च संचालनालयाचे आदेश,

    राज्य शासनाने प्राचार्य पदभरतीला परवानगी दिली असतानाही अनेक महाविद्यालयात नाहीत पूर्णवेळ प्राचार्य,

    येत्या 15 दिवसांत प्राचार्य भरती करा अन्यथा नवीन शिक्षक भरतीसाठी मान्यता मिळणार नाही,

    उच्च शिक्षण संचालनालक डॉ. धनराज माने यांनी काढले आदेश,

    राज्यात 260 प्राचार्यांची पदं भरण्यास राज्य सरकारनं मार्च 2021 मध्ये परवानगी दिलीये

  • 10 Oct 2021 07:03 AM (IST)

    पुण्यात पेट्रोलच्या दरात आणखी 1 रुपयांची वाढ

    पुण्यात पेट्रोलच्या दरात आणखी 1 रुपयांची वाढ,

    पुण्यात आज पेट्रोलचा दर 109 रुपये 62 पैशांवर,

    तर पॉवर पेट्रोल 113 रु 30 पैशांवर,

    डिझेलच्या दरातही 1 रूपयाची झाली वाढ

    डिझेल प्रति.लिट 98.63 पैशांवर

    वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतीनं सर्वसामान्य हैराण

  • 10 Oct 2021 06:58 AM (IST)

    पुण्यात पहाटेपासून पावसाची विश्रांती

    पुण्यात पहाटेपासून पावसाची विश्रांती,

    मात्र काल रात्री झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी साचलं होतं पाणी,

    येरवडा, धानोरी, परिसरात काही सोयायट्यांच्या पार्कींगमध्ये शिरलं होतं पाणी,

    पावसाच्या पाण्यानं रात्री झाली होती वाहतूक कोंडी

  • 10 Oct 2021 06:42 AM (IST)

    मूनमून धामेचाने सॅनटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपवलं, एनसीबीकडून व्हिडीओ जारी

    मुंबईजवळ समुद्रात क्रूझवर छापा टाकत ड्रग्ज पार्टी उधळल्यानंतर तपासात नवी माहिती पुढे येत आहे. - या पार्टी प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यांनी ड्रग्ज नेमके कुठे लपवले होते, याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीये… - आरोपी मूनमून धामेचा हिने ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला, असा एनसीबीचा दावा आहे. - मूनमून धामेचा क्रूझवर ज्या खोलीत होती तिथल्या झडतीचा एक व्हिडीयो एनसीबीने जारी केलाय… - तिथे सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एनसीबीकडून करण्यात आला आहे. - याप्रकरणात ज्या तरुणींना अटक करण्यात आली आहे त्यांनीही ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला होता - तर तरुणांनी शूजमध्ये ड्रग्ज लपवले होते, असाही एनसीबीचा दावा आहे

  • 10 Oct 2021 06:40 AM (IST)

    लसीकरणाचे दोन डोज न घेतलेल्यांना प्रवेश देणारे स्थळ सील होणार, नागपूर मनपा आयुक्तांचे निर्देश 

    लसीकरणाचे दोन डोज न घेतलेल्यांना प्रवेश देणारे स्थळ होणार सील , मनपा आयुक्तांचे निर्देश

    नियमांच्या अधिन राहून नागपूर शहरातील धार्मिक स्थळे, मॉल आदी सुरू करण्यात आले आहेत.

    कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी या स्थळांमध्ये लसीकरणाचे दोन डोज घेतलेल्यांनाच प्रवेश देणे अनिवार्य आहे.

    कुठलाही धार्मिक कार्यक्रम घेणारी आयोजन समिती, मॉलचे व्यवस्थापन प्रशासन यांनी याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.

    मनपातर्फे धार्मिक स्थळे व मॉलची तपासणी सुरू

    लसीकरणाचे दोन डोज न घेतलेल्यांना प्रवेश देण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित स्थळ सील करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.

