Maharashtra News Live Update : आता शिवसेना उभी राहणार नाही; संजय राऊत पत्रकार नाही जोकर आहे; नारायण राणेंनी राऊतांसह शिवसेनेवर साधला निशाना

| Updated on: Jul 27, 2022 | 12:05 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : आता शिवसेना उभी राहणार नाही; संजय राऊत पत्रकार नाही जोकर आहे; नारायण राणेंनी राऊतांसह शिवसेनेवर साधला निशाना
मोठी बातमी

मुंबई : आज मंगळवार 26 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.पुणे जिल्हा परिषदेने ठेकेदारांवर ‘वॉच’ ठेवणारे मोबाईल ॲप विकसित. झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप अस या ॲपचे नाव आहे. या ॲपमुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बसून जिल्ह्याच्या विविध भागात चालू असलेल्या विकासकामांवर नजर ठेवता येणार. झेडपी मुख्यालयातूनच एका क्लिकवर विकासकामांचा दर्जा समजू शकणार. हे ॲप जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी जोडले जाणार. झेडपीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंते हे कार्यालयात बसल्या बसल्या कामाचा दर्जा तपासू शकणार. मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या साहाय्याने जिल्हा परिषदेने हे मोबाईल ॲप विकसित केल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jul 2022 10:00 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोरिवली पश्चिमेला पोलीस वसाहतीची पहाणी;जल्लोषात स्वागत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोरिवली पश्चिमेला पोलीस वसाहतीची पाहणी करण्यासाठी पोहोचले.

    बोरिवली पश्चिम पोलिसांची अवस्था दयनीय आहे, ​​कुणाच्या छताचा भाग पडला, तर कुणाच्या घराच्या छताला खड्डे

    विशेषत: पावसाळा आला की पोलीस कुटुंबाचे राहणे कठीण होऊन बसते

    अशा स्थितीत एका मुख्यमंत्र्यांना प्रथमच आपल्या घरी पाहून पोलीस कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत

    पोलिसांच्या कारभारात जी काही अडचण आली ते सर्व त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलीस कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून त्यांच्या घराची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले

  • 26 Jul 2022 09:22 PM (IST)

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारपासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारपासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर

    विरोधी पक्षनेते अजित पवार गुरुवारपासून गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, नांदेड, बीड दौऱ्यावर

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार

  • 26 Jul 2022 09:19 PM (IST)

    पोलिसांच्या घराचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबईच्या पोलिसांचा घराचा प्रश्न ऐरणीवर असून याची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

    तहसीलदार ऑफिसजवळील पोलीस वसाहतीची पाहणी पोलिसांच्या घराचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल पोलीस भर्तीदेखील लवकर करणार

  • 26 Jul 2022 09:14 PM (IST)

    यवतमाळमधील बोरी अरब येथील पुलावर पावसामुळं पाणी; एक व्यक्ती गेली वाहून; नागरिकांनी वाचवले

    बोरी अरब येथील पुलाचे बांधकाम सुरु आहे, तात्पुरता पूल कमी उंचीचा असल्याने नेहमी वाहतूक ठप्प अनेक जण पाणी पुलावरून असतानाही पुलावरून जाण्याची हिम्मत करतात. आज पुलावरून पाणी वाहत होते. यातच तीन व्यक्तीनी वाहत्या पाण्यात पुलावरून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक व्यक्ती वाहून गेली होती मात्र त्याला तेथील एका व्यक्तीने वाहत्या पाण्यात उडी घेऊन वाचवले.

  • 26 Jul 2022 09:06 PM (IST)

    शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यास आश्चर्य वाटायला नको, पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

    शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. हा मुद्दा आता निवडणूक आयोगाकडे गेलाय. अशावेळी शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यास आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेचं चिन्ह, नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. इतकंच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उरलेले आमदार फोडण्याचा डाव आहे. त्यासाठी साम, दाम, दंडाचा वापर केला जातोय. सावध राहा असं पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं.

  • 26 Jul 2022 08:54 PM (IST)

    औषधे, वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही, मुख्यमंत्र्यांचे आरोग्य विभागाला निर्देश

    आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा असून, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून खरेदी करावयाच्या औषधे, सर्जिकल्स साहित्य, कन्झुमेबल्स, रसायने व उपकरणे यांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

    राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत 1 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उप योजना तसेच विशेष घटक योजना इत्यादी निधीतून मंजूर करण्यात आलेल्या परंतू निविदा न काढलेल्या कामाच्या अंमलबजावणीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यासंबंधीचे रितसर प्रस्ताव तात्काळ सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर निर्णयार्थ सादर करण्यात यावेत, असे मुख्य सचिवांनी कळविले आहे.

  • 26 Jul 2022 08:52 PM (IST)

    नारायण राणेंची खाल्ल्या मिठाला जागावं, राणेंच्या ठाकरेंवरील टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर

    नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. नारायण राणेंची भाषा असंसदीय आहे. त्यांनी टीका जरुर करावी मात्र त्याची एक भाषा असावी. जर केंद्रीय मंत्री अशा भाषेत बोलत असेल तर हे दुर्दैव आहे. नारायण राणे जसं उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतात, तसंच उद्धव ठाकरेही राणेंना खूप जवळून ओळखतात. त्यामुळं खालेल्ल्या मिठाला जागायला हवं. नारायण राणेंचा रक्तरंजित इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असा पलटवार मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलाय.

  • 26 Jul 2022 08:47 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पोलीस वसाहतीतील घरांची पाहणी

    राज्यासह मुंबईतील पोलिसांच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून अनुत्तरीत आहे. अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या पोलिसांचा घराचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोरिवरीलतील नाटकवाला इथल्या तहसीलदार कार्यालयाजवळील पोलीस वसाहतीत जात पोलिसांच्या घरांची पाहणी केली. त्यावेळी पोलिसांच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल. तसंच पोलीस भरतीही लवकर करण्यात येईल, अशी माहिती शिंदे यांनी दिलीय.

  • 26 Jul 2022 08:05 PM (IST)

    पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; आज पुण्यासह १८ जिल्ह्यांना IMDकडून इशारा

    पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, आज पुण्यासह १८ जिल्ह्यांना IMDकडून इशारा हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

  • 26 Jul 2022 08:00 PM (IST)

    उद्या दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर; नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात पवार-गडकरी येणार एकाच व्यासपीठावर

    उद्या दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर

    नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात पवार गडकरी येणार एकाच व्यासपीठावर

    अण्णासाहेब शिंदे फाउंडेशनचा कार्यक्रम

    शरद पवार आणि नितीन गडकरी या दोघांच्या उपस्थितीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये उद्या संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम

  • 26 Jul 2022 07:53 PM (IST)

    अभिनेता रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी; पुणे पोलिसांना निवेदन

    - अभिनेता रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी,

    - मनसेच्या शारीरिक सेनेकडून पुणे पोलिसांना निवेदन,

    - रणवीर सिंगने सोशल मीडियाला न्यूड फोटो देऊन हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा मनसेचा आरोप

    - मनसेचे शारीरिक सेना पुणे शहर अध्यक्ष निलेश काळे यांची निवेदनाद्वारे मागणी

  • 26 Jul 2022 07:38 PM (IST)

    स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.

    सध्या शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात विभागली गेली आहे.

    अशातच स्मिता ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

  • 26 Jul 2022 07:36 PM (IST)

    कोल्हापूरातील भुईबावडा घाटातील धबधब्यातून तरुण गेला वाहून; सांगलीतील युवकाचा दुर्देवी मृत्यू

    भुईबावडा घाटात धबधब्याच्या प्रवाहासोबत तरुण वाहून गेला

    वाहून गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    रोहन चव्हाण अस वाहून गेलेल्या तरुणाचे नाव

    सांगली येथील रोहन चव्हाण मित्रांसोबत वर्षा पर्यटनासाठी आल्याची प्राथमिक माहिती

    वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल

    दरीत पडलेला मृतदेह वैभववाडी पोलिसांनी बाहेर काढला

  • 26 Jul 2022 07:00 PM (IST)

    उभा गाडीन अन स्वतः जोडे मारीन;आमदार दादाराव केचे यांची सिचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला तंबी

    - उभा गाडीन अन स्वतः जोडे मारीन

    - आमदार दादाराव केचे यांची सिचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला तंबी

    - अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान घटना

    - कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये

    - आर्वी विधानसभा मतदार संघांचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी कारंजा तालुक्यात पाहणी दौरा केला.

