AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : नगरसेवक रमेश म्हात्रे जेलमधून बाहेर आले आणि गोव्याला रवाना झाले

| Edited By: | Updated on: Aug 08, 2026 | 7:27 PM
Share

Maharashtra News LIVE : व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अटकेत असलेले भाजप नेते विजय चौधरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. प्रकृती अस्वस्थ असल्याने रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. यासह मराज्य, देश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra News LIVE :  नगरसेवक रमेश म्हात्रे जेलमधून बाहेर आले आणि गोव्याला रवाना झाले

LIVE NEWS & UPDATES

  • 08 Aug 2026 07:27 PM (IST)

    सांगलीत प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकराचे शोले स्टाईल आंदोलन

    सांगली – प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर थेट मोबाईल टॉवरवर चढला. कुपवाडच्या स्वामी मळ्यात ‘शोले’ स्टाईल ड्रामा, पोलिसांनी अखेर या तरुणाला सुखरूपणे खाली उतरवले आहे.

  • 08 Aug 2026 07:04 PM (IST)

    नगरसेवक रमेश म्हात्रे जेलमधून बाहेर आले आणि गोव्याला रवाना झाले

    डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणातील आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांची आधारवाडी कारागृहातून सुटका झाली असली त्यांना आता तडीपार करण्यात आल्याने त्यांची रवानगी गोव्याला करण्यात आली आहे. चार्जशीट दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रे आणि अन्य तीन आरोपींना गोव्यातच वास्तव्यास करावे लागणार असून महाराष्ट्रात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.

  • 08 Aug 2026 06:54 PM (IST)

    चायनिज फूडकडे लक्ष देण्यास सांगितलं जातंय- तुकाराम मुंढे

    पुण्यातल्या मुलाखतीत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. या मुलाखतीत त्याने पुढचं लक्ष चायनीज फूडकडे असल्याचं सांगितलं आहे. चायनीज फुडकडे लक्ष द्या अशी लोकांची मागणी असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.

  • 08 Aug 2026 06:46 PM (IST)

    रांची: आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी भाजप शिष्टमंडळ दाखल

    झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळ रांचीमधील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर पोहोचले.

  • 08 Aug 2026 06:38 PM (IST)

    आजपासून पुढील आदेशापर्यंत अमरनाथ यात्रा स्थगित

    खराब हवामानामुळे, अमरनाथ यात्रा आजपासून पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. आतापर्यंत 4.8 लाख भाविकांनी बाबा बर्फानी यांचे दर्शन घेतले आहे.

  • 08 Aug 2026 06:25 PM (IST)

    पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांच्यातील बैठक संपली

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील बैठक संपली आहे. मुख्यमंत्री योगी आता रेस कोर्स ७ वरून निघून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

  • 08 Aug 2026 06:21 PM (IST)

    उत्तराखंडच्या रवीने उडणारी ‘हपिडा स्कायनेक्स’ कार बनवली

    उत्तराखंडमधील अल्मोरा येथे ‘हपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवी तामता यांनी, स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या त्यांच्या उडणाऱ्या वाहनाच्या प्रोटोटाइपची यशस्वी उड्डाण चाचणी करून एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे.

  • 08 Aug 2026 06:14 PM (IST)

    बोरिवलीत मनसे कार्यकर्ते आणि बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये वाद

    बोरिवलीतील साईबाबानगरमध्ये मनसे कार्यकर्ते आणि बीएमसी कर्मचारी यांच्यात वाद रंगला. मनसेसह इतर बॅनरवरही कारवाई करा अशी मागणी मनसेने केली आहे.

  • 08 Aug 2026 06:07 PM (IST)

    खासदार सुप्रिया सुळे यांनी एफसीआरए विधेयकाला दर्शवला विरोध

    एफसीआरए विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्ही एफसीआरए विधेयकाला त्याच्या सध्याच्या स्वरूपात विरोध करतो. या विधेयकावर चर्चा करून ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले पाहिजे. संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक एसआयटी (SIT) स्थापन केली पाहिजे. जर भारत सरकारला यावर चर्चा करायची असेल, तर आम्ही एफसीआरएवर ​​चर्चा करण्यास तयार आहोत.”

