AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News in Marathi : शरद पवार 6 एप्रिलला 2 हजार विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

| Updated on: Apr 02, 2024 | 7:10 AM
Share

Maharashtra Breaking News in Marathi : आज 1 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : शरद पवार 6 एप्रिलला 2 हजार विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन

लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. आता वंचित आघाडीने ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात विविध जातीतील लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुक असलेल्या पूर्व विदर्भातील मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. नन पाच लोकसभा मतदारसंघात ९७ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील २५ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. विदर्भात मंगळवारपासून काही ठिकाणी पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून परभणी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Apr 2024 08:04 PM (IST)

    माढा लोकसभेसाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक; बैठकीला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची हजेरी

    सोलापूर | माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (शिंदे गटाच्या ) वतीने करमाळयात माढा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीसाठी भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उपस्थित होते. यावेळी निंबाळकर यांनी भूमिका मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात राबवलेल्या विविध योजना आणि त्यांनी निर्माण केलेली निष्ठावान शिवसैनिकांची फळी यांच्या सहकार्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून एक लाख मतांनी विजयी होणार, असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार खासदारांचे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

  • 01 Apr 2024 07:41 PM (IST)

    भाजप आमदार सुभाष देशमुख यांची प्रणिती शिंदे यांच्यावर टीका

    भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी काँग्रेस आणि प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे. “आपल्या घरी कोणी (प्रणिती शिंदे) येत असेल तर सावध राहा; आत्ताची मैत्री, तुमच्या घरी जेवण, चहा हा केवळ देखावा आहे. ती खरी मैत्री नाही. विरोधक लोकांना सांगतात की, सरकार आले की संविधान बदलले जाणार. पण 90 टक्के लोकांना संविधान काय आहे हे माहिती नाही”, असं सुभाष देशमुख म्हणाले आहेत.

  • 01 Apr 2024 06:52 PM (IST)

    ‘अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब’ कार्यक्रमाचं नाव

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार 6 एप्रिलला 2 हजार विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार संवाद सोहळा होणार आहे. “अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब” असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं आहे. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने या संवादाचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 01 Apr 2024 06:14 PM (IST)

    अशोकराव चव्हाण यांची गाडी अडवल्या प्रकरणी गुन्हा

    अशोकराव चव्हाण यांची गाडी अडवल्या प्रकरणी 25 ते 30 मराठा आंदोलकावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की म्हणून गुन्हा दाखल केला गेला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्यात कलम 353, 143 नुसार गुन्हा दाखल केला गेला आहे.

  • 01 Apr 2024 05:52 PM (IST)

    डीजेबी फंड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रधान सचिवांकडून उत्तर मागवले

    आम आदमी पार्टी सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्लीच्या प्रधान सचिव (वित्त) यांना नोटीस बजावली. दिल्ली जल बोर्डाला (डीजेबी) वाटप केलेला निधी अधिकारी जारी करत नसल्याचा आरोप आप सरकारने केला.

  • 01 Apr 2024 05:37 PM (IST)

    भाजपसाठी देश प्रथम, विरोधकांसाठी कुटुंब प्रथमः मुख्यमंत्री योगी

    यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ग्रेटर नोएडाला पोहोचले आहेत. संमेलनाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे असे लोक आहेत ज्यांच्यासाठी त्यांचे कुटुंब प्रथम आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे ज्यांच्यासाठी देश प्रथम आहे.

  • 01 Apr 2024 05:25 PM (IST)

    बांगलादेशच्या पंतप्रधानांनी ‘इंडिया आऊट’ मोहिमेवर केली टीका

    मालदीवच्या धर्तीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीद्वारे चालवल्या जात असलेल्या इंडिया आऊट मोहिमेवर टीका केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  • 01 Apr 2024 05:10 PM (IST)

    जीएसटी संकलनाने विक्रम मोडले, मार्चमध्ये 11.5% वाढ

    जीएसटी महसूल दरवर्षी वाढत आहे, मार्च 2024 मध्ये, जीएसटीमध्ये 11.5 टक्के वाढीसह 1.78 लाख कोटी रुपये जमा झाले. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही वाढ देशांतर्गत व्यवहारातून जीएसटी संकलनात 17.6% च्या लक्षणीय वाढीमुळे झाली आहे.

  • 01 Apr 2024 03:57 PM (IST)

    उदय सामंत यांनी घेतली बैठक

    शिरूर लोकसभेत महायुतीत कोणतं ही नाराजीनाट्य होऊ नये, म्हणून आज तीन प्रमुख पक्षांसह घटक पक्षांची बैठक झाली. समन्वय साधण्याचाचं हा प्रयत्न होता, आता यापुढं फक्त प्रचार सुरू राहील, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

  • 01 Apr 2024 03:47 PM (IST)

    सतेज पाटील यांचे मोठे विधान

    ऑलरेडी आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतीच व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचं असा विचार आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून येईल, असे आमदार सतेज पाटील यांनी म्हटले.