    - आमदारांच्या पाहणी दौरा दरम्यान काही शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता हे शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरीच्या नुकसानिबाबत अहवाल बनविताना भेदभाव करत असल्याचा आरोप केलाय.

    - यावर आमदार दादाराव केचे चांगलेच संतप्त झाले.

    - आमदार केचे यांनी कनिष्ठ अभियंत्याला बोलवत तुम्ही शेतकऱ्यांच्या विहिरी गायब केल्याय, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय करता आताही करणार काय अन्याय, आता करणार तर उभा गाडीन आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला तर स्वतः जोड्याने मारीन हे लक्षात ठेवा अशी तंबीच दिलीय.

  • 26 Jul 2022 06:42 PM (IST)

    नाशिकच्या घटनेचा यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध; नाशिकमधील प्रकार अतिशय धक्कादायक

    अमरावती:नाशिकमध्ये मासिक पाळी सुरु असलेल्या विद्यार्थिनीला शाळेत वृक्षारोपण करू नको, असं एका शिक्षकाने म्हटल्याने यावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

    माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी संतप्त होत या घटनेचा निषेध व्यक्त केला

    नाशिकमधील प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले

  • 26 Jul 2022 06:27 PM (IST)

    शिवसेनेचे चिन्ह, नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा डाव; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

    शिवसेनेचे चिन्ह, नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा डाव

    माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

    शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यास आश्चर्य वाटायला नको

    कॉग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, सेनेचे उरलेले आमदार फोडण्याचाही डाव आहे

    त्यासाठी साम, दाम, दंड याचा वापर केला जात आहे

    सावध रहा अस पक्षश्रेष्ठीना कळवलं

  • 26 Jul 2022 06:22 PM (IST)

    दिल्ली येथे छत्रपती गडकोटांसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक; संभाजीराजे यांनी मांडले महत्वाचे मुद्दे

    दिल्ली येथे छत्रपती गडकोटांसंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक

    यावेळी राज्यातील गडकोटांची होत असलेली दुरावस्था व काही अनुचित प्रकार याबाबतचे मुद्दे संभाजीराजे यांनी मांडले.

    केंद्रीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका विद्यावती जी यांची छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयात भेट घेऊन रायगड विकास प्राधिकरणाशी निगडीत दुर्गराज रायगड वरील उत्खनन, गडावरील लाईट व्यवस्था, अद्ययावत रोपवे साठीची आवश्यक तरतूद आदी विषयांवर सविस्तर चर्चा केली.

  • 26 Jul 2022 06:15 PM (IST)

    मुख्यमंत्री आज पोलीस वसाहतीची करणार पाहणी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी 7 वाजता मुंबई बोरीवली पश्चिम येथील पोलिस वसाहतीची पाहणी करणार

    नाटकवाला लेन, तहसीलदार ॲाफिस जवळ, पोलिस वसाहत, बोरिवली पश्चिम. सहयाद्री वरून थेट बोरीवलीला जाणार

  • 26 Jul 2022 06:08 PM (IST)

    आम्ही गद्दार नाही आम्हाला तुझा स्वभाव आवडला नाही; एकनाथ शिंदेंच खरंच अभिनंदन केलं पाहिजे; नारायण राणेंकडून शिंदेंचे कौतूक

    तुझं नातं आहे पण जोपासता आलं नाही

    पुञप्रेम म्हणून तुला ठेवलं

    आम्ही गद्दार नाही आम्हाला तुझा स्वभाव आवडला नाही

    चांगलं करत नाही

    रश्मी वहिणींच्या पण हातचं खाललंय

    आदित्य फार बछडा आहेस रे आमच्या हातापर्यंत येऊ नको

    तुमच्या सुडबुद्धीचे अनेक निर्णय मी पचवले

    भीती हा शब्द माझ्या राशीत नाही

    एकनाथ शिंदे भाजपसोबत आले

    महाराष्ट्राच्या जनतेसाठी करतोय

    काय हो आश्चर्य आहे एकनाथ शिंदेंच खरंच अभिनंदन केलं पाहिजे

    मराठी माणूस हा शब्द तुम्हाला शोभत नाही

  • 26 Jul 2022 06:05 PM (IST)

    शिवसेना आम्ही आणून दिली आहे म्हणून तू अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून बसला; नारायण राणेंनी सगळी वंशावळच काढली

    काहीही न करणारी व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे

    साहेबांचा मला.फोन आला माझा एक सेवक आहे, मी जय महाराष्ट्र केला

    सगळ्यांची चौकशी केली निलेश, नितेश काय करतो

    मी तर काय परत येणार नाही

    मला उद्धवबद्दल सांगितलं

    मी कमेटमेंट दिली मी त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही

    सुपारी दिल्या

    मलाही फोन आले

    शिवसेना आम्ही आणून दिली आहे म्हणून तू अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून बसला

    साहेबांचा नाव घ्यायचा आमचा अधिकार आहे

    दोनदा घरातून पळून गेला तुला मी परत आणलं

  • 26 Jul 2022 05:56 PM (IST)

    उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील मराठी माणसांचा विश्वासघात केला; दिशा सालियन, सुशांत सिंग सगळं बाहेर येणार

    आता काही लपणार नाही सगळं बाहेर येणार

    दिशा सालियन, सुशांत सिंग सगळं बाहेर येणार

    आम्ही शांत बसणार नाही

    कळेल आता संरक्षण गेल्यावर

    उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील मराठी माणसांचा विश्वासघात केला

    नारायण राणेंची टीका

  • 26 Jul 2022 05:54 PM (IST)

    बाळासाहेब ठाकरे आमचे देव आहेत श्रद्धास्थान; गद्दार हा शब्द म्हणण्यासाठी नसतो; नारायण राणेंची जोरदार टीका

    18 आले मोदींची कृपा

    आता 5 आकडा दिसणार नाही शिवसेनेत

    सभ्यता हे आहे ना ती घेऊन बसा

    हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिलेले हे जे लोक आहेत त्यांना ती

    शिवसेना आणि ठाकरे वेगळी करण्याचा प्रयत्न आहे सांभाळा ना

    ती जोपासा नात्याचा अर्थ कळतो का ?

    गद्दार म्हणण्यासाठी नसतो

    साहेब प्रेम द्यायचे

    एकनाथ शिंदेवर हात टाका आहे का हिम्मत

    बाळासाहेब ठाकरे आमचे देव आहेत श्रद्धास्थान आहे

  • 26 Jul 2022 05:50 PM (IST)

    शिवसेनेत चारच आमदार राहणार; नावं नंतर सांगतो; नारायण राणेंनी बंडखोरी नाट्य केलं उघड

    काय कळतं याला सगळ्या खात्याचे निर्णय हाच घेत होता ही मुलाखत ही बोगस आहे

    हा सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे अडीच वर्षात उद्धव ठाकरेंचे कर्तुत्व शुन्य

    48 वर्ष साहेबांनी वाढवत सत्तेपर्यंत घेऊन गेले ती शिवसेना मातोश्रीपर्यंत आणली

    एक डझन आमदार ते चारचं राहणार आहेत

    त्यांची नावं आताचं सांगत नाही सहा महिने थांबायचे

  • 26 Jul 2022 05:44 PM (IST)

    संजय राऊत नीच माणूस; हा जोकर आहे हा पत्रकार नाही; राऊतांवर राणेंचा जोरदार हल्लाबोल

    कालच्या मुलाखतीत महाराष्ट्र हित कुठे आहे जनतेच हित कशात आहे

    आता शाखे शाखेत जाताय

    आता मुलाखती घ्याव्या लागतात

    संजय राऊत नीच माणूस आता त्याला भडकावण्याचं काम करतोय

    हा जोकर आहे हा पत्रकार नाही

    हे नाटकासारखंच आहे हे लिहून देतो

  • 26 Jul 2022 05:42 PM (IST)

    ही शिवसेना आता उभा राहणार नाही; हिंदुत्व सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात; नारायण राणेंचे टीकास्त्र

    ही शिवसेना आता उभा राहणार नाही

    साहेबांनी दिलेला विश्वास माणसांच्या रक्तात होता

    हिंदुत्व सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात

  • 26 Jul 2022 05:40 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या नावातील बाळासाहेब ठाकरे नावं काढलं सगळं शुन्य; शिवसैनिकांच्या नावावर खोके जमा केले; नारायण राणेंचे गंभीर आरोप

    बाळासाहेब ठाकरे नावं काढलं तर मोठा शुन्य उद्धव ठाकरे

    काय बोलतो साहेबांबद्दल

    ते आमचे दैवत होते साहेब बोलायचे जाऊ नका पण आम्ही गेलो

    दंगली झाल्या तेव्हा शिवसैनिक मरत होते तेव्हा तुम्ही गेला सामोरे

    शिवसैनिकाच्या नावावर खोके जमा केले ?.

    एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि चालवतं कोण आदित्य ठाकरे, रश्मी वहिनी

    खोके यांनी जमा करायचे

    उद्धव ठाकरे हा खोटारडा माणूस आहे ही सगळी खेळी राजकीय स्वार्थासाठी आहे

  • 26 Jul 2022 05:32 PM (IST)

    एकनाथ शिंदेना मारायला सुपारी दिली होती; नारायण राणेंची टीका; मी सेना सोडली त्यानंतर कुणाला सुपाऱ्या दिल्या ?

    एकनाथ शिंदेना मारायला सुपारी दिली होती, हे मी वाचलं, हे नवीन नाही

    रमेश केणी, जयेंद्र जाधव, ठाणे नगरसेवक यांच्या हत्या कुणी केली

    मी सेना सोडली त्यानंतर कुणाला सुपाऱ्या दिल्या ?

  • 26 Jul 2022 05:28 PM (IST)

    उद्धव यांना जवळून ओळखतो, त्यांच्या अंगात कपटीपणा आहे; नारायण राणे यांची टीका

    उद्धव यांना जवळून ओळखतो, त्यांच्या अंगात कपटीपणा आहे

    अडीच वर्षात शिवसैनिक आणि मराठी माणसाच्या हिताची काम केली नाहीत मी शुद्धीवर नव्हतो आणि गद्दारांनी सत्ता पाडली म्हणतात, पण उद्धव यांनी पक्षपात केला म्हणून त्यांनी दुसरा गट करून सरकारकडे गेले ही मुलाखत संजय राऊत यांना घ्यायला लावली संजय राऊत मनातून खुश आहेत, त्यांचे गुरूपवार साहेबांनी दिलेलं काम फत्ते झालं

  • 26 Jul 2022 05:25 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीला उत्तर म्हणा किंवा संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत आधीच उत्तर माहिती होती

    उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीला उत्तर म्हणा किंवा संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत आधीच उत्तर माहिती होती

    नारायण राणेंची टीका

    उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी मराठी माणूस, हिंदुत्व शिवसैनिक यांची आठवण येती

    अडीच वर्षे त्यांना काही आठवलं नाही

    आता ते पत्रकार परिषदेत सविस्तर मनोगत व्यक्त केलं

    सत्ता गेल्यानंतर जळफटणं किवा तडफडणं म्हणतात

    एक केविलवाणा प्रयत्न म्हणून व्यथा मांडली

  • 26 Jul 2022 05:12 PM (IST)

    पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात डीएसकेंना जामीन

    -शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात डीएसकेंना जामीन

    -शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एमपीआयडीचा गुन्हा झाला होता दाखल

    सुप्रीम कोर्टानं जामीन केला मंजूर

    आणखी चार ठिकाणच्या गुन्ह्यात जामीन मिळणं बाकी

    या जामीनाच्या आधारावर इतरही गुन्ह्यात डीएसकेंना जामीन मिळणार ?

    ग्राहकांचे पैसे देऊन फ्लँट न दिल्यानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा झाला होता दाखल

    मुंबई , सांगली ,कोल्हापूर आणि पुण्यातील आणखी एका प्रकरणात जामीन मिळणं बाकी

  • 26 Jul 2022 05:10 PM (IST)

    शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरता येणार; कायदेतज्ज्ञ असिम सरोदे

    - शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरता येणार

    - बाळासाहेब ठाकरे हे एकाच कुटूंबाची संपत्ती नाही,

    - असा कुठलाही कायदा नाहीय ज्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरण्यास बंदी घालता येणार,

    - बाळासाहेब ठाकरे हे सामाजिक आणि राजकीय व्यक्तिमत्त्व आहे.

  • 26 Jul 2022 05:04 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलांना उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलांना

    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी मुलांना उद्धव ठाकरे गटाकडून चित्रकला स्पर्धा घेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

    शिवसेनेत गटबाजी निर्माण झाल्यामुळे ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम झाले कमी

  • 26 Jul 2022 04:48 PM (IST)

    सोनिया गांधींना भाजपकडून विनाकारण त्रास; नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन

    राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरावर ईडीची कारवाई करण्यासाठी त्यांना वारंवार विनाकारण ईडी कार्यालयात बोलावून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न

    जो भाजप सरकारकडून जे कारस्थान केले जात आहे त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे निषेध आंदोलन

  • 26 Jul 2022 04:43 PM (IST)

    ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेल्या राख्या बाजार पेठेत दाखल

    ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेल्या राख्या बाजार पेठेत दाखल

    महिलांचा राख्यां घेण्याकडे मोठा कौल

  • 26 Jul 2022 04:29 PM (IST)

    मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मनाई करण्याच्या घटनेच्या चौकशीचे महिला आयोगाकडून आदेश

    मासिक पाळीमुळे वृक्षारोपणास मनाई करण्याच्या घटनेच्या चौकशीचे महिला आयोगाकडून आदेश

    - ही बाब अतिशय निंदनीय असून महराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल

    - मनाई करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आदेश

    - तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देश

  • 26 Jul 2022 04:13 PM (IST)

    खड्ड्यांमुळे बेजार झालेल्या संतप्त नगरसेवकाने उशी घेऊन भर रस्त्यावर काढली झोप; परभणीच्या उघडा महादेव परिसरातील घटना

    खड्ड्यांमुळे बेजार झालेल्या संतप्त नगरसेवकाने उशी घेऊन भर रस्त्यावर काढली झोप ,

    परभणीच्या उघडा महादेव परिसरातील घटना ,

    विशाल बुधवंत असं खड्ड्यात झोपलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकाचे नाव

    अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी दमछाक

    अनोखा आंदोलन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी .

  • 26 Jul 2022 04:11 PM (IST)

    शेती व्यवसायिकाची फसवणूक; 4 कोटींचं कर्ज देतो म्हणून 40 लाखांचा लावला चुना

    4 कोटींचं कर्ज देतो म्हणून 40 लाखांचा लावला चुना

    खोटी नावे सांगून शेती व्यवसायिकाची केली फसवणूक

    फुकटात मिळालेल्या पैशावर सांगलीत करत होते मौजमजा

    कोळसेवाडी पोलिसांनी सांगलीतून दोन आरोपींना बेड्या ठोकत 10 लाख केले हस्तगत

    इतर फरार आरोपीचा शोध केला सुरू

  • 26 Jul 2022 04:10 PM (IST)

    अमरावतीत बसस्थानकासमोर भर दिवसा 32 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या

    अमरावतीच्या बडनेरा बसस्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यावर भर दिवस  32 वर्षे युवकाची धारदार शस्त्राने हत्या..

    भाईगिरीच्या वर्चस्वातून हत्या झाल्याची घटना

    बडनेरा पोलीस घटनास्थळी दाखल, दोन आरोपी ताब्यात

    अंकुश मेश्राम वय 32 असे हत्या झालेल्या तरुणांचे नाव..

