Maharashtra News LIVE Updates : प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची जोरदार तयारी सुरू
Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रचार थांबला आहे. आचारसहिंता लागू झाली असून उद्या मतदान आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
मालेगावात खळबळ, MIM उमेदवार विशाल आहिरे यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक
मालेगाव: निवडणुकीच्या रणधुमाळीत मालेगावातील दरेगाव शिवारात एमआयएम (MIM) उमेदवार विशाल आहिरे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास आहिरे कामानिमित्त बाहेर जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर भीषण दगडफेक केली. या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहिरे यांनी आपली गाडी थेट पोलीस ठाण्यात नेली. हा हल्ला राजकीय विरोधकांनीच केल्याचा आरोप विशाल आहिरे यांनी केला आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सध्या या हल्लेखोरांचा शोध घेत असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
-
धाराशिव जिल्हा परिषद : ‘पीए’च्या पत्नीची निवडणूक मैदानात एन्ट्री, डॉ. सरोजनी राऊत कळंबमधून भाजपच्या तिकिटावर लढणार
धाराशिव : देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे यांचे माजी पीए संतोष राऊत यांच्या पत्नी डॉ. सरोजनी राऊत आता धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. कळंब तालुक्यातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियावरूनही प्रचाराचा धडाका लावला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्या उमेदवारीच्या शर्यतीत होत्या. आता जिल्हा परिषदेच्या निमित्ताने त्यांनी कळंबमध्ये आपली राजकीय ताकद पणाला लावली आहे.
-
-
वसईत प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर राडा; पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप-शिवसेना आणि बविआ-मनसे कार्यकर्ते भिडले
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतरही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वसई पूर्व वॉर्ड क्रमांक १९ मधील वसई फाटा, गांगडी पाडा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास भाजप-शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी-मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. पैसे वाटपाच्या कारणावरून दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. यावेळी मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबतही कार्यकर्त्यांनी हुज्जत घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदानाच्या तोंडावर झालेल्या या राड्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
-
शष्टीतिला एकादशी व संक्रांती निमित्ताने माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराला आकर्षक फुलाची सजावट
शष्टीतिला एकादशी व संक्रांती निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी अशा रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी ह्या समाधी मंदिरात सजावट करण्यात आलीय. माऊलींचा मुखवटा अत्यंत आकर्षक असा दिसत आहे. फुल आणि नवीन वस्त्र घालून मुखवट्याला सजावट करण्यात आलीय. सकाळपासूनच माऊलींचे हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अलंकापुरी नगरीत गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
-
पैशांचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना – भाजप जिंकू शकत नाही – संजय राऊत
पैशांचं वाटप केल्याशिवाय शिंदे सेना – भाजप जिंकू शकत नाही… पैसा कुठून येतोय, हे अजितदादांनीच सांगितलं आहे… एकमेकांना ब्लॅकमेल करुण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरु आहे… राजकारणात ब्लॅकमेलिंग सुरु आहे, गणेश नाईक दादांनी उघडपणे बोलावं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
-
छत्रपती संभाजीनगर मिनी मंत्रालयाची होणार आठ वर्षांनंतर निवडणूक
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपत असताना, मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने घोषणा केली आहे. घोषणा होत नसल्यामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. अखेर काल राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीची घोषणा केली आणि इच्छुकांचा जीव भांड्यात पडला. तब्बल ८ वर्षांनी या निवडणुका होत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तिकीट मिळवण्याची स्पर्धाच लागणार आहे. यापूर्वी 2017 ला जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपुष्टात आला. कोरोनाची परिस्थिती आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे जिल्हा परिषदचा निवडणुका लांबत गेल्या. यावर्षी जिल्हा परिषद निवडणूकीत एक गट आणि दोन गणांची वाढ झाली आहे. जिल्हा परिषदच्या 63 गट व पंचायत समित्यांच्या 126 गणांसाठी आता ही निवडणूक होणार आहे.
-
मालेगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. 110 पोलिस अधिकारी, तर 2000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव बलाच्या 2 तुकड्या तर 2 दंगा नियंत्रण पथकाचा देखील समावेश आहे. मतदान प्रक्रिया निर्भीड आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांकडून ऍक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. मालेगावकरांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे मालेगाव पोलिसांकडून आवाहन केले आहे.
-
-
पिंजऱ्यात बिबट्याने मारला माशावर ताव, नागरिकांनी केला बिबट्याचा पाहुणचार
शिरूर तालुक्यातील आंबळे येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद असून सदर बिबट्या अंदाजे वय 1.5 वर्षे आहे. यावेळी जेरबंद बिबट्याने पिंजऱ्यात माशावर ताव मारल्याचे पाहायला मिळाले, घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी बिबट्याचा चांगला पाहुणचार करत त्याला खाण्यासाठी मासे उपलब्ध करून दिला. या घटनेमुळे परिसरात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
गिरीश महाजन यांना जाब विचारणारे पिता पुत्र पोलिसांच्या ताब्यात
सभेतील व्हिडिओमध्ये काही तरुण आमली पदार्थ सेवन करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. महाजन यांच्या सभेत हा व्हिडिओ दाखवल्यानंतर झाला होता गोंधळ. या सभेनंतर गिरीश महाजन यांच्याशी या व्हिडिओवरून अरेरावी करत पिता पुत्राने घातला होता वाद. पोलिसांकडून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
-
नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न
प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर हल्ला. सुदैवाने शिवाजी भालेराव या हल्ल्यात जखमी झाले नाही. दोन दुचाकीवरून तोंडाला बांधून आलेल्या चार जणांकडून हल्ला झाल्याची माहिती. राजकीय हेतू हल्ला झाल्याचा काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप .
-
अमरावतीत महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाकरिता प्रशासनाची तयारी
मतदान केंद्र हिरवळीने सजवलं… निसर्गाचा संदेश देणार मतदान केंद्र, उद्या अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागेसाठी मतदान होत आहे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.अमरावती शहरातील शांतीनिकेतन इंग्लिश इंटरनॅशनल स्कूल येथे निसर्गाच्या सानिध्यात हिरवळीचा संदेश देणाऱ्या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली.
-
शहरात थंडीची विश्रांती, किमान तापमानात दुपटीने वाढ…
शहरात ढगाळ वातावरण अन हलक्या पावसामुळे गत 24 तासांपासून थंडीने विश्रांती घेतली आहे असे वातावरण पुढील दोन दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे किमान तापमान 14 ते 19 अंशावर गेले होते शहरात गत दोन महिने थंडीची लाट होती मात्र गेल्या 24 तासापासून किमान तापमानात दुपटीने वाढ झाली आहे.
-
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 30 लाख मतदार हक्क गाजवणार
पुणे जिल्हा परिषद च्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 29 लाख 76 हजार 454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
-
मतदानामुळे उद्या आरटीओ कार्यालय बंद
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आले आहे या सुट्टीमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आयडीटीआर आळंदी रोड आणि दिवे कार्यालय येथील सर्व कामकाज बंद राहणार आहे ज्या नागरिकांनी 15 जानेवारी साठी वाहन परवाना किंवा वाहन नोंदणीशी संबंधित कामांची अपार्टमेंट घेतली होती त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारांच्या तोफा शांत झाल्या असून राज्यात आचारसहिंता लागू झाली. उद्या राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल लागेल. प्रशासनाकडून जोरदार तयारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त मतदान केंद्राबाहेर राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सभांचा धडाका बघायला मिळाला होता. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या..
Published On - Jan 14,2026 8:20 AM