  • 08 Aug 2026 04:55 PM (IST)

    दिल्लीतील CJPच्या आंदोलनातील लाठीचार्जप्रकरणी SIT स्थापन करा

    दिल्लीतील CJPच्या आंदोलनातील लाठीचार्जप्रकरणी SIT स्थापन करा… पॅलेट गनचा वापर कसा झाला याची पारदर्शक चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी.. .

  • 08 Aug 2026 04:45 PM (IST)

    नवी मुंबईच्या कोपरखैरणे स्थानकावर एका व्यक्तीकडून महिलांचा विनयभंग

    नवी मुंबईच्या कोपरखैरणे स्थानकावर एका व्यक्तीकडून महिलांचा विनयभंग. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. संबंधित व्यक्ती महिलांच्या मागे-मागे फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. संबंधिताकडून महिलांना घाबरवण्याचा प्रयत्न. महिलांना त्रास देणाऱ्या व्यक्तीवर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी

  • 08 Aug 2026 04:30 PM (IST)

    नंदुरबारमध्ये बाल लैंगिक शोषणाचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर

    नंदुरबारमध्ये बाल लैंगिक शोषणाचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय…तब्बल 56 मुलांवर 22 वर्षीय चेतन कोळीनं लैंगिक अत्याचार केलेत…शोषण करतानाचे 649 व्हिडीओ आणि 1 हजारांहून अधिक फोटो आरोपीकडे असल्याचं समोर आलंय..

  • 08 Aug 2026 04:15 PM (IST)

    मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार

    मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार आहे…मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत.. 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाची तपासणी होणार आहे

  • 08 Aug 2026 03:50 PM (IST)

    कर्जमाफी करताना नियम पाहता, लडक्या बहीणीचे पैसे देताना पाहात नाही- सुप्रिया सुळे

    कर्जमाफी करताना नियम पाहता आणि लडकी बहीणींचे पैसे देताना पाहात नाही. हे फक्त निवडणुकीपूर्त आहे. असंवेदनशीलपणा दाखवला आहे असे सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

  • 08 Aug 2026 03:40 PM (IST)

    आमच्या पक्षाचे ८ खासदार मोदी यांना भेटणार- सुप्रिया सुळे

    कालच संसदेत आम्ही चर्चा करत होतो राज्यातील परिस्थितीबाबत. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विकासाच्या चौकटीतले अनेक प्रश्न आमच्या खासदारांचे आहेत आणि या बाबत चर्चा करण्यासाठी आमच्या पक्षाचे ८ खासदार मोदी यांना भेटणार आहोत. सोमवारी सकाळी ११ वाजता ही भेट होणार आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 08 Aug 2026 03:30 PM (IST)

    हिंगोलीत महामार्ग होऊ देणार नाही; शेतकरी आक्रमक

    हिंगोलीतील महामार्गावरुन शेतकरी आक्रमक झाला आहे. रक्ताचा सडा करू पण आम्ही  शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे म्हणत शेतकरी आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्व कल्पना न देता प्रशासन सर्व्हे करत असल्याचा आरोप करत शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक झाला आहे.

  • 08 Aug 2026 03:20 PM (IST)

    नवी मुंबईतील ठाणे बेलापूर रोडवर चार चाकी गाडीला लागली आग

    नवी मुंबईतील ठाणे बेलापूर रोडवर चार चाकी गाडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पावणे फाटा येथे गाडीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाकडून आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

  • 08 Aug 2026 03:10 PM (IST)

    मराठी शिकायला आणखी १०० दिवसांचा वेळ सरकारने द्यावी- हाजी अराफत शेख

    आज गोवंडीत आम्ही एक सभा घेत आहोत, आमच्या सगळ्या संघटनेची मागणी आहे की मराठी शिकायला आणखी १०० दिवसांचा वेळ सरकारने द्यावी. १५ ऑगस्टनंतर परमिट रद्द करण्याची प्रक्रिया राबवली तर त्याला आमचा विरोध असेल आणि आम्ही रस्त्यावर ऊतरू, आंदोलन करू असे हाजी अराफत शेख यांनी म्हटले आहे.