  • 26 Jul 2022 03:55 PM (IST)

    ओबीसी आरक्षणानंतर आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम

    ओबीसी आरक्षणानंतर आता मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक

    मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचा अल्टीमेटम

    मराठा आरक्षणाशिवाय निवडणुकांचा प्रयत्न झाल्यास हाणून पाडू

    मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांचा सरकारला इशारा

    मराठा आरक्षणासाठी लवकरच मोठा उठाव करणार

  • 26 Jul 2022 03:55 PM (IST)

    आपल्या विविध प्रलंबित शैक्षणिक मागण्यांसाठी परभणीत विद्यार्थी आक्रमक; भर पावसात कुलगुरूंच्या कार्यालयावर मोर्चा,

    -आपल्या विविध प्रलंबित शैक्षणिक मागण्यांसाठी परभणीत विद्यार्थी आक्रमक

    -भर पावसात कुलगुरूंच्या कार्यालयावर काढला मोर्चा,

    -शैक्षणिक दर्जा सुधारणा करावी, यासह विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा,

    -वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील प्रकार

  • 26 Jul 2022 03:53 PM (IST)

    नाशिक महापालिकेसमोर मनसेच्यावतीने आंदोलन; शहरातील खड्डे, तसेच डेंग्यू, मलेरियाचा वाढला प्रादूर्भाव

    -नाशिक महापालिकेसमोर मनसेच्यावतीने आंदोलन

    -शहरातील खड्डे, तसेच डेंग्यू, मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव या संदर्भात आंदोलन

    -महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम यांना निवेदन देण्यात आले

    -यावेळी मनसे कार्यकर्त्यांना गेटवर अडविण्यात आल्याने कार्यकर्ते आक्रमक

    -शहरातील खड्डे बुजविण्यासाठी उपाययोजना करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

  • 26 Jul 2022 03:49 PM (IST)

    राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन,

    राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या गलथान कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन,

    - पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

    - शहराध्यक्ष प्रशांत सुदामराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

  • 26 Jul 2022 03:42 PM (IST)

    रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारीत प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत आणावाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाबाबतचा सुधारीत प्रस्ताव प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत आणावाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार

    यासाठीचा सुधारीत प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत आणावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

  • 26 Jul 2022 03:39 PM (IST)

    एमपीएससी मुख्य परीक्षेतील बदलां संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी धनंजय मुंडे

    एमपीएससी मुख्य परीक्षेतील बदलां संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी धनंजय मुंडे

    परीक्षार्थींचे आंदोलन देशाच्या घटनेने दिलेला अधिकार व आयुध, त्यांचे म्हणणे सरकारने ऐकून घ्यावेः धनंजय मुंडेंचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

    लोकसेवा आयोगाच्या दडपशाही धोरणात राज्य सरकारने मध्यस्ती करून मार्ग काढवा

    राज्य सेवा मुख्य परीक्षा (MPSC Mains) मध्ये चंद्रकांत दळवी समितीने केलेल्या शिफारशीनुसार जे बदल केले

    त्यावरून मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असताना त्यांना पोलिसांकरवी नोटिसा देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडण्यात आले

    या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे पाठीशी

  • 26 Jul 2022 03:36 PM (IST)

    सांगलीतील कृष्णा नदीत सातत्याने होणाऱ्या मासे मृत्यूप्रकरणी आता थेट हरित लवादात याचिका

    सांगलीतील कृष्णा नदीत सातत्याने होणाऱ्या मासे मृत्यूप्रकरणी आता थेट हरित लवादात याचिका

    राज्य शासनासह विविध विभाग प्रतिवादी

  • 26 Jul 2022 03:25 PM (IST)

    आदिवासी महिलेवर मंत्रोच्चारात अभिषेक म्हणजे आदिवासी समाजाचे हिंदूकरण करण्याचे भाजपाचे हे षडयंत्र आहे.?

    आदिवासी महिलेवर मंत्रोच्चारात अभिषेक म्हणजे आदिवासी समाजाचे हिंदूकरण करण्याचे भाजपाचे हे षडयंत्र आहे.?

    -राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर मंत्रोच्चारात अभिषेक केल्याने आदिवासी समाजात नाराजी

    -राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजप संपूर्ण आदिवासी समाजाला आपल्या कवेत घेऊ पाहत आहे. त्यांचा आदिवासींना मानसिक गुलाम करण्याचा प्रयत्न आहे

    -आदिवासी भाषा संशोधन केंद्राच्या संचालिका उषाकिरण आत्राम यांची खोचक टीका

  • 26 Jul 2022 03:19 PM (IST)

    मासिक पाळी आल्याने विद्यार्थिनिला वृक्षरोपण कार्यक्रमात घेऊ दिला नाही भाग; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक घटना

    नाशिकच्या त्र्यंबक देवागाव आश्रम शाळेतील धक्कादायक घटना

    मासिक पाळी आल्याने विद्यार्थिनिला वृक्षरोपण कार्यक्रमात घेऊ दिला नाही भाग

    मासिक पाळी असलेल्या मुलीने झाड लावले तर ते झाड जळते शिक्षकाचा अजब तर्क

    पीडित मुलीची आदिवासी विकास विभागाकडे तक्रार

  • 26 Jul 2022 03:16 PM (IST)

    चंद्रकांत रघुवंशी यांचा शिंदे गटात प्रवेशः नंदुरबारमध्ये नवीन शिवसेना जिल्हा प्रमुखांची झाली घोषणा

    नंदुरबारः माजी चंद्रकांत रघुवंशी यांचा शिंदे गटात प्रवेश तर माजी जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर नवीन शिवसेना जिल्हा प्रमुखांची घोषणा.

    नंदुरबार, नवापूर आणि अक्कलकुवासाठी जिल्हा प्रमुख म्हणून आमदार आमश्या पाडवी

    धडगाव शहादा तळोदासाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके यांची निवड

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली घोषणा

    दोघेही जिल्हाप्रमुखांची आक्रमक राजकीय नेते म्हणून ओळख

  • 26 Jul 2022 03:10 PM (IST)

    दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि खासदारांना ताब्यात घेतले

    दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि खासदारांना ताब्यात घेतले

    त्यानंतर किंग्सवे कॅंप स्थित पोलीस लाइनला आणले.

  • 26 Jul 2022 03:08 PM (IST)

    सचिन तेंडुलकर व विनोद कांबळीसारखी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची जोड़ी: आमदार आशिष जयस्वाल

    मुख्यमंत्री 20 तास काम करत आहेत

    सचिन तेंडूलकर व विनोद कांबळीसारखी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची जोड़ी

    ते चांगले निर्णय घेत आहेत

    बिनबुडाचे आरोप, गद्दारी नाही

    राष्टवादीच्या नेत्यानी जे केलीय ती गद्दारी नाही का?

    कितीही खोटे फसवाले तरी जनता बरोबर आहे

    भाजपा शिंदे गट एकत्र झाले हे लोकाना आवडले आहे.

    मंत्री मंडळाबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील.

  • 26 Jul 2022 02:52 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षा चालकांचा रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा

    मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षा चालकांचा रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा

    ऑटो रिक्षा-टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रलंबित न्याय मागण्या

    या मागण्या सोडविण्यासाठी सोमवार दि.1 ऑगस्ट रोजी रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा

  • 26 Jul 2022 02:43 PM (IST)

    अमरावतीचा मेगा टेक्स्टाईल पार्क औरंगाबादला पळवण्याचे भाजपा-शिंदे सरकारचे कारस्थान

    अमरावतीचा मेगा टेक्स्टाईल पार्क औरंगाबादला पळवण्याचे भाजपा-शिंदे सरकारचे कारस्थान.

    काँग्रेसचे माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख यांचा गंभीर आरोप

    सरकार बदलताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊन वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेतली आणि हा प्रकल्प अमरावतीवरून औरंगाबादला नेण्याचा आग्रह

    पश्चिम विदर्भात तीन लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प होता

    हा प्रकल्प अमरावतीला व्हावा म्हणून फडणवीस यांनी पत्र दिले होते आता का त्यांची भूमिका बदलली

  • 26 Jul 2022 02:36 PM (IST)

    देशभरात ईडीच्या विरोधात कॉंग्रेसचं आंदोलन, नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात

    देशभरात ईडीच्या विरोधात कॉंग्रेसचं आंदोलन,

    नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात

  • 26 Jul 2022 02:25 PM (IST)

    अमरावतीचा मेगा टेक्स्टाईल पार्क औरंगाबादला पळवण्याचे भाजपा-शिंदे सरकारचे कारस्थान

    अमरावतीचा मेगा टेक्स्टाईल पार्क औरंगाबादला पळवण्याचे भाजपा-शिंदे सरकारचे कारस्थान...

    काँग्रेसचे माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख यांचा गंभीर आरोप..

    सरकार बदलताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊन वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेतली आणि हा प्रकल्प अमरावती वरून औरंगाबादला नेण्याचा आग्रह धरला.....

    पश्चिम विदर्भात तीन लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प होता....

