Maharashtra Local Body Election Date LIVE : निवडणूक आयोगावर दबाव आहे – रोहित पवार
Election Commission PC on Maharashtra Election Date 2025 Announcement LIVE : राज्यातील प्रलंबित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणूकची तारीख घोषित केली आहे.

फलटणमधील महिला डॉक्टरचा मृत्यू प्रकरणात तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना सुरक्षा मिळावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने सोमवारपासून संप पुकारला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला 46 लाख 50 हजार रुपयांचे लाज घेताना अटक करण्यात आली आहे. प्रमोद रवींद्र चिंतामणी असं लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकाचं नाव आहे. नाशिकच्या मध्यवर्ती भागात गोळीबाराची घटना घडली आहे. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने गोळीबार केला आहे. दोन रिक्षांची देखील तोडफोड केली आहे. हातातील गावठी पिस्तुलीने गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या गंगापूर आणि सरकार वाडा पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
शरद पवार गटाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी दादा कळमकर यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी शरद पवार यांचे विश्वासू माजी आमदार दादा कळमकर यांची नियुक्ती
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी दिले नियुक्ती पत्र
राजेंद्र फाळके यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हाध्यक्ष पद होते रिक्त
निवडणुकीच्या पार्शवभूमीवर कळमकर यांची नियुक्ती
-
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात
महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात
महायुतीच धोरण आज ठरवण्यात येणार
उदय सामंत आणि सुनील तटकरे हे मेघदूत बंगल्यामध्ये दाखल
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, महायुतीच्या गोटात हालचालींना वेग
-
-
KDMC च्या शास्त्री नगर रुग्णालयात पुन्हा गोंधळ
KDMC च्या शास्त्री नगर रुग्णालयात पुन्हा गोंधळ
रुग्णालयात उपचार न मिळाल्याने नातवाईक संतप्त
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला उपचार न मिळाल्याचा नातेवाईकांचा आरोप
रुग्णालयाने परिस्थिती गंभीर असल्याने या रुग्णाला कळवा रुग्णालयात नेण्यास सांगितले
-
निवडणूक आयोगावर दबाव आहे – रोहित पवार
दुबार नोंदणी झालेल्या मतदारांचं काय करणार ? या प्रश्नाला उत्तर नाही, त्यांना डबल स्टार करु असं उत्तर आयोगाने दिलं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की डबल किंवा ३ स्टार करु … म्हणजेच निवडणूक आयोगाला हे माहिती आहे की नावं डबल आहेत. ज्यांची नावं डबल किंवा त्यापेक्षा जास्त आहे.त्यांची यादी जाहीर करणार का ? पुढच्या २-३ दिवसात यादी जाहीर करा. माझं आव्हान आहे. स्वच्छ यादी घेऊन तुम्ही स्वच्छ निवडणुका घ्यायला हव्या होत्या… पण त्यांच्यावर दबाव आहे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे.
-
आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही – अंबादास दानवे
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी, निवडणूक आयोगाने जनतेचा रेटा आणि भावनांची दखल घेतली नाही. दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाने केलेला खुलासा समर्थनीय नाही. नावे स्टार करत असतील तर तुम्हाला दुबार नावे माहीत आहेत ती गाळून टाका मग. यात मतदाराला विचारण्याची गरज नाही, जिथे मतदार राहतो तिथे त्याचे नाव असावे, आणि जिथे नाव नाही ते नाव गाळून टाकले पाहिजे असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
-
-
दुबार मतदारांच्या निर्णयावर समाधानी नाही – संजय गायकवाड
निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली, मात्र दुबार मतदारांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयावर आपण समाधानी नाही. एकट्या बुलढाण्यात हजारो मतदारांची नावे दुबार आहेत. तर राज्यातील काय लाखो मतदारांकडून निवडणूक आयोग हमीपत्र घेणार आहे का ? ही नावे डिलीट केली असती तर बरं झालं असतं. दहा दिवस निवडणुका उशिरा घेतल्या असत्या तर काय बिघडलं असतं. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.
