Maharashtra News LIVE Update | ‘आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलंय’, संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला इशारा

| Updated on: Sep 04, 2021 | 11:34 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News LIVE Update | 'आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलंय', संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला इशारा
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Sep 2021 06:25 PM (IST)

    ‘आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलंय’, संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला इशारा

    खेड तालुक्यात शिवसेनेचा भाजपला दणका, भाजपा पदाधिकाऱ्यांचे शिवसेनेत प्रवेश, शिवसेना नेते संजय राऊतांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, संजय राऊतांचा तलवार भेट देऊन सन्मान

    संजय राऊत यांच्या भाषणातील मुद्दे 

    खेडमध्ये शिवसेनेत उत्साह

    थोडी शिस्त आणली की दिलीप मोहिते घरी

    आपण भल्याभल्यांना अंगावर घेतलंय

    संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा डिवचलं

    सत्ता हा आमचा आत्माप्राण नाही,

    खेडमध्ये जे राजकारण झालं ते गलिच्छ,

    विद्यमान आमदारांना थोडी तरी माणुसकी असती तर असं घाणेरडं राजकारण केलं नसतं

    आघाडी सरकारमध्ये विषय बसून सोडवले जातात,

    मात्र हे आमदार महाशय,

    जे काही घडलंय त्याची नोंद ठेवलीये,

    राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांना संजय राऊतांचा इशारा

    आम्ही कोणाच्या वाट्याला जात नाही,

    आज पोलीस आमचे कार्यकर्ते उचलतायेत उद्या आम्ही त्यांना उचलू

    राजकारणात आमचा पिढीजात धंदा तो आहे,

    राजकीय कार्यकर्त्यांनी सूड उगवायचं सोडायचं नसतं,

    भाजपाच्या माणसानं एक माणूस उभा केला

    भाजपानं युतीतही गद्दारी केली

    संजय राऊतांची भाजपावर सडकून टिका

    यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेलो

    तुम्ही आमचे उमेदवार पाडत राहिलात आम्ही तुमचं सरकार पाडलं

    संजय राऊतांची भाजपवर टिका

    पुढचा आमदार हा शिवसेनेचाच

  • 04 Sep 2021 05:46 PM (IST)

    राष्ट्रवादीने राजू शेट्टींचं नाव दिलं आहे, राज्यपालांनी निर्णय घ्यावा : शरद पवार

    राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टीचं नाव विधान परिषदेच्या आमदारांसाठी पाठवलं आहे. याबाबत राज्यपालांना निर्णय घ्यायचा आहे. शेती आणि सहकार क्षेत्रात शेट्टींचं नाव आहे. राष्ट्रवादीने राजू शेट्टींना दिलेला शब्द पाळला, असं शरद पवार म्हणाले.

    शरद पवार नेमकं काय म्हणाले?

    ते नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीनं दिलेली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलं आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केलं मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय.

  • 04 Sep 2021 04:57 PM (IST)

    यवतमाळमध्ये खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

    यवतमाळ :

    खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू वणीच्या गोकुळनगर येथील घटना प्रमोद सुनील पोटे असे मृत चिमुकल्याचे नाव घराजवळ खेळत असताना खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात पडून प्रमोदचा दुर्दैवी मृत्यू तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर खड्ड्यातील पाण्यातून काढला चिमुकल्या प्रमोदचा मृतदेह घटनास्थळी पोलीस दाखल

  • 04 Sep 2021 04:55 PM (IST)

    अरमान कोहलीचा जमीन फेटाळला

    मुंबई :

    अरमान कोहली याचा जमीन फेटाळला

    महानगर दंडाधिकारी कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

    अरमान कोहली याला 28 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे

    एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने त्याला जुहू येथून अटक केली होती.

  • 04 Sep 2021 04:00 PM (IST)

    सीना कोळेगाव धरणात स्थानिक लोकांना मासेमारी करण्याच्या मागणीचे आंदोलन पोलिसांनी बंद पाडले

    उस्मानाबाद :

    सीना कोळेगाव धरणात स्थानिक लोकांना मासेमारी करण्याच्या मागणीचे आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून बंद केले

    उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती इमारतीच्या गच्चीवर मच्छिमार करणाऱ्यांचे आंदोलन सुरू होते

    मासेमारीचा ठेवा रद्द करून स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

    पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बळाचा वापर करीत केली अटक

  • 04 Sep 2021 03:57 PM (IST)

    गोंदियात पावसाचं जोरदार कमबॅक, विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दमदार पाऊस

    गोंदिया जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जोरदार विजेच्या गडगडाटासह आज हजेरी लावली. त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून शेतकरीही पावसाची वाट बघत होते. त्यांना या पावसाने दिलासा मिळाला आहे. तसेच सर्वसामान्य जनता उकाळ्याने हैरान झाली होती. मात्र आज आलेल्या पावसाने जिल्हातील नागरिकांना काही प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.