    हा प्रकल्प अमरावतीला व्हावा म्हणून फडणवीस यांनी पत्र दिले होते आता का त्यांची भूमिका बदलली...

    पीएम मित्रा योजने अंतर्गत नांदगाव पेठ एमआयडीसी मध्ये टेक्स्टाईल पार्क प्रस्तावित करण्यात आला होता...

    4445 कोटी रुपयांच्या यव प्रकल्पामूळे पश्चिम विदर्भात कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या अर्थकारणाची दिशा बदलणवारा हा प्रकल्प आहे..

  • 26 Jul 2022 02:02 PM (IST)

    राज ठाकरे आपली भूमिका ठामपणे मांडतात, लोकांना त्यांची स्पष्ट भूमिका आवडत असते - बाळा नांदगावकर

    - राज ठाकरे आपली भूमिका ठामपणे मांडतात..

    - लोकांना त्यांची स्पष्ट भूमिका आवडत असते..

    - प्रत्येकाला आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे.पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे..

    - राज ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत...

    - बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन राज ठाकरे साहेब पुढे चालले आहेत..

    - आताचे सरकार हे बाळासाहेबांच्या विचाराचे आहे बघू पुढे ते कसे नेतात.

    - बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना जन्म दिला पण त्यांनी आम्हाला मोठे केले आमचा निश्चितपणे त्यांच्यापेक्षा अधिक अधिकार आहे..

  • 26 Jul 2022 01:00 PM (IST)

    सेंट्रल व्हिस्टामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी पुढाकार घ्यावा

    मुंबई, ता. 26 : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांची प्रेरणा भावी पिढ्यांना मिळत रहावी, यासाठी नव्याने उभारल्या जाणाऱ्या संसद भवनात ( सेंट्रल व्हिस्टा ), हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पुढाकार घेऊन महाराष्ट्राच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्याकडे ही मागणी करावी, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटी दरम्यान केली.

  • 26 Jul 2022 12:59 PM (IST)

    महागाई व जीएसटी वाढीच्या निषेधार्थ आपचे कल्याण मध्ये जनआक्रोश आंदोलन !

    महागाई व जीएसटी वाढीच्या निषेधार्थ आपचे कल्याण मध्ये जनआक्रोश आंदोलन !

    हातात अन्नधान्य, रुग्णालयीन , शालेय उपयोगी वस्तू घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी

    जीएसटी कर केंद्र सरकारने रद्द करण्यासाठी जीएसटी कार्यालयात दिले निवेदन

  • 26 Jul 2022 12:59 PM (IST)

    शिंदे गटाच्या काही विशिष्ट आमदाराला 20 कोटी रुपयांचा निधी

    शिंदे गटाच्या काही विशिष्ट आमदाराला 20 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळाल्याची माहिती

    नगर विकास खात्यातून मुक्ताईनगर चे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाही शहरातील व्यापारी संकुल व इतर विकास कामासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती

    एकप्रकारे विकास कामाच्या दृष्टिकोनातून शिंदे सरकारकडून शिंदे गटाच्या काही विशिष्ट आमदारांना हे गिफ्ट मिळाल्याची चर्चा

  • 26 Jul 2022 12:36 PM (IST)

    काल आमच्या भेटीनंतर चहा आणि नाश्ताला आमत्रंण दिलं

    काल आमच्या भेटीनंतर चहा आणि नाश्ताला आमत्रंण दिलं आमच्या कटुता निर्माण झालेली होती लोकसभेसा तुम्ही बाय देवून टाका असं दानवेना सांगितलं आमचे परिवारिक संबंध होते महाराष्ट्रात जावून मी माझी भूमिका स्पष्ट करणार कायम कुणाची दुश्ननी राहत नाही मी कालचं माझी भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रात जावून माझी भूमिका स्पष्ट करणार मी रावसाहेब दानवेंना मी बाय मागितला आहे

    माझी कौटुंबिक अडचण समजून घ्यायला हवी

    अर्जुन खोतकरांची भावनिक साद

    त्यांनी आता ठरवायचं काय करायचं ते

    ईडीच्या प्रश्नावर मान हलवतं उत्तर देणं टाळलं

    ईडीच्या कारणांमुळे तुम्ही अडचणीत आहात का ? मान हलवतं उत्तर

    अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया

  • 26 Jul 2022 12:35 PM (IST)

    महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

    - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

    - अध्यक्षपदासाठी तीन पैकी दोन अर्ज मागे!

    - काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते पाटील अर्ज मागे घेणार

    - भाजप खा. रामदास तडस यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी अविरोध निवड होण्याची शक्यता

    - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता जाणार भाजपचा नेता!

    - आतापर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार होते अध्यक्ष

    - शरद पवार अध्यक्ष असताना कुस्तीगीर परिषद झाली बरखास्त

    - पवारांच्या जागी आता भाजप खा. रामदास तडस

  • 26 Jul 2022 12:34 PM (IST)

    अभिनेता रणवीर सिंगवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

    अभिनेता रणवीर सिंगवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

    रिपोर्टर: गोविंद ठाकुर

    सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी चित्रपट अभिनेता रणवीर सिंगवर मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रणवीर सिंगविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    रणवीर सिंगविरुद्ध आयपीसी कलम 292,293,509, ते कलम 67(ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 26 Jul 2022 12:18 PM (IST)

    जालना मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ

    जालना मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ

    ती भाजपकडेच राहणार

    माझ्या जागी भाजपा दुसराही उमेदवार देऊ शकतो

    मात्र ती जागा भाजपकडेच राहणार

    रावसाहेब दानवेंच वक्तव्य

    एकीकडे दिलजमाई मात्र रावसाहेब दानवे मतदारसंघ सोडणार नाहीत !

  • 26 Jul 2022 12:18 PM (IST)

    उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे - निलम गोऱ्हे

    उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे

    उद्धव जी यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचे वय जितके होते आहे तितका म्हणजे ६२ किलोचा प्रसाद आज दाखवला

    सेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आज दगडुशेठ गणपतीला आरती केली

    देशाची सेवा करण्यासाठी उद्धव जी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी ही गणेशाला प्रार्थना

    बाळासाहेबांचे वाक्य मी ऐकल आहे की, देवाच्या देवळात येताना राजकारणाचे जोडे बाहेर काढून यायचे असतात

    त्यामुळे आम्ही कोणाच्याही विरोधात जाऊन आरती करत नाही

    राजकीय मतभेद असतील तरी सुद्धा ते देवाच्या दारात नाही

    बावनकुळे यांना जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे त्यामुळे त्यांना मातोश्रीच्या आत मध्ये काय आहे ते दिसत आहे

    ऊर्जामंत्री असल्यामुळे त्यांनी काही यंत्र बसवला असावा

    पुण्यात चिमुकलीवर अत्याचार घटना घडली त्यामुळे गृहविभागा ला पत्र द्यायचं आहे मात्र मंत्री मण्डल विस्तार n झाल्याने अडचण निर्माण होते आहे

    आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते आहे

    शिवसैनिकांच्या मनामध्ये काय आहे ते ओळखूनच उद्धव ठाकरे बोलत असतात. जे मनात आहे तेच व्यक्त करण्याची परंपरा बाळासाहेबांपासून आहे

    कुठलाही नेता ज्याच्या मनात जे असतं तेच बोलत असतो म्हणूनच तो नेता असतो हे राजकारणातील लोकांना परिपक्व बुद्धी असलीं पाहिजे

    शिवसेना हे सत्तेत असो किंवा नसो शिवसेना सगळ्यांनाच मदत करत आहे

  • 26 Jul 2022 12:17 PM (IST)

    शहराच्या मध्यवस्थित खुनाचा थरार चाकूने भोसकून तरुणाचा खून

    शहराच्या मध्यवस्थित खुनाचा थरार चाकूने भोसकून तरुणाचा खून

    पुण्याच्या मध्यवस्थित पूर्ववैमनस्यातून तरुणाचा काल मध्यरात्री चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

    नाना पेठेतील नवा वाडा येथे साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

    याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला

    अक्षय लक्ष्मण व्हलाळ (वय 28) असे खून झालेल्याचे नाव

    हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

    दरम्यान मध्यवस्थित खुनाचा थरार घडल्याने खळबळ उडाली आहे

  • 26 Jul 2022 12:03 PM (IST)

    सुरक्षा रक्षक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला हातापायी करत असल्याचं दिसतं आहे

    नो पार्किंग मध्ये गाडी लावल्याच्या वादातून हॉटेल मधील सुरक्षा रक्षकाने थेट वाहतूक पोलिसांन सोबत हातापायी केल्याचा व्हिडिओ वायरल

    नागपूरच्या सक्करदरा भागातील तिरंगा चौकात असलेल्या हॉटेल बाहेर रोड वर अवैध्य पद्धतीने दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या.