  • 01 Apr 2024 03:34 PM (IST)

    महादेव जानकर भरणार परभणीतून उमेदवारी

    महादेव जानकर भरणार उमेदवारी. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, बबनराव लोणीकर उपस्थित.

  • 01 Apr 2024 03:22 PM (IST)

    भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी भरला उमेदवारी अर्ज 

    महायुतीत बंडखोरी. महायुतीत जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना उमेदवारी घोषित. मात्र आज भाजपा कडून शिंदे यांनी केले नामांकन दाखल ..

  • 01 Apr 2024 03:06 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार परभणीकडे रवाना

    हिंगोली लोकसभा भाजपा शिष्टमंडळाची नांदेड विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली नाही. नांदेड विमानतळावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेलिकॉप्टरने परभणीकडे रवाना.

  • 01 Apr 2024 02:30 PM (IST)

    शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी महायुतीच्या समन्वय बैठकीला सुरवात

    शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी महायुतीच्या समन्वय बैठकीला सुरुवात झाली आहे. चंद्रकांत पाटील, उदय सामंत, आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, अतुल बेनके, विलास लांडे उपस्थितीत आहेत. आमदार महेश लांडगे, भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल देशमुख, राम गावडे आणि आशा बुचके अनुपस्थित आहेत. चाकणच्या हॉटेल आरती एक्झिक्युटीव्हमध्ये सुरू आहे बैठक. बैठकीला शिरूर मतदारसंघातील महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित.

  • 01 Apr 2024 01:55 PM (IST)

    बुलढाणा लोकसभा भाजपामध्ये बंडखोरी

    भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख आणि माजी आमदार विजयराज शिंदे बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

  • 01 Apr 2024 01:39 PM (IST)

    शेतकऱ्यांवर सुडाचे राजकारण करू नये – सुप्रिया सुळे

    शेतकऱ्यांवर सुडाचे राजकारण करू नये त्यांची काहीच चूक नाही असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. देशाला पूर्ण वेळ कृषीमंत्री देखील नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

  • 01 Apr 2024 01:22 PM (IST)

    खंडोबाच्या जेजुरीत पाण्याचा प्रश्न गंभीर, मतदानावर बहिष्काराचा इशारा

    जेजूरी शहरात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, त्यामुळे पाणी मिळाले नाहीत लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकणार असे पत्र जेजुरीकरांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लिहीले आहे.

  • 01 Apr 2024 12:50 PM (IST)

    भाजपाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेड विमानतळावर भेट घेणार

    नांदेड- भाजपाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेड विमानतळावर भेट घेणार आहे. हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध करणार आहेत. भाजपाचा उमेदवार देण्याची मागणी करणार आहेत. भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे, किनवटचे आमदार आमदार भीमराव केराम, उमरखेडचे आमदार नामदेव ससाने भेट घेणार आहेत. हेमंत पाटलाच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध कायम आहे.

  • 01 Apr 2024 12:40 PM (IST)

    नवी दिल्ली- भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

    नवी दिल्ली- भाजप निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. काल रामलीला मैदानात झालेल्या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींवर केलेल्या आरोपाबाबत तक्रार करणार आहे. भाजपचे शिष्ट मंडळ निवडणूक आयोगात जाऊन तक्रार करणार आहे.

  • 01 Apr 2024 12:30 PM (IST)

    कोठडीत तीन पुस्तके वाचण्यासाठी केजरीवाल यांचा अर्ज

    अरविंद केजरीवाल यांची १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ED ने न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर कोर्टाने आदेश दिला आहे. केजरीवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भगवदगीता, रामायण आणि प्राईम मिनिस्टर डीसाईड ही तीन पुस्तके वाचण्यासाठी केजरीवाल यांनी अर्ज केला आहे.

  • 01 Apr 2024 12:20 PM (IST)

    सलग दुसऱ्या वर्षी रेडीरेकनर दरात वाढ नाही

    मालमत्ता खरेदी-विक्री करताना पाहिल्या जाणाऱ्या चालू बाजार मूल्यदरात (रेडीरेकनर) यंदा कोणत्याही प्रकारची वाढ न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. सलग दुसऱ्या वर्षी रेडीरेकनर दरात वाढ झालेली नाही.

  • 01 Apr 2024 12:10 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

    अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतायत ते देशासाठी चांगलं नाही, असं केजरीवाल सुनावणीपूर्वी म्हणाले.

  • 01 Apr 2024 11:56 AM (IST)

    Live Update | सरकारच्या धोरणांमुळे देशात अनेक नवी क्षेत्र उदयाला आली आहेत – मोदी

    देशात युवकांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत… सरकारच्या धोरणांमुळे देशात अनेक नवी क्षेत्र उदयाला आली आहेत… पर्यटन क्षेत्रात वाढ होत आहे… किसान क्रेडीट कार्डचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे… असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आरबीआयच्या कार्यक्रमात म्हणाले आहेत.