  • 08 Aug 2026 03:00 PM (IST)

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मोर्चाला मोठी गर्दी

    रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मोर्चाचे आयोजन केले. मोर्चाला मंगळवार पेठ येथून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता होणार आहे. आनंदराज आंबेडकर समाज बांधवाना मार्गदर्शन करणार आहे.

  • 08 Aug 2026 02:50 PM (IST)

    मुंबई–गोवा महामार्गावर पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यास अदिती तटकरे यांचा विरोध

    नागोठणे परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आला होता. नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवेसारख्या अवजड वाहतुकीच्या रस्त्यांसाठी पेव्हर ब्लॉक टिकाऊ नसल्याचे तटकरे म्हणाल्या. पेव्हर ब्लॉकचा वापर अंतर्गत गावातील रस्ते, पादचारी आणि दुचाकी वाहतुकीसाठी योग्य; मात्र हेवी व्हेईकलच्या वाहतुकीसाठी अयोग्य असल्याची भूमिका मांडली. पेव्हर ब्लॉकला योग्य बेस नसल्याने अवजड वाहन गेल्यास ते निघण्याची शक्यता आहे. नागोठणे, सुकेळी परिसर आणि कोलाडजवळील खड्ड्यांसाठी पेव्हर ब्लॉकऐवजी नवीन तंत्रज्ञानातील मटेरियलचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आली. नवीन मटेरियलद्वारे केलेली खड्ड्यांची डागडुजी पेव्हर ब्लॉकपेक्षा अधिक काळ टिकण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्यात मुंबई–गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास तातडीने कमी करण्यावर भर दिला. तर खड्डे बुजवताना टिकाऊ उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना तटकरे यांनी दिल्या.

  • 08 Aug 2026 02:40 PM (IST)

    चंद्रपूर निर्मल उज्वल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा

    निर्मल उज्वल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांनी आज बँके विरोधात मोर्चा काढत चंद्रपूर पोलिसांना बँके विरोधात कारवाई साठी निवेदन दिलं. बँकेच्या संचालकांची संपत्ती जप्त करून ग्राहकांचे पैसे परत करावे अशी ठेवीदारांनी सरकारकडे मागणी केली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लावण्यात आलेले आहे. यामुळे बँकेच्या खातेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट आणि संभ्रम पसरला आहे. मध्य भारतातील अतिशय मोठी बँक असलेल्या निर्मल उज्वल को-ऑपरेटिव्ह बँकेत एकट्या चंद्रपूर शहरातल्या तीन हजार लोकांचे पैसे अडकले आहेत. ज्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या जास्ती आहे ज्यांनी आपल्या पेन्शनचे पैसे या बँकेत गुंतवले आहेत.

  • 08 Aug 2026 02:30 PM (IST)

    मराठा कुणबी जात प्रमाणपत्र व्हॅलिडीटीवर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

    मराठा कुणबीच नाही तर राज्यामध्ये जेवढे जेवढे जात प्रमाणपत्र आहेत. सर्वांनाच जात व्हॅलेडीटीची प्रक्रिया लागू आहे. एक कायदेशीर प्रक्रिया आहे. एक कॉन्स्टिट्यूशनची बॉडी आहे. ज्याच्यामधून कागदपत्रांची छाननी केली जाते. कागदपत्रांची पूर्तता असेल तर काही अडचण येतच नाही. कागदपत्र नसतील तर एखाद्या वेळेस प्रश्न निर्माण होऊ शकतात. मराठा कुणबी प्रमाणपत्र असलेल्या राजकीय पदाधिकार्‍यांच्या प्रमाणपत्राची व्हॅलेडीटी झाली नाही. मी फक्त मिरीटच बोललेला आहे, ज्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता होते, अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