    वाहतूक पोलिसांची टॉइंग व्हण ने गाडी उचलत असताना सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला

    पोलिसा सोबत हातापायी करायला सुरुवात केली.

    तिथे उपस्थित नागरिकांनी या घटनेला कॅमेऱ्यात कैद केलं

    सुरक्षा रक्षक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला हातापायी करत असल्याचं दिसतं आहे.

  • 26 Jul 2022 12:02 PM (IST)

    अर्जुन खोतकरांची भावनिक साद

    मी रावसाहेब दानवेंना मी बाय मागितला आहे

    माझी कौटुंबिक अडचण समजून घ्यायला हवी

    अर्जुन खोतकरांची भावनिक साद

    त्यांनी आता ठरवायचं काय करायचं ते

    ईडीच्या प्रश्नावर मान हलवतं उत्तर देणं टाळलं

    ईडीच्या कारणांमुळे तुम्ही अडचणीत आहात का ? मान हलवतं उत्तर

    अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया

  • 26 Jul 2022 11:24 AM (IST)

    मुंबईच्या हार्बर लाईनव प्रवाश्यांचा खोळंबा…

    मुंबईच्या हार्बर लाईनव प्रवाश्यांचा खोळंबा…

    - सॅंडहर्स्ट रोड स्टेशनवर प्रवाश्यांची तोबा गर्दी… कुर्लासाठी ट्रेनच नाही अशी प्रवाश्याची तक्रार…

    गोरेगावसाठी असणारी ट्रेनही १ तास ऊशीराने…

    - प्रवाश्यांचा खोळंबा… अपघात झाल्याने प्रवाश्यांचे हाल

  • 26 Jul 2022 11:24 AM (IST)

    शिवसेनेचा अर्ज सुप्रीम कोर्टानं स्वीकारला

    शिवसेनेचा अर्ज सुप्रीम कोर्टानं स्वीकारला

    निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्यास स्थगिती देण्याची विनंती शिवसेनेने सुप्रीम कोर्टाकडे केली होती.

    इतर याचिकांसोबत या अर्जावरही सुनावणी होणार

    सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू असताना निवडणूक आयोगानं सुनावणी घेऊ नये असा शिवसेनेचा अर्ज दाखल करण्यात आलाय

  • 26 Jul 2022 11:17 AM (IST)

    सामना संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे फिक्सिंग मॅच

    सामना संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत म्हणजे फिक्सिंग मॅच....

    प्रश्नही संजय राऊत यांचे आणि उद्धव ठाकरेंनी उत्तर काय द्यायचं हे ही संजय राऊत यांनीच ठरवलेले

    उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांची कटपुतली...

    उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर आमदार रवी राणांची टिका...

    उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना प्राव्हेट लिमिटेड करु नये....

    शिंदे गटच खरी शिवसेना आहे.

  • 26 Jul 2022 11:16 AM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लोकलचा छोटासा अपघात, हार्बर लाइन वरील गाड्या विलंबाने

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात लोकलचा छोटासा अपघात झाला आहे.

    पनवेल लोकल फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

    यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे

    सीएसएमटी स्थानकात केवळ 2 प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे.

    त्यामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे

    हार्बर लाइन वरील गाड्या विलंबाने धावत आहेत

  • 26 Jul 2022 11:03 AM (IST)

    महापालिका परिसरात मोकाट घोड्याकडून दोन तरुण जखमी,

    महापालिका परिसरात मोकाट घोड्याकडून दोन तरुण जखमी,,, हल्ल्यानंतर महापालिका प्रशासन झाले जागे,,, महापालिकेकडून रस्त्यावरील 15 मोकाट जनावरे पकडली आणि 8 जणांना दिल्या नोटिसा.

  • 26 Jul 2022 10:50 AM (IST)

    काँग्रेस कार्यालय परिसरात जोरदार आंदोलन

    काँग्रेस कार्यालय परिसरात जोरदार आंदोलन

    काळे फुगे घेऊन कार्यकर्ते आंदोलनाच्या तयारीत

    काँग्रेस मुख्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

    काही वेळातच सोनिया गांधी ईडी कार्यालयाकडे रवाना होणार

    काँग्रेस मुख्यालय परिसरात तणावाचं वातावरण

  • 26 Jul 2022 10:50 AM (IST)

    फडणवीस यांनी विधीमंडळात पेन ड्राईव्ह बॉम्बने चव्हाण यांचा केला होता पर्दाफाश

    देवेंद्र फडणवीस,गिरीष महाजन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना खोटय़ा प्रकरणात अडकवण्याचा आरोप असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण याला राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्यातून हटवले आहे.

    त्यांच्या जागी या खटल्यात अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    प्रविण चव्हाण यांची राज्यातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून आघाडी सरकार काळात झाली होती नेमणूक .

    जळगाव मधील एका दाखल गुन्हा पुण्यात वर्ग करुन त्यामध्ये गिरीष महाजन यांना मोक्का लावण्याचा कट केल्याचा चव्हाण यांच्यावर आहे आरोप.

    फडणवीस यांनी विधीमंडळात पेन ड्राईव्ह बॉम्बने चव्हाण यांचा केला होता पर्दाफाश

  • 26 Jul 2022 10:49 AM (IST)

    नागपुरात कारगिल विजय दिवस साजरा

    नागपुरात कारगिल विजय दिवस साजरा

    माजी सैनिकांच्या संगठण कडून करण्यात आला साजरा

    अजनी चौकातील अमर जवान स्मारक इथे करण्यात आला साजरा

    मोठया प्रमाणात माजी सैनिक आणि नावरीकांची उपस्थिती

  • 26 Jul 2022 10:25 AM (IST)

    मुंबईत हार्बर लाईन विस्कळीत, सीएसएमटी स्थानकात रेल्वेचा डबा रुळावरून घसरला

    मुंबईत हार्बर लाईन विस्कळीत झाली आहे,  पनवेल लोकल पुढे जाण्याऐवजी मागे गेली आहे. रेल्वेचा डबा रुळावरून घसरल्याची माहीती…सीएसएमटी प्लॅटफार्म नंबर एकवर अपघात… रेल्वे सेवा पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू.

  • 26 Jul 2022 10:08 AM (IST)

    छत्रपतींच्या बाबतीत सुद्धा अनेकांनी विश्वास घात केला होता - संजय राऊत

    अशा प्रकारच्या मुलाखती ठाकरे यांनी अनेकदा दिल्या आहेत. मनसेवरती त्यांनी काय भाष्य केलं असं मला वाटतं नाही. मुलाखत पुर्ण ऐका आणि वाचा. कोण काय बोलतंय त्यावर आमचा प्रश्न चालत नाही. या सगळ्यावरती उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यांच्यावरती काही लोकं मतं व्यक्त करीत असतील...तुम्ही ज्या शिवसेनेच्या संदर्भात विश्वासघात केला आहे. छत्रपतींच्या बाबतीत सुद्धा अनेकांनी विश्वास घात केला. ते लोक मुघलांची काम करीत होते. बाळासाहेबांच्या चरणात आमचं स्थान आहे. आदित्य ठाकरे यांच्या विभागाने जे निर्णय घेतले होते. ते महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय होते. ते जर कोणी थांबवत असेत तर हे चुकीचं आहे. आदित्य ठाकरे यांनी आरेचं जंगल वाचवलं. सोनिया गांधी यांना वारंवार बोलवणं, हे चुकीचं आहे. त्या आता आजारी आहे. अशा अवस्थेत त्यांना बोलावणं अत्यंत चुकीचं आहेत. त्यांच्या विरोधात अशी कारवाई अत्यंत चुकीचं आहे.