  • 04 Sep 2021 03:22 PM (IST)

    वसई-विरारमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या मोठ्याच मोठ्या रांगा

    वसई-विरारमध्ये लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या मोठ्याच मोठ्या रांगा लागल्या आहेत.

    महापालिका हद्दीत आज 43 लसीकरण केंद्रावर 28 हजार 500 कोव्हीशिल्ड लसीचे होत आहे लसीकरण

    वसईच्या वरून कोव्हिडं सेंटर मध्ये सर्वात जास्त 4000 लसीचा मोठा मेगा कॅम्प ठेवला असून, यासाठी जवळपास 1 किलोमीटर पर्यंत लसीकरण साठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.

    वसई विरार नालासोपाऱ्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली असून लसीकरण मात्र सुरळीत सुरू आहे.

    50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के ऑफलाईन प्रमाणे लसीकरण देण्यात येत आहे.

  • 04 Sep 2021 02:48 PM (IST)

    कौतुकाचे खरे मानकरी डॉक्टर : मुख्यमंत्री

    मुंबईच्या नायर रुग्णालयाला आज 100 वर्ष पूर्ण झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

    मुख्यमंत्री काय म्हणाले?

    मी फक्त कौतुक करु शकतो. शुभेच्छा देऊ शकतो. अभिनंदन करु शकतो. मात्र या संस्थेचा प्रवास सांगणारी जी एक शॉर्टफिल्म दाखवली ती थक्क करणारी आहे. सुरुवात कशी झाली. एखादी गोष्ट टिकवणं खूप गरजेचं असतं. संस्थेने त्या प्रतिकूल काळात काम सुरु ठेवलं. पारतंत्र्याच 25 वर्षे, जिद्द काय असू शकतं हे त्याचं अप्रतिम उदाहण आहे. जिद्द असेल तर काही नसलं तर करता येऊ शकतं हे या संस्थेने दाखवलं आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वत:चा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचवण्याचं काम सर्व डॉक्टर्स आणि पारिचारिकांनी केलं. रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेली शंभर वर्ष अहोरात्र मेहनत केली. मी मागे म्हटलं होतं. मंदिरं बंद आहेत, प्रार्थना बंद आहेत. देव आहेत कुठे? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं. व्यथा घेऊन जसं मंदिरात जातो तसं कुणीतरी दुर्दर आजाराने त्रस्त होऊन अनेकजण इथे येतात. त्यांच्यापैकी बहुतेक जण बरे होऊन हसतखेळत जातात. त्यामुळे तुमच्या सर्वांना मी मानाचा मुजरा करतो.

  • 04 Sep 2021 12:31 PM (IST)

    मनमाड येथे  लस घेण्यासाठी नागरिकांनी आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी

    मनमाड येथे  लस घेण्यासाठी नागरिकांनी आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी

    आरोग्य केंद्रा बाहेर लस घेण्यासाठी लागली रांग

    सटाणा तालुक्यातील अंबासण येथील घटना

  • 04 Sep 2021 11:34 AM (IST)

    अंबरनाथमध्ये कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार नाल्यात कोसळली

    अंबरनाथ :

    अंबरनाथमध्ये कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार गेली नाल्यात

    नाल्याला रेलिंग नसल्यानं कार नाल्यात कोसळली

    अंबरनाथ पश्चिमेच्या गावदेवी मंदिर ते वुलन चाळ रस्त्यावर अपघात

    क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आलं यश

  • 04 Sep 2021 08:18 AM (IST)

    गंगापूर धरण 91 टक्के भरलं

    नाशिक - गंगापूर धरण 91 टक्के भरलं

    तर इतर धरण साठ्यांमध्ये सरासरी 66 टक्के पाणीसाठा

    गतवर्षीच्या तुलनेत नाशिकला धरणात पाणीसाठा कमीच

    गेल्या वर्षीच्या तुलनेत गंगापूर धरणात 4 टक्के कमी पाणीसाठा

    त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्यावरून राजकीय पेच निर्माण होण्याची शक्यता

  • 04 Sep 2021 07:31 AM (IST)

    नागपुरातील युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल

    नागपुरातील युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल,

    पैशासाठी कोंडून दिली जीवे मारण्याची धमकी,

    हितेश यादव असं गुन्हा दाखल झालेल्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाचं नाव,