  • 08 Aug 2026 02:20 PM (IST)

    SIR प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम- नागपूर काँग्रेस शहराध्यक्ष

    SIR प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे, असे नागपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल गुडघे पाटील म्हणाले.बिहारमध्ये अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. त्याचे निवडणुकीवर काय परिणाम झाले, हे आपल्या नजरेसमोर आहे. SIR प्रक्रिया नेमकी काय आहे, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कायद्यामध्ये कोणतेही प्रावधान नसताना केंद्र सरकार निवडणुकीच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबवत आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आमचा आरोप आहे. मी जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो. २०२४च्या मतदार यादीचे २००२च्या मतदार यादीशी मॅपिंग करणे आवश्यक आहे. हे मॅपिंग कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या आधारावर केले जात आहे, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

  • 08 Aug 2026 02:10 PM (IST)

    बावनकुळे हे फडणवीसांना बदनाम करत आहेत का? मनोज जरांगे

    महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत आहेत का? असा सवाल मनोज जरांगे यांनी केले आहे. शिंदे, फडणवीस मराठ्यांच्या वाईटावर का टिपले असा आरोप त्यांनी केला. सरकारने माझी चूक काय ती सांगावे. मुसलमानांच्या मागे हे सरकार लागले. मराठ्यांना फसवले, धनगरांना फसवले. दलितांमधील अनेक उपजातींना फसवले. शेतकऱ्यांना फसवले असा आरोप त्यांनी केला. आता मराठा चवताळले आहेत, असे ते म्हणाले.

  • 08 Aug 2026 02:00 PM (IST)

    आमदार श्रीजया चव्हाण यांनी रुग्णालय अधिक्षकास विचारला जाब

    नांदेडच्या अर्धापुर येथील ग्रामीण रुग्णालयातुन रुग्णांना इतर रुग्णालयात रेफर केले जात असल्यावरून भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया अशोक चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी विद्या झिने यांना फोन करून जाब विचारला होता. ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टरची नेमणूक असतांना त्यांच्या जागी त्यांचे पती रुग्णालयात येऊन बसतायेत, ओपीडी काढतात याबाबत आमदार चव्हाण यांनी सवाल उपस्थित केला होता. आमच्या रुग्णालयातून फार जास्त रेफरन्स होत नाही. पण जे एमरर्जन्सीमधील जे गंभीर रुग्ण असतात तेच रुग्ण आम्ही रेफर करीत असतो. आमच्याकडे डॉ. अन्सारी मॅडम ह्या आमच्याकडे ग्यायनाकॉलॉजिस्ट आहेत, त्या नव्यानेच आमच्याकडे रुजू झाल्या आहेत. त्यांना सहा महिन्याचे बाळ असून ते त्यांच्या शिवाय राहत नसल्याने त्या बाळाला आणि डॉ अन्सारी यांचे डॉक्टर पती यांना रुग्णालयात थांबण्यास आम्ही परवानगी दिली आहे. महिला डॉक्टर ऐवजी महिला डॉक्टराच्या पतीने उपचार केले, तो रुग्ण अल्कोलीक होता आणि स्टिच घेऊ देत नव्हता,त्यामुळे डॉ. अन्सारी यांनी त्यांच्या पतीची मदत घेतली होती. त्यांचे पती सुद्धा फिझीशीयन असून ते सुद्धा शासकीय सेवेत आहेत. संदर्भ सेवा जास्त होऊ नये यासाठी आम्ही रेफरलं ऑडिट करीत असतो. याअनुषंगाने सुद्धा मी रेफरलं ऑडिट तयार केलेलं आहे. वरिष्ठाच्या आदेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका विद्या झिने यांनी सांगितलं

  • 08 Aug 2026 02:00 PM (IST)

    शिंदे, फडणवीस आमच्या मुळावर का उठलेत? – जरांगे पाटील

    गेले 1 वर्ष आम्ही काहीही बोललो नाही…शिंदे, फडणवीस आमच्या मुळावर का उठलेत? फडणवीस मराठ्यांचं चांगलं करायला लागले, अशी आशा होती, फडणवीस बावनकुळेंच्या माध्यमातून का मुळावर उठलेत? असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.