  • 26 Jul 2022 09:51 AM (IST)

    हिंगणघाटच्या यशोदा नदीच्या पाणी पातळीत वाढ

    यशोदा नदीच्या पाणी पातळीत वाढ

    - नदीने ओलांडली धोक्याची पातळी

    - रात्री बरसलेल्या पावसामुळे नदी, नाल्याच्या पातळीत वाढ

    - देवळी तालुक्याच्या चणा टाकळी गावात पोहचले यशोदा नदीच्या पुराचे पाणी

    - पातळीत वाढ झाल्याने चणा टाकळी गावाला पुराचा धोका

    - नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, आणखी पातळीत वाढ झाल्यास घरात शिरणार पुराचे पाणी

    - देवळी तालुक्यातील सरूळ येथील यशोदा नदीच्या पुलावरून पाणी असल्याने वर्धा राळेगाव मार्ग बंद

    - हिंगणघाट तालुक्यातही यशोदा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने अलमडोह ते अल्लीपूर मार्ग बंद

    - सतत सुरु असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसाह नागरिक चिंतेत

  • 26 Jul 2022 09:41 AM (IST)

    शिवसेना नेते अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंच्या भेटीला

    शिवसेना नेते अर्जुन खोतकर रावसाहेब दानवेंच्या भेटीला

    रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच आज मनोमिलन होणार ?

    अर्जुन खोतकर दिल्लीतील रावसाहेब दानवेंच्या निवासस्थानी पोहोचले

  • 26 Jul 2022 09:33 AM (IST)

    चंद्रपुरात सकाळपासून मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

    चंद्रपुरात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू

    48 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत,

    चंद्रपूरच्या वर्धा नदीत विसर्ग होणाऱ्या लोअर वर्धा धरणाची 31 दारे 30 सेंटीमीटर ने आहेत उघडली,

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सात मोठे सिंचन प्रकल्प ओसंडून वहात असल्याने नदी नाल्यांची पाणी पातळी उंचावली,

    गेले दहा दिवस चंद्रपूर शहर व जिल्ह्यात पूरस्थिती असल्याने आजच्या पावसानंतर पुन्हा एकदा नदी-नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांमध्ये धास्ती,

    जिल्ह्यात आजवर वार्षिक पर्जन्य सरासरीच्या 65 टक्के एवढा पडलाय पाऊस,

    तर मागील वर्षी यातारखेपर्यंत पन्नास टक्के इतकाच नोंदविला गेला होता पाऊस,

    सातत्याने होणाऱ्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या वस्त्या व शहरांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा

  • 26 Jul 2022 09:24 AM (IST)

    योगेश खैरे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

    योगेश खैरे म्हणतात...

    - आम्ही धर्म आणि राजकारण मिसळलं ही आमची चूक होती असं विधानसभेत म्हणाले.

    - दोन चार मतांसाठी एमआयएम सपासोबत हातमिळवणी केली.

    - औरंगाबाचं नामांतर करण्यात सतत टाळाटाळ केली.

    - मस्जिदवरील भोंगे काढा सांगितलं, हनुमान चालीसा म्हटली म्हणून गुन्हे दाखल केले.

    - मा. बाळासाहेबांचा उल्लेख 'जनाब' म्हणून केला.

    - उर्दू भाषा भवनाला निधीची खैरात केली.

    - मा. बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्री पदासाठी युती केली.

    - उद्धव ठाकरे साहेब.... ही आहेत उदाहरणं 'हिंदुत्व' सोडल्याची...!!

  • 26 Jul 2022 09:07 AM (IST)

    राष्ट्रपती यांच्यावर झालेल्या अभिषेकने यांना का त्रास ? आदिवासी हे हिंदूच आहेत- आनंद दवे

    राष्ट्रपती यांच्यावर झालेल्या अभिषेकने यांना का त्रास ?आदिवासी हे हिंदूच आहेत

    राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर मंत्र उच्चारून अभिषेक केल्याने अनेक पुरोगाम्यांच्या डोळ्यात विनाकारण पाणी आले आहे,

    आदिवासी जमातीला हिंदू दाखवण्याचा हा डाव आहे असं त्यांचं म्हणणं आहे

    हा निव्वळ हिंदू विरोध आहे असं आम्ही मानतो, मुळात आदिवासी ही हिंदू धर्मातील एक जमात आहे

    त्यांच्या परंपरा, देव पूजा पद्धती या सर्व हिंदू पद्धतीनेच होत असताना* आणि मुळात मुर्मू यांना तो अभिषेक मान्य असताना इतरांना त्यात का अडचण यावी ?

    प्रत्येक देशातील राष्ट्रध्यक्ष शपथ घेताना त्या त्या धर्मातील परंपरांचा सन्मान ठेवतच असतो आणि ठेवला पाहिजे सुद्धा

  • 26 Jul 2022 09:06 AM (IST)

    शिवसेना कायम ठाकरेंचीच, जनताच निवडणुकीत पुरावे देणार- उद्धव ठाकरे

    उद्धव ठाकरे म्हणाले...

    शिवसेना कायम ठाकरेंचीच, जनताच निवडणुकीत पुरावे देणार

    बाळासाहेबांच्या नावाऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा

  • 26 Jul 2022 08:50 AM (IST)

    नागपुरात यंदाचा गणेशउत्सव निर्बंधामुक्त होणार पण...

    यंदाचा गणेशउत्सव निर्बंधामुक्त होणार

    पण नागपुरात तलावात विसर्जनावर बंदी

    उंचीची मर्यादा हटली

    महापालिका आयुक्तांचे पर्यावरण पूरक गणेश उत्सवाचे आवाहन

    गणेशभक्तांकडे मोठा उत्साह

    विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची शहरात निर्मिती केली जाणार

  • 26 Jul 2022 08:30 AM (IST)

    संजय राऊत उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहा एका क्लिकवर

    संजय राऊत उद्धव ठाकरे यांची मुलाखत पाहा एका क्लिकवर

  • 26 Jul 2022 08:25 AM (IST)

    धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरूच

    नाशिक - धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरूच

    जिल्ह्यातील धरणं फुल्ल, तर नद्यांना देखील पूर

    गोदावरी - दारणा संगमाचे विलोभनीय हवाई दृश्य TV9 च्या दर्शकांसाठी

    नायगाव दारणा सांगवी गावांच्या मध्ये तयार होतो दोन्ही नद्यांचा नेकलेस

    गोदावरी- दारणा नेकलेस चे ड्रोन च्या माध्यमातून घेतलेले हे दृश्य फक्त TV9 वर ..

  • 26 Jul 2022 08:24 AM (IST)

    सोनियांची आज दुसऱ्यांदा ईडी कडून चौकशी होणार, देशभरात आज काँग्रेस पुन्हा आंदोलन करणार

    सोनिया गांधी आज पुन्हा ईडीसमोर

    सोनियांची आज दुसऱ्यांदा इडी कडून चौकशी होणार

    सकाळी 11 वाजता सोनिया गांधी ईडी कार्यालयात जाणार

    राजधानी नवी दिल्ली सह देशभरात आज काँग्रेस पुन्हा आंदोलन करणार

    यापूर्वी राहुल गांधी यांची झाली आहे चौकशी

    नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गांधी घराण्यातील सदस्यांची ईडी कडून चौकशी

  • 26 Jul 2022 08:12 AM (IST)

    कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

    कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत उच्च न्यायालयान प्रभाग रचनेत हस्तक्षेपाला दिला नकार

    सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या आदेश देत सर्व याचिका काढल्या निकाली

    18 पैकी पाच याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

    जिल्हा परिषद पंचायत समित्या प्रभाग रचनेत भौगोलिक संलग्नता वगळून राजकीय हस्तक्षेप केल्याचा याचिकाकर्त्यांचा आहे आरोप

  • 26 Jul 2022 08:12 AM (IST)

    सर्दी ताप खोकल्याच्या आजाराने जिल्हा फणफनला

    यवतमाळ- सर्दी ताप खोकल्याच्या आजाराने जिल्हा फणफनला

    शासकीय रुग्णालयाची ओपीडी फुल डेंगू, अतिसार मलेरियाचे रुग्ण वाढले ,

    ग्रामीण भागात पूर परिस्थिती नंतर आजाराचे थैमान

    रोज 100 रुग्णांना भरती केले जात आहे

  • 26 Jul 2022 08:11 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील 148 कोटीच्या निधीला स्थगिती