  • 01 Apr 2024 11:39 AM (IST)

    Live Update | एकेकाळी बुडणारी बँक व्यवस्था आता नफ्यात आली आहे – नरेंद्र मोदी

    देशाची आर्थिक प्रगती वेगाने होत आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये मोठे बदल झाले आहेत…एकेकाळी बुडणारी बँक व्यवस्था आता नफ्यात आली आहे…. आमची नीती योग्य असल्यानं निर्णय योग्य आहे… असं वक्तव्य आरबीआयच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

  • 01 Apr 2024 11:25 AM (IST)

    Live Update | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनाम्याची तयारी

    जाहीरनाम्यासाठी भाजप मुख्यालयात बैठक सुरू… केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू… स्मृती इराणी अश्विनी वैष्णव केशव प्रसाद मौर्य विनोद तावडे बैठकीला उपस्थित… लवकरच भाजपकडून देशातल्या मतदारांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार…

  • 01 Apr 2024 11:13 AM (IST)

    Live Update | महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाण्याची शक्यता

    भाजपच्या नाराजीनंतर हेमंत पाटील यांची उमेदवारी जाण्याची शक्यता… हेमंत पाटील यांच्यानंतर आता महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळते ह्या कडे सगळ्यांचे लक्ष.. भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ दुपारी दोन वाजता परभणी येथे घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

  • 01 Apr 2024 10:57 AM (IST)

    महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक

    आज विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे कार्यलयात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे.  क्रांती चौकातील अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. बैठकीला काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमूख नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  बैठकीला ऊबाटा गटाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे सह, किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडले तसेच शरद पवार गटाचे नेते पदाधिकारी या बैठकीस हजर राहणार आहेत.  महाविकास आघाडीत निवडणूक दरम्यान समन्वय राहावा यासाठी ही बैठक होत आहे.

  • 01 Apr 2024 10:45 AM (IST)

    होंडा सिटी कार आणि रिक्षाचा अपघात

    नवी मुंबईतील पाम बिच मार्गावर सकाळी पहाटे साडे पाच वाजता भीषण अपघात झाला आहे.  अपघातात रिक्षातील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.  होंडा सिटी कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झालाय. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली.  रिक्षाचालकही गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  कार चालक फरार असून पोलीस त्याचा  शोध घेत आहेत.

  • 01 Apr 2024 10:30 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दाखल झाले आहेत. RBI च्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. RBI चा 90 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

  • 01 Apr 2024 10:15 AM (IST)

    सुनेत्रा पवार यांचा पुण्यातील वारजे परिसरात दौरा

    सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील वारजे परिसरात सुनेत्रा पवार यांचा आज दौरा आहे.  आज दिवसभर सुनेत्रा पवार यांच्या मतदार संघातील लोकांसोबत भेटीगाठी सुरु आहेत.  वारजे भागातील सर्वे आजी माजी नागसेवकांच्या घरी सुनेत्रा पवार भेटी घेणार आहेत. रुपाली चाकणकर देखील दौऱ्यात सहभागी आहेत.

  • 01 Apr 2024 09:59 AM (IST)

    परभणी लोकसभा मतदारसंघात आज महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार

    परभणी लोकसभा मतदारसंघात आज महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. आज शिवाजी चौकात जाहीर सभा होणार आहे.

  • 01 Apr 2024 09:37 AM (IST)

    गुवाहाटीत मुसळधार पाऊस, विमानतळाचं छतचं कोसळलं

    गुवाहाटीत मुसळधार पावसामुळे विमानतळाचं छत कोसळलं, गोपीनाथ बोरदोलाई विमानतळाचं झालं मोठं आर्थिक नुकसान.

  • 01 Apr 2024 09:31 AM (IST)

    नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा आजपासून प्रचार

    नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारासाठी आजपासून जनआशिर्वाद यात्रा सुरू होत आहे. नाना पटोले, वडेट्टीवार, गिरीश पांडव हे या यात्रेला उपस्थित राहणार.

  • 01 Apr 2024 09:21 AM (IST)

    मुंबईत बालमृत्यूची समस्या गंभीर

    मुंबईत बालमृत्यूची समस्या गंभीर, गेल्या ५ वर्षात शून्य ते १८ वयोगटातील १५ हजार २६२ मुलांचा मृत्यू.