  • 08 Aug 2026 01:57 PM (IST)

    कल्याण न्यायालयात रमेश म्हात्रे यांच्या वकिलांकडून सुट्टीच्या दिवशी सुटकेसाठी विशेष हालचाली सुरू

    रमेश म्हात्रेंची सुटका आजच की सोमवारला? जामीन मंजूर असून कागदपत्रांअभावी अद्याप जेलमध्येच आहेत. शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या चार कार्यकर्त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, मात्र जामीन आदेशाची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने काल जेल मेमोची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जामीन मंजूर होऊनही रमेश म्हात्रे यांची प्रत्यक्ष सुटका रखडली. आज सुट्टीचा दिवस असतानाही म्हात्रे यांच्या वकिलांकडून कल्याण न्यायालयात सुटकेसाठी विशेष हालचाली सुरू. न्यायालयीन प्रक्रिया आणि जेल मेमो वेळेत पूर्ण झाल्यास आजच सुटकेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास रमेश म्हात्रेंचा जेलमधील मुक्काम सोमवारपर्यंत वाढण्याची शक्यता.

  • 08 Aug 2026 01:44 PM (IST)

    1400 बँकांमध्ये 6 लाख कोटींचा निधी जमा – अमित शाह

    1400 बँकांमध्ये 6 लाख कोटींचा निधी जमा आहे. लहान बँकांमध्ये रिकव्हरी शंभर टक्के होते. डिजिटर व्यवहार अधिक सुरक्षित व्हावेत यासाठी प्रयत्न… अर्बन बँकिंग क्षेत्राला आम्ही विकसित करतोय… सायबर सुरक्षा मजबूत व्हावी यासाठी प्रयत्न करतोय.. असं देखील शाह म्हणाले आहेत.

  • 08 Aug 2026 01:40 PM (IST)

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मोर्चाला मोठी गर्दी

    अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मोर्चाला मोठी गर्दी झाली आहे रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं.  मोर्चाला मंगळवार पेठ येथून सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाची सांगता झाली.

  • 08 Aug 2026 01:35 PM (IST)

    अमित शाहांच्या हस्ते NUCFDC च्या कार्यालयाचं उद्घाटन

    अर्बन बॅंकिंग क्षेत्राला आम्ही विकसित करतोय… बँकिंग सेवा आता आधुनिक होणार. अम्ब्रेला संस्थानमुळे अर्बन बँकिंग विकसित होणार. 100 वर्षांपर्यंत हेच कार्यालय शेअर बाजाराचा कणा राहणार. मोदींच्या नेतृत्वात डिजिटल व्यवहार आणखी वाढले… असं वक्तव्य देखील अमित शाह यांनी केलं आहे.

  • 08 Aug 2026 01:23 PM (IST)

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने प्रचंड घेतली मोठी उसळी

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने प्रचंड मोठी उसळी घेतली आहे. गेल्या 24 तासात सोन्याचा दरात 2 हजार 530 रूपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार 50 रूपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 55 हजार 015 तर चांदीचे दर 2 लाख 41 हजार 20 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या दरात 5 दिवसात 8 हजार रुपयांची वाढ तर चांदीच्या दरात 13 हजार रूपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडी तसेच फेडरल बँकेच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झाल्याचं सराफ व्यवसायिकांनी माहिती दिली आहे.  दागिन्यांच्या दरात वाढ होताच जुने दागिने मोडून नवे दागिने करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणं आहे.