-
सरकारचे हे अपयश आहे – खासदार निलेश लंके
निवडणूका पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजेच तरच लोकशाही जीवंत राहिल.मतदान यादीमध्ये हजारो दुबार मतदारांची नावे आहेत. मतदाना यादी आधी पारदर्शक करा आणि नंतर मतदान घ्या अशी आमची मागणी आहे. मात्र तरीसुद्धा निवडणुका निवडणूक जाहीर केली आहे. सरकारचं हे अपयश आम्ही मतदारांसमोर मांडणार, त्याचा फायदा आम्हाला होणार असे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra Election 2025: “मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना असणार”
आचार संहितेची ऑर्डर काढली आहे. मद्य आणि पैशाबाबत प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. पोलिसांना मार्गदर्शन केलं आहे. बँका आणि पतपेढ्याच्या व्यवहारावर लक्ष आहे. व्हेईल आणि ट्रान्सपोर्टवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
-
Maharashtra Local Body Election 2025: अर्ज भरताना जात प्रमाणपत्र आवश्यक असणार- निवडणुक आयोग
7 नोव्हेंबरला मतदारयाद्या जाहीर होणार आहेत. उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. अर्ज भरताना जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. 10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे.
-
Maharashtra Local Body Poll Schedule 2025: मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल नेता येणार- निवडणूक आयोग
मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल नेता येणार आहे. पण मेन आत नेता येणार नाही. कोणत्या मोबाईल केंद्रावर मोबाईल नेता येईल हे त्या ठिकाणचे अधिकारी ठरवतील अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
-
Maharashtra Election 2025: 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल
10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला निकाल जाहिर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
-
Maharashtra Local Body Election 2025: दुबार मतदारांसंदर्भात निवडणूक आयोग घेणार दक्षता
दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे राज्य निवडणूक आयोगने सांगितले.
-
दुबार मतदारांची वेगळी नोंद असणार
दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे असे राज्य निवडूक आयोगाने म्हटले आहे.
-
Maharashtra Election 2025: 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार
निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच 15 नवीन नगरपंचायती आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
-
निवडणुकांचं बिगुल वाजणार! राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. मुंबईत निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषदेला संबोधित करतील. यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांचं लक्ष्य या निवडणुकीकडे लागून आहे.
-
मणिपूरमधील चुराचंदपूरमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार
मणिपूरमधील चुराचंदपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
-
शेतकरी व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी
वाशिमच्या कारंजा बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने बाजार समितीत एकच गोंधळ उडाला.कारंजा बाजार समितीत सोयाबीनचे दर पडल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. या हाणामारीत एक शेतकरी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. कारंजा बाजार समितीत झाली होती सोयाबीनची विक्रमी आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे सोयाबीनचे दर पाडल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे.
-
एटापल्ली नगरपंचायतच्या नवीन नगराध्यक्षपदी रेखा मोहर्ले
गडचिरोलीमधील एटापल्ली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष असलेल्या काँग्रेसचे उमेदवारावर अविश्वास ठराव पारित झाला. एटापल्ली नगरपंचायतचे नवीन नगराध्यक्ष रेखा मोहर्ले बनल्या आहेत. त्या महायुतीच्या उमेदार आहेत. एटापल्ली नगरपंचायतीवर भाजप पक्षाच्या नवीन नगराध्यक्ष विराजमान झाल्या.
-
सुर्वे यांच्या विधानाने वाद पेटला
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त विधानाने मराठी जनतेच्या भावना चांगल्याच पेटल्या आहेत. मराठी आमची आई, आणि हिंदी आमची मावशी आहे; आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे, असे वक्तव्य सुर्वे यांनी केले होते. या विधानानंतर मराठी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आज मनसे आणि उभाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी DCP ऑफिसवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवत धरपकड केली आणि काहींना व्हॅनमध्ये बसवले.
-
पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद
शिरूरच्या पिंपरखेड गावात अखेर एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय..! दोन दिवसांपूर्वी इथंच 13 वर्षीय रोहन बोंबे या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. आणि आज त्याच ठिकाणी बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे. बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. बिबट्याला गोळ्या घालूनआमच्यासमोर मारा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे!ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने या भागात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणंय.
-
प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या किती?