    कंत्राटदार अभय भांडारकर असं तक्रारदाराचं नाव,

    अभय भांडारकर यांच्याकडे होते कृष्णराव एलामपुल्ली यांचे पैसे,

    हे पैसे मिळवून देण्यासाठी हितेश यादव याने अभय भांडारकर यांना दिली धमकी,

    हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

    यापूर्वीही युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर लागले आहे खंडणी आणि धमकीचे आरोप

  • 04 Sep 2021 07:31 AM (IST)

    तारापूर MIDC मधील जखारिया लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये ब्लास्ट

    पालघर -

    तारापूर MIDC मधील जखारिया लिमिटेड कंपनीच्या बॉयलरमध्ये ब्लास्ट

    ब्लास्ट नंतर कंपनीला लागली भीषण आग,

    ब्लास्ट ची आवाज 4 किलोमीटर पर्येंत गेली,

    घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 3 गाड्या हजर

    आग विझवण्या साठी शर्तीचे प्रयत्न सुरू,

    4 जण जखमी झाल्याच्ची प्राथमिक माहिती येत आहे

  • 04 Sep 2021 07:29 AM (IST)

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने वनविभागाची तब्बल 18 एकर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न

    पुणे -

    - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने वनविभागाची तब्बल 18 एकर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न,

    - तत्कालीन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीचा बनावट आदेश तयार करीत एकाने थेट प्रशासनाची दिशाभुल,

    - हडपसर परिसरतील वनविभागाची तब्बल 18 एकर जमीन बळकाविण्याचा प्रयन्त,

    - विशेष म्हणजे संबंधीत व्यक्तीचे नावही सातबारावर लागले होते,

    - बाजारभावानुसार संबंधीत जागेची किंमत दोनशे कोटी रुपये इतकी होत आहे,

    - महसुल विभागाने याप्रकरणी तत्काळ खडक पोलिसांकडे तक्रार केली आहे.

  • 04 Sep 2021 07:27 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात यंदा पोळा भरणार नाही

    - नागपूर जिल्ह्यात यंदा पोळा भरणार नाही

    - जिल्ह्यात यंदा बैलपोळा आणि तान्हा पोळा भरण्यावर प्रशासनाचे निर्बंध

    - नागपूर जिल्हाधिकारी विमला आर यांनी यांनी जारी केले आदेश

    - पोळा सणाला यात्रा आणि मेळाव्याचं असते आयोजन

    - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर पोळ्यावर निर्बंध

  • 04 Sep 2021 07:21 AM (IST)

    नागपुरात जनावरंही खाणार नाहीत असा आहार बालकांना

    नागपूर

    - जनावरंही खाणार नाहीत असा आहार बालकांना

    - शालेय पोषण आहारात निकृष्ट व भेसळयुक्त आहाराचा पुरवठा

    - महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत शालेय पोषण आहाराचं वाटप

    - गरोधर माता, स्तनदा माता आणि सहा वर्षाखालील मुलांना वाटप

    - निकृष्ट आहार असल्याच्या अनेकांच्या तक्रारी

    - नागपूरातील बडा पुरवठादार मंत्र्यांच्या जवळचा असल्याचाही होतो आरोप

  • 04 Sep 2021 07:18 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील 91 गावे बनले कोरोनाचे हॉटस्पॉट

    - पुणे जिल्ह्यातील 91 गावे बनले कोरोनाचे हॉटस्पॉट,

    - जिल्ह्यातील टॉप टेन हॉटस्पॉट गावांमध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश,

    - सद्यस्थितीत हॉटस्पॉट गावांच्या यादीत नऊ तालुक्यातील गावे आहेत.

    - दरम्यान, खेड, मावळ, भोर आणि वेल्हे या चार तालुक्यातील एकही गाव हॉटस्पॉट गावांच्या यादीत नाही,

    - सध्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावच्या हद्दीत सर्वाधिक ६६ सक्रिय कोरोना रुग्ण

  • 04 Sep 2021 06:51 AM (IST)

    मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे

    मुंबईमध्ये रात्री अनेक ठिकाणी थांबून-थांबून रिमझिम पाऊस पडत होता

    तर ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे

    काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता परत पावसाचे पुनरागमन होत आहे

    राज्यात 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान या दोन दिवस परत पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

  • 04 Sep 2021 06:41 AM (IST)

    मंद्रुप पोलिसांनी पकडला 11 लाख किमतीचा गुटखा

    सोलापूर -

    मंद्रुप पोलिसांनी पकडला 11 लाख किमतीचा गुटखा

    वर नारळाचे पोते आणि खाली गुटख्याचे  पोते टाकून कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीस येत होता

    कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर पोलिसांनी पकडली अवैध गुटखा वाहतूक करणारी टेम्पो

Published On - Sep 04,2021 6:35 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.