  • 10 Oct 2021 06:39 AM (IST)

    चिंचपूर येथील देवस्थानाची जमीन घोटाळा प्रकरण, बडतर्फ अप्पर जिल्हाधिकारी NR शेळकेला अटक

    चिंचपूर येथील देवस्थानाची जमीन घोटाळा प्रकरण

    बडतर्फ अप्पर जिल्हाधिकारी NR शेळकेला अटक

    देवस्थान जमीन घोटाळ्यात आतापर्यंत 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याच्यावरही गुन्हा दाखल

    आघाव याला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

  • 10 Oct 2021 06:38 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचं थैमान

    पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील पावसाने चांगलेच थैमान घातले

    -सायंकाळी सुरू झालेल्या पाऊसने तुफान बॅटिंग केली,नंतर पाऊसाचा जोर कमी झाला मात्र संततधार सुरू होती

    -खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द मधील शेतकरी धनंजय थोरवे यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरले

    -गावातील सार्वजनिक ओढा बुजवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घराजवळ आणि गोठ्या मध्ये पाणी साचले असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय

  • 08 Oct 2021 04:53 PM (IST)

    एएसजी आणि मानेशिंदे यांच्यात खडाजंगी

    एएसजी यांनी शोईक चक्रवर्ती याच्या हायकोर्टाच्या जामीन आदेशाचा हवाला दिला.

    एएसजी - एका गुन्ह्यात 17 जणांचा सहभाग असलेले हे प्रकरण आहे. दुवा, संबंध आणि सहभागाचा मुद्दा बाजूला... तपास प्राथमिक टप्प्यावर आहे.

    एएसजी : लोक किती प्रभावशाली आहेत याचा विचार करावा लागेल. छेडछाड होण्याची शक्यता आहे. तसेच हे काही वेगळे प्रकरण नाही. जामिनाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचे संरक्षण तपासात अडथळा आणेल.

    मानेशिंदे - मी अगदी स्पष्ट केले की मी हक्काचा विषय म्हणून जामीन मागत नाही. मी असे म्हटले नाही की सेक्शन जामीनपात्र आहेत. म्हणून मी सीआरपीसीचे कलम 437 वाचले. परंतु फिर्यादी असे म्हणू शकत नाही की आपण (मॅजिस्ट्रेट कोर्ट) रिमांडसाठी नियमित न्यायालय आहात, जामीनसाठी नाही.

    मानेशिंदे : 36 ए पुन्हा दिसू शकते. एनडीपीएस कायद्याच्या 36 ए मध्ये जामीन मंजूर करण्याबद्दल नव्हे तर खटल्याबद्दल बोलले आहे. जामीन मंजूर करण्यासाठी कलम 437 सीआरपीसी वाटते

    फक्त 27 ए लागू केले जाते म्हणून संपूर्ण प्रकरण, तो आरोप माझ्यावर फोडता येणार नाही

    मानेशिंदे : स्टीफन म्युलरच्या निर्णयात कायदा निश्चित केला आहे आणि रिया चक्रवर्तीचा त्यानंतरचा निर्णय अर्थ आणि प्राधान्याच्या नियमाच्या पलीकडे आहे. ते असे म्हणतात की समन्वय खंडपीठ वेगळे मत घेऊ शकत नाही.

    मानेशिंदे - हे सर्व मी जर असे म्हणत आहे की सेक्शन्स जामीनपात्र आहेत तरच हे सर्व उद्भवेल. तुम्ही माझ्यावर कोणत्याही गोष्टीचा आरोप करता, पण साहित्याशिवाय मला जामीन मिळण्याचा हक्क आहे.

    मानेशिंदे : खान यांच्याविरूद्ध कोणत्याही मटेरियलशिवाय हे प्रकरण आहे. त्यांनी मला 7 दिवस रोखून धरले. मी पुराव्याशी छेडछाड करेन असं त्यांना म्हणायचं असलं तरी मी ते कसं करेन याची सकारात्मक केस त्यांनी घेऊन यायला हवी.

Published On - Oct 10,2021 6:36 AM

Follow us
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.