  • 08 Aug 2026 01:08 PM (IST)

    जळगावातील तापी नदीच्या पात्रालागत खोल दरीत कार कोसळली

    जळगावातील विदगाव येथील तापी नदीच्या पात्रालागत खोल दरीत कार कोसळली आहे. या अपघातात कारमधील तीन ते चार जण जखमी झाले आहेत. झोप लागल्याने चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातामुळे पुलावरील संरक्षक भिंतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात झालेली कार क्रेन मशीनच्या सहाय्याने खोल दरीतून बाहेर काढण्यात आली आहे.

  • 08 Aug 2026 12:55 PM (IST)

    पुण्यात आढळले डेंग्यूचे ६७१ संशयित रुग्ण

    पुण्यात डेंग्यूचे ६७१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जुलै अखेर २७ जणांना लागण झाली आहे. तर चिकनगुनियाचेही ७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. यावरून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे

  • 08 Aug 2026 12:44 PM (IST)

    खासदार धनंजय महाडिक सहकुटुंब सतेज पाटलांच्या भेटीला

    पद्मश्री डॉक्टर डी. वाय. पाटील यांच्या निधनानंतर आज खासदार धनंजय महाडिक आणि त्यांची पत्नी अरुंधती महाडिक यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. गेली अनेक वर्षांचा राजकीय वैर विसरून खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली.

  • 08 Aug 2026 12:33 PM (IST)

    संविधानाप्रमाणे निकाल द्यावा, उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा व्यक्त

    उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली. शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे मी भाष्य करणा आहे. संविधानाप्रमाणे निकाल द्यावा, अशी अपेक्षा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 08 Aug 2026 12:23 PM (IST)

    शरद पवार गटाचे खासदार PM नरेंद्र मोदींना भेटणार

    दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे.  शरद पवार गटाचे खासदार सोमवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे. त्यांच्या भेटीचे कारण समजू शकलं नाही.

  • 08 Aug 2026 12:12 PM (IST)

    नवी मुंबईतील शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी

    नवी मुंबईतील एका शाळेला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला. काल सकाळी 11 वाजता हा मेल आला. त्यांनी 15 ऑगस्टला शाळेला उडवून देण्याची धमकी दिसली. परंतु मेल फेक असल्याची माहिती समोर आली आहे. मेल कुठून आला कुणी पाठवला, याचा तपास एमआरआय पोलिस करत आहेत. मात्र 15 ऑगस्ट च्या पार्श्वभूमीवर नवी पोलिस अलर्ट मोडवर आहेत.

  • 08 Aug 2026 11:55 AM (IST)

    प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहे- नरेंद्र मोदी

    नुकताच नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, सर्वांचे स्वप्न वेगळे आहे, सर्वांचा रस्ता वेगळा आहे.

  • 08 Aug 2026 11:55 AM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या दर्शनानंतर जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

    मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यापूर्वी जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा बावनकुळे …

  • 08 Aug 2026 11:40 AM (IST)

    सुनिल तटकरे यांच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलं

    त्यांच्या पक्षातील गोष्टी मला कशा माहित असणार सुनिल तटकरे यांच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलं सुनील तटकरे हे पहिल्यापासून भाजपचे आहेत असं अंजली दमानिया म्हंटल्या आहेत यावर ते अंजली दमानिया यांचं मत आहे असं जयंत पाटील म्हणाले.