    राज्यामध्ये बालमृत्यूची समस्या गंभीर असताना, मुंबईत शून्य ते पाच आणि १० ते १८ वयोगटामध्ये दगावणाऱ्या मुलांची वाढती संख्याही तितकीच चिंताजनक आहे

  • 01 Apr 2024 09:07 AM (IST)

    ‘मोनो’ची प्रवासी वाहतूक क्षमता वाढणार

    वर्षानुवर्षे पांढरा हत्ती बनून राहिलेल्या ‘मोनो’ची प्रवासी वाहतूक संख्या आणखी वाढणार आहे.  एमएमआरडीए दहा मोनो ट्रेन खरेदी करत असून त्यापैकी दोन गाड्या मुंबईत नुकत्याच दाखल झाल्या आहेत.  सध्या धावत असलेल्या गाड्यांच्या तुलनेत नव्याने खरेदी केलेल्या गाड्यांची प्रवासी क्षमता दहा टक्क्यांनी अधिक आहे.  त्यामुळे चार डब्याच्या एका मोनो ट्रेनने जास्तीत जास्त ६२४ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे

  • 01 Apr 2024 08:49 AM (IST)

    Maharashtra News : नवनीत राणा यांनी काय विनंती केली?

    “मी सगळ्यांना विनंती करते मला लहान म्हणून सांभाळून घ्या. सगळ्यांनी एकत्र या कुठे चूक झाली तर तुम्ही पुढे राहा मी मागे राहील” भाजपाच्या कार्यक्रमात नवनीत राणांचा वक्तव्य. “महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक लोकांनी साथ सोडली पण आम्ही महायुती सोबत कायम होतो. सत्ता नसतानाही कायम होतो आणि सत्ता असतानाही कायम आहे आणि पुढे कायम राहील. अपक्ष असताना मी मोठ्या प्रमाणावर अमरावतीमध्ये निधी आणला. जर कमळाच्या चिन्हावर निवडून गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर अमरावतीच्या विकासासाठी निधीं देतील”

  • 01 Apr 2024 08:47 AM (IST)

    Maharashtra News : यवतमाळ वाशीममध्ये महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात

    यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांचे नाव आघाडीवर. भावना गवळी, संजय राठोड यांच्या नावावर सुरू आहे रस्सीखेच. संजय राठोड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता सूत्राची माहिती. अजूनही उमेदवार जाहीर न झाल्याने महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात.

  • 01 Apr 2024 08:26 AM (IST)

    Maharashtra News : रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून हकालपट्टी

    ओबीसी नेते रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून हकालपट्टी. वंचितकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच करण्यात आलं बडतर्फ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा घेतला होता निर्णय. ओबीसी नेते छगन भुजबळ आणि ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा पक्षाकडून करण्यात आला आरोप.

  • 01 Apr 2024 08:25 AM (IST)

    Maharashtra News : शाहू महाराज यांच्या बद्दल आमच्या मनात आदराचं स्थान, पण…

    शाहू महाराज यांच्या बद्दल आमच्या मनात आदराचं स्थान, मात्र आमच्यावर वैयक्तिक टीका झाली आणि आम्ही प्रत्युत्तर दिल तर हे आदराचं स्थान कुठे जाईल?. मंत्री हसन मुश्रीफ यांचा शाहू महाराजांच्या प्रचार यंत्रणेला इशारा वजा सवाल. आम्ही वैयक्तिक टीका करत नाही, मात्र प्रचारात त्यांच्याकडून संजय मंडलिक यांच्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. टीका करणारे व्हिडिओ त्यांच्याकडून व्हायरल केले जात आहेत.

  • 01 Apr 2024 07:55 AM (IST)

    पालघर पुलावरुन अवजड वाहतूक बंद

    पालघरमधील देहरजा नदीवरील पूल कमकुवत झाल्याने पुलावरून अवजड वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. मनोर वाडा रस्त्यावरील टेन गावच्या हद्दीत देहरजा नदी पूल आहे. पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

  • 01 Apr 2024 07:44 AM (IST)

    शरद पवार वर्धा दौऱ्यावर

    वर्धा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार येणार आहेत. शरद पवार २ एप्रिल २०२४ ला वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.

  • 01 Apr 2024 07:31 AM (IST)

    नागपुरात २५ टक्के उमेदवार कोट्यधीश

    नागपूर लोकसभा मतदारसंघातील २५ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. नागपूर मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर मतदारसंघातील ४३ टक्के उमेदवार बीपीएल गटात आहे. शपथपत्रांवरुन उमेदवारांच्या संपत्तीची माहिती मिळाली आहे.

  • 01 Apr 2024 07:19 AM (IST)

    विदर्भात प्रचारास वेग

    लोकसभा निवडणूक असलेल्या पूर्व विदर्भातील मतदारसंघात प्रचाराला वेग आला आहे. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचीरोली, भंडारा – गोंदिया मतदारसंघात प्रचार वेग आला आहे. नागपूरात भाजप उमेदवार नितीन गडकरी यांचा लोकसंवाद याचिकेवर भर दिला आहे.

Published On - Apr 01,2024 7:17 AM

Follow us
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.