राज्यात प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या मोठी आहे. आज पहिल्या टप्प्यात घोषणा होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींसह, एकूण ३३६ ठिकाणी निवडणुका बाकी आहेत
- महापालिका: २९
- नगरपंचायती: २४६
- जिल्हा परिषद: ४२
- पंचायत समिती: ३२
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार
निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचे नियोजन केले आहे. यातील पहिल्या टप्प्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपरिषदा/नगरपंचायती यांची आज घोषणा होण्याची शक्यात आहे. तर ४२ जिल्हा परिषद, ३२ पंचायत समिती या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच हिवाळी अधिवेशनानंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारीत तिसऱ्या टप्पा म्हणजेच २९ महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक निवडणूक प्रक्रिया २१ दिवसांत पूर्ण करण्याचे निवडणूक आयोगाचे नियोजन आहे.
-
राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा होणार?
आज दुपारी ४ वाजल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला जाईल. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात होणार आहे.
-
करमाळ्यात धनगर आरक्षणासाठी आंदोलन, आत्महत्येचा इशारा
करमाळा येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी किशोर शिंदे यांनी एका अर्धवट पुलावर चढून तीव्र आंदोलन केले. याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शिंदे यांना खाली उतरण्याची विनंती केली, परंतु त्यांनी हा इशारा धुडकावून लावला. शिंदे यांनी आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विषारी औषधाची बॉटल दाखवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून बोलावे, अन्यथा आत्महत्या करेन, अशी मागणी केली आहे. परिस्थिती गंभीर बनली असून, पोलीस प्रशासनाकडून आंदोलकाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-
इगतपुरीमध्ये ऍग्री स्टॅग काढण्याचे शिबिर
इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे केले असून काही शेतकऱ्यांना ऍग्री स्टॅग न काढल्याने नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत त्याच अनुषंगाने इगतपुरी तहसीलच्या वतीने प्रत्येक मंडळात ऍग्री स्टॅग काढण्याचे शिबिर आयोजित केले आहे.
-
नाळवंडी ते बीड रस्त्यासाठी नाळवंडी ग्रामस्थ आक्रमक, अर्धनग्न अवस्थेत मोर्चा
गेल्या अनेक वर्षांपासून नाळवंडी ते बीड या रस्त्याची झालेली दुरावस्था त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळोवेळी प्रशासनाला याबाबत निवेदन देऊनही कुठलीही दखल घेतली जात नाही त्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन करावे लागत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मतदान न करण्याची भूमिका घेतली आहे.
-
धनगर समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी युवक चढला अर्धवट पुलावर
धनगर समाजाला एस टी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी किशोर शिंदे या धनगर युवकाचे जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गावरील करमाळयातील अर्धवट पुलावर चढून आंदोलन. दहा लाख मेल झाल्यानंतर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्याने कुठल्याही प्रकारचे उत्तर न आल्याने किशोर शिंदे युवकाचे अनोखे आंदोलन.
-
भाजपने मतदार यादीत धर्म शोधायला सुरुवात केली आहे -शशिकांत शिंदे
मतदारयादीत धर्म शोधायला यांनी सुरुवात केली आहे, अशी टीका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवर केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महानगरपालिका निवडणूका येतात त्यासाठी आम्ही ५० टक्के महिलांना संधी देण्यातबाबत बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. मतदारयादी सदोष करून निवडणूक होईल असं आम्हाला वाटत होतं मात्र तसं झालं नाही. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षासाठी काम करत आहे. निवडणूक निकोप होणार नाही. बोगस नाव नोंदणी बाबत आता सत्ताधारी पक्षाकडून कबुली देण्यात आली आहे
-
खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा- माजी खासदार सुनील मेढे
केंद्रातला आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीचे सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे. पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा 32 हजार कोटींचा पॅकेज महाराष्ट्रासाठी जाहीर केलं. काँग्रेसच्या तुलनेत आतापर्यंतचा भाजपने दिलेलं महाराष्ट्राचं हे सर्वात मोठं पॅकेज आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना भाजपावर बोलण्याचा अधिकार नाही. भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार हे पूरग्रस्त भागांचा दौरा करताना गाडीवर बसून फवारे उडवतात आणि केवळ राजकीय स्टंटबाजी करण्याकरिता असे विधान करतात, असे म्हणत माजी खासदार सुनील मेढे यांनी खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
-
सुषमा अंधारेंची निवडणूक आयोगावर टीका
निवडणुकावर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, राहुल गांधी यांनी मातरदार याद्या संबंधित कसे घोळ आहे ते समोर आणले आहेत. आदित्य ठाकरेंनी देखील हे समोर आणले आहे. बुलढाणामध्ये मयत व्यक्तींनी मतदान केल. मनसे प्रमुखांनी गाडीभर पुरावे दिले. बुलढाणामधील चित्र भयंकर आहे, अचानक निवडणुका जाहीर करण म्हणजे सत्यापासून तोंड लपवणे आहे. राहुल गांधी, आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले प्रश्न यावर यांच्याकडे बाजू मांडण्यासाठी काहीही नाही, अशी टीका सुषमा आंधारे यांनी केली.