    कोल्हापूर जिल्ह्यातील 148 कोटीच्या निधीला स्थगिती

    राज्य सरकारचा आदेश

    अनुसूचित जाती उपाय योजनेच्या 113 तर प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मिळालेल्या 35 कोटीच्या निधीला स्थगिती

    पर्यटन विभागाच्या निधीची माहिती तातडीने देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

    कामांचा आढावा घेऊन नव्या पालकमंत्र्यांच्या सहमतीने कामे सुरू करण्याच्या सूचना

  • 26 Jul 2022 07:34 AM (IST)

    औषधे असल्याचं भासवून चक्क गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक पुणे बेंगलोर महामार्गावर गांधीनगर जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई तब्बल 35 लाखाच्या दारूसह 45 लाखाचा मुद्देमाल जप्त चालक अटकेत गोव्यातून बीडकडे केली जात होती अवैद्य मद्य वाहतूक मग त्यासाठी लपवण्यासाठी औषधे वाहतूक केली जात असल्याचा बनाव

    औषधे असल्याचं भासवून चक्क गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक

    पुणे बेंगलोर महामार्गावर गांधीनगर जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

    तब्बल 35 लाखाच्या दारूसह 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

    चालक अटकेत

    गोव्यातून बीडकडे केली जात होती अवैद्य मद्य वाहतूक

    मग त्यासाठी लपवण्यासाठी औषधे वाहतूक केली जात असल्याचा बनाव

  • 26 Jul 2022 07:34 AM (IST)

    युवक काँग्रेसच्या तौसिफ खानविरोधात नागपूरात गुन्हा दाखल

    - युवक काँग्रेसच्या तौसिफ खानविरोधात नागपूरात गुन्हा दाखल

    - युवक काँग्रेसच्या निवडणूकीत वय कमी दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर

    - बनावट कागदपत्र वापरल्या प्रकरणी तहसील पोलिसांनी ४२० सह इतर कलमान्वे गुन्हा केला दाखल

    - याबाबत युवक काँग्रेसचे वसीम खान नईन खान यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती

    - सत्र न्यायालयाच्या आदेशानं गुन्हा दाखल

  • 26 Jul 2022 07:27 AM (IST)

    विदर्भात जुलैचा पाऊस सात वर्षांचे सर्व रेकॅार्ड तोडणार?

    - विदर्भात जुलैचा पाऊस सात वर्षांचे सर्व रेकॅार्ड तोडणार?

    - जुलैच्या तीन आठवड्यात विदर्भात सरासरीच्या ५४ टक्के जास्त पावसाची नोंद

    - बहुतांश जिल्हयात गेल्या सात वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद

    - यंदा जुलैमध्ये २०१६ नंतर सर्वांधिक पावसाची नोंद

    - जुलै महिन्यात नागपूर, गडचीरोली, वर्धा, चंद्रपूर सह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी

  • 26 Jul 2022 07:26 AM (IST)

    दारू पार्टी रंगलेल्या पन्हाळा गडावरील झुणका भाकर केंद्रावर अखेर पोलिसांकडून कारवाई

    दारू पार्टी रंगलेल्या पन्हाळा गडावरील झुणका भाकर केंद्रावर अखेर पोलिसांकडून कारवाई

    झुणका भाकर केंद्राचा मालक दिलीप अतिग्रे याच्यावर गुन्हा दाखल

    झुणका भाकर केंद्रावर झडती दरम्यान सापडल्या दारूच्या सात बाटल्या

    ओली पार्टी करणाऱ्या कुटुंबाचा ही पोलीसंकडून शोध सुरू

    पन्हाळा गडावरच्या शिवतीर्थ उद्यानाजवळ भाजी भाकरी केंद्रात ओली पार्टी सुरू असल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

    व्हिडिओ व्हायरल होताच शिवप्रेमींनी व्यक्त केला होता संताप

  • 26 Jul 2022 07:26 AM (IST)

    मुख्यमंत्र्याचे वडिल संभाजी शिंदे यांनी मेळाव्यास लावली उपस्थिती

    सातारा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाबळेश्वर तालुक्यातील कोयना,सोळशी,कांदाटी या खोऱ्यातील 105 गावातील शिवसैनिक आणि नागरिकांचा पाठिंबा...

    मुख्यमंत्र्याचे वडिल संभाजी शिंदे यांनी मेळाव्यास लावली उपस्थिती...

    शिंदे घराण्याचे नाव रखल असल्याचा भावना केल्या व्यक्त...

    मेळाव्याला मोठ्या संख्येने भागातील नागरिक उपस्थित...

  • 26 Jul 2022 07:00 AM (IST)

    - नागपूरातंही मंकीना पॅाक्स आजाराची तपासणी सुरु

    - नागपूरातंही मंकी पॅाक्स आजाराची तपासणी सुरु

    - मंकी पॅाक्स आजाराच्या तपासणीसाठी नागपूर एम्स चा पुढाकार

    - मध्य भारतातील मंकी पॅाक्सच्या नमुन्यांची नागपूरात तपासणी

    - भारतात आतापर्यंत मंकी पॅाक्स आजाराचे चार रुग्ण आढळले

    - नागपूर एम्सला तपासणीचे ॲानलाईन प्रशिक्षण देण्यात आलेय

  • 26 Jul 2022 06:41 AM (IST)

    महामेट्रोने फक्त वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा डीपीआर महापालिकेकडे सादर केला

    महामेट्रोने फक्त वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा डीपीआर महापालिकेकडे सादर केला

    पुणे शहरातील मेट्रोच्या फेज दोनमधील सात मार्गांचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजेच डीपीआर सादर होणे अपेक्षीत होते

    यामध्ये वनाज ते चांदणी चौक १.२ किलोमीटर आणि रामवाडी ते वाघोली ११.६३ किलोमीटर विस्तार केला जाणार

    या याविस्तारीकरणाचे काम २०२३-२४ मध्ये सुरू झाल्यास पुढील पाच हे काम पूर्ण होईल. या कामासाठी ३ हजार ३५७ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याने महामेट्रोने अहवालात नमूद केले

  • 26 Jul 2022 06:41 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेने ठेकेदारांवर 'वॉच' ठेवणारे मोबाईल ॲप केलं विकसित

    पुणे जिल्हा परिषदेने ठेकेदारांवर 'वॉच' ठेवणारे मोबाईल ॲप केलं विकसित

    झेडपी पुणे वर्क्स मोबाईल ॲप अस या ॲपचे नाव

    या ॲपमुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात बसून जिल्ह्याच्या विविध भागात चालू असलेल्या विकासकामांवर नजर ठेवता येणार

    झेडपी मुख्यालयातूनच एका क्लिकवर विकासकामांचा दर्जा समजू शकणार

    हे ॲप जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी जोडले जाणार

    झेडपीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंते हे कार्यालयात बसल्या बसल्या कामाचा दर्जा तपासू शकणार

    मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या साहाय्याने जिल्हा परिषदेने हे मोबाईल ॲप विकसित केल

  • 26 Jul 2022 06:40 AM (IST)

    विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी आंदोलन

    एकीकडे देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला निवडून आली तर दुसरीकडे मुंबई सारख्या शहरात आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत आहे.

  • 26 Jul 2022 06:39 AM (IST)

    पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्याने महापालिकेच्या कामाची झाली पोलखोल,

    पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडल्याने महापालिकेच्या कामाची झाली पोलखोल,

    प्रशासनाने डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी१३९ रस्त्यांपैकी ११ रस्त्यांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या

    त्यापैकी चौघांनी पुन्हा रस्ते दुरुस्ती करण्याची तयारी दर्शविली आहे, तर सात जणांनी उत्तर न दिल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार

  • 26 Jul 2022 06:39 AM (IST)

    अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन गुन्हे दाखल करा

    अवैध सावकारी रोखण्यासाठी सहकार विभागाने पोलिसांची मदत घेऊन गुन्हे दाखल करा

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे सहकार विभागाला दिले निर्देश

    अवैध सावकारीविरोधात तक्रारी करण्याच्या अनुषंगाने पीडित नागरिकांनी पुढे येण्यासाठी जनजागृतीची गरज

    व्याजाच्या पैशाच्या बदल्यात केलेली खरेदीखते रद्द करण्याचे अधिकार सहकार विभागाला

    अवैध सावकारी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत स्थायी भरारी पथकांची नेमणूक

Published On - Jul 26,2022 6:35 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.