-
राज्य निवडणूक आयोगावर विरोधकांचा पलटवार-अंबादास दानवे
उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा आणि निवडणूक आयोग यांचा कुठलाही संबंध नाही. जो नियम असेल तो पाळू. मतदार यादीतील घोळ संपला पाहिजे. हे काम निवडणूक आयोगाला करावं लागेल. यादी फोडणे एवढेच काम स्थानिक स्वराज्य संस्था करेल. निवडणूक आयोग हात झटकत आहे. जर मतदार यादीत घोळ असेल तर आमच्या भूमिकेवर ठाम आहे.सर्व नेतृत्व बसून योग्य तो निर्णय घेईल असे उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
-
तटकरे डाव खेळत आहेत
रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये युती झालेली नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर आता आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यावर पलटवार केला आहे. थोरवे म्हणाले — “सुनील तटकरे हे कुटील नियतीने डाव खेळत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत प्रत्यक्षात युती केली आहे.” तसेच “जर मला राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक तरी मतदान केल्याचे दाखवले, तर मी राजीनामा देईन,” असा ठाम दावा त्यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही थोरवे यांनी मत व्यक्त करत तटकरे यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.
-
सोलापूर ग्रामीण भाजपाची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर
भाजप पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी तब्बल 5 महिन्यानंतर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली.नव्या कार्यकारिणीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांच्यासह राजन पाटील यांचा वरचष्मा पाहायला मिळाला. भाजपच्या सरचिटणीसपदी मोहोळचे विकास वाघमारे, अक्कलकोटचे प्रदीप पाटील या जुन्या कार्यकर्त्यांची फेरनिवड झाली.तर उपाध्यक्ष, इतर पदांवर जुन्या आणि नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आलीय.
-
डोंबिवलीत एका रात्रीत चार दुकाने फोडली, चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद !
डोंबिवलीतील छेडा रोड भागात एका रात्रीत चार दुकाने फोडून चोरट्यांनी थैमान घतलं. झेरॉक्स दुकानातील सीसीटीव्हीत चोरट्यांचा कारनामा स्पष्टपणे कैद झाला. पूजा साहित्य, झेरॉक्स सेंटर, किराणा दुकान आणि कॉम्प्युटर क्लासेस अशा दुकानांवर हात साफ केला. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांनी व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
-
नागपूर-अमरावती महामार्गावर मोझरी जवळ शिवशाही बसला अपघात
नागपूर-अमरावती महामार्गावर मोझरी जवळ शिवशाही बसला अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस थेट डिव्हायडरवर चढली. सुदैवाने प्रवाशांना कुठलीच दुखापत नाही. ही बस नागपूर वरून अमरावतीच्या दिशेने जात होती.
-
मविआ आणि मनसेचं शिष्टमंडळ घेणार केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट
मविआ आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे. मतदार याद्यांमधील सुधारणांबाबत ही भेट होत आहे. मनसेचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल.
-
अमरावती – शेतीच्या वादातून कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी
शेतीच्या वादातून कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी, कुटुंबातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोराडा शेतशिवारात ही घटना घडली.
मात्र या घटनेची माहिती मिळताच अंजनगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला.
-
दक्षिण सोलापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे रखड
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव. अतिवृष्टीमुळे मुस्ती, बोरामणी मंडळातील 90 टक्के द्राक्ष बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आजूबाजूच्या गावातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले मात्र मुस्ती, बोरामणी मंडळातील अद्याप पंचनामेच झाले नाहीत
-
शिक्षकाने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षांच्या क्लासमधील घटना. दोन अल्पवयीन मुलींना जादा क्लासेसच्या नावाखाली बोलावून त्यातील एका अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला. चेतन चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे
-
वनमंत्र्यांच्या बैठकीवर स्थानिकांचा बहिष्कार
नाशिक महामार्गावरील रास्तारोको तूर्तास स्थगित करण्यात आलाय. एक बिबट्या ही जेरबंद करण्यात आलाय, पण तोच नरभक्षक बिबट्या असल्याची खात्री नसल्यानं इतर बिबट्याचं काय? हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. तर आजवर पालकमंत्री अजित पवार आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी धाव न घेतल्यानं आजच्या मंत्रालयातील बैठकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातलाय. आता आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, याचा आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय सुनील थिगळे यांनी.
-
चिंचवडमध्ये भटक्या श्वानांसाठी ‘फीडिंग स्पॉट’बाबत महापालिकेची उदासीनता
सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांसाठी प्रत्येक भागांत ‘फीडिंग स्पॉट’ अर्थात खाद्य घालण्यासाठी जागा निश्चित करणे बंधनकारक केले आहे. मात्र, त्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्तरावर उदासीनता दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रस्ते, उद्याने, सोसायटीचे आवारात किंवा इतर खुल्या जागांवर भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावर बंदी करण्यात आली आहे.
-
सोलापूर ग्रामीण भाजपाची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर
भाजप पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी तब्बल 5 महिन्यानंतर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. नव्या कार्यकारिणीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांच्यासह राजन पाटील यांचा वरचष्मा पाहायला मिळाला
-
पदवीधर शिक्षक मतदार नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदत
पुणे | जिल्ह्यातील पदवीधर व मान्यता प्राप्त माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मतदान नोंदणीसाठी येत्या गुरुवारपर्यंत अर्ज दाखल करावेत असे आव्हान जिल्हाधिकाऱ्यांची त्यांच्याकडे यांनी केले आहे.
-
दक्षिण सोलापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे रखडले
दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव… अतिवृष्टीमुळे मुस्ती, बोरामणी मंडळातील 90 टक्के द्राक्ष बागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले… आजूबाजूच्या गावातील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले मात्र मुस्ती, बोरामणी मंडळातील अद्याप पंचनामेच झाले नाहीत… अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांत पाणी साचून त्याच्या मुळा खराब झाल्या, त्याबाबत शासनाने तसेच पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राने देखील सांगितले की पावसामुळे नुकसान झाले… मात्र प्रशासनाने अद्याप आमच्या द्राक्ष बागेचे पंचनामे केले नाहीत त्यामुळे आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले… प्रशासन यातून योग्य मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे…
-
कार्तिक पौर्णिमा निमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
आज पहाटे महापूजा संपन्न झाल्यानंतर पालखी मिरवणूक आणि हरिहर भेट हे धार्मिक कार्यक्रम होणार… उद्या दुपारी त्र्यंबकेश्वर रथोत्सवचे देखील आयोजन… त्र्यंबकेश्वर राजाची रथातून मिरवणूक येणार काढण्यात… रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात होत असते गर्दी… रथ कुशावर्त या ठिकाणी गेल्यानंतर विविध धार्मिक पूजा संपन्न केले जाणार… विशेष म्हणजे उद्या दुपारनंतर देणगी दर्शन आणि रात्री आठ नंतर भाविकांसाठी धर्मदर्शन राहणार बंद…
-
नाशिक शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
सिडको परिसरात धक्कादायक घटना… मोकाट कुत्र्याने घेतला पाच नागरिकांना चावा… सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीच वातावरण… मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी… मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात प्रशासन हतबल… मोकाट कुत्र्यांना पकडण्याची यंत्रणा नसल्याचे उघड…
-
जाफराबाद तालुक्यातील सिपोरा आंभोरा येथील पशुवैद्यकीय दवाखाना वर्षभरापासून बंद
जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा येथील दुसऱ्या श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना वर्षभरापासून बंद असल्यामुळे आसपासच्या 8 ते 10 गावातील पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शिवाय या ठिकाणी सरकारी डॉक्टरही नसल्याने शेतकऱ्यांवर खाजगी डॉक्टरांकडून अधिकचे पैसे देऊन जनावरांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा सरकारी दवाखाना सुरू करावा अशी मागणी होत आहे.
Published On - Nov 04,2025 8:25 AM