  • 08 Aug 2026 11:30 AM (IST)

    एफडीएच्या कारवाईनंतर ग्राहकांमध्ये झालेली बदनामी टाळण्यासाठी अमरावतीतील प्रसिद्ध हॉटेल रोशनीची बॅनरबाजी

    हॉटेल रोशनी एक नवीन रूप लवकरच येत आहे; आम्ही आमच्या जागेला नवीन रुप(मेकओव्हर) देण्यासाठी एक छोटा ब्रेक घेत आहे.. गैरसोयीबद्दल क्षमस्व आम्ही लवकरच परत येऊ अशा आशयाच लावला हॉटेल रोशनीने पोस्टर…ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनतात त्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने हॉटेल रोशनीचा परवाना काही दिवसांसाठी अन्न व औषध प्रशासनाने केला आहे रद्द…

  • 08 Aug 2026 11:20 AM (IST)

    नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामांवरून साधू महंतांनी व्यक्त केली नाराजी

    कुंभमेळ्याच्या कामाबद्दल आम्ही उदासीन आहोत. मुख्यमंत्री यांना मी स्वतः सांगितले होते लक्ष घाला. आमच्या कुंभाची परिस्थिती दयनीय करून ठेवली आहे.  त्र्यंबकेश्वर आणि नाशिक मधील अधिकाऱ्यांच्या मध्ये समन्वय नाही हाल करून ठेवले नाशिकचे. मी भाजप समर्थक आहे मात्र आता मला खरं बोलल्याशिवाय गत्यंतर नाही. नाशिकचा कुंभमेळा फेल गेला आहे पूर्णतः फेल. मी सरकारची माफी मागून हे विधान करतो आहे

  • 08 Aug 2026 11:10 AM (IST)

    ठाणे जिल्ह्यातील यादी दीड लाख मतदार मृत

    ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 74 लाख 50 हजार 515 मतदारांचे विशेष सखोल पुनरिक्षण ( एस आय आर )मोहिमेला वेग आला असून मतदार गणना फॉर्म चे वितरण डिजिटायझेशन घर भेटली आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करण्यासाठी 17 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे….

  • 08 Aug 2026 10:54 AM (IST)

    दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ

    डिझेल, साखर, पॅकिंग साहित्य तसेच दूध खरेदी दरात झालेल्या वाढीमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री दरात 10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार असून हे नवे दर मंगळवार पासून लागू होणार आहेत.

  • 08 Aug 2026 10:48 AM (IST)

    दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना कुणी फोन केले याचा शोध घ्यावा

    दादांच्या मृत्यूनंतर आमदारांना कुणी फोन केले याचा शोध घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह उघड. शपथ कोण घेणार? मंत्री कोण होणार? याच्या चर्चा झाल्या असा दावा उमेश पाटील यांनी केला.

  • 08 Aug 2026 10:45 AM (IST)

    उमेश पाटील कुणालाच घाबरत नाही

    उमेश पाटील कुणालाच घाबरत नाही. कुणाला उद्देशून पोस्ट केली नाही उमेश पाटील यांचं सोशल मीडिया पोस्टवर स्पष्टीकरणं. दादांनंतर सुनेत्रा पवारांवर पक्षांची जबाबदारी आहे.

  • 08 Aug 2026 10:43 AM (IST)

    अमरावतीतील प्रसिद्ध हॉटेल रोशनीची बॅनरबाजी

    एफडीएच्या कारवाईनंतर ग्राहकांमध्ये झालेली बदनामी टाळण्यासाठी अमरावतीतील प्रसिद्ध हॉटेल रोशनीची बॅनरबाजी. हॉटेल रोशनी एक नवीन रूप लवकरच येत आहे; आम्ही आमच्या जागेला नवीन रुप(मेकओव्हर) देण्यासाठी एक छोटा ब्रेक घेत आहोत. गैरसोयीबद्दल क्षमस्व आम्ही लवकरच परत येऊ अशा आशयाच लावला हॉटेल रोशनीने पोस्टर.ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनतात त्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्याने हॉटेल रोशनीचा परवाना काही दिवसांसाठी अन्न व औषध प्रशासनाने केला आहे रद्द.

  • 08 Aug 2026 10:32 AM (IST)

    जरांगे पाटील यांनी भाषेवर नियंत्रण ठेवावे – पीपल्स रिपब्लिकन पक्ष

    जरांगे पाटलांकडून महायुतीच्या नेत्यांवर केलेल्या टिकेवर पीपल्स रिपब्लिकन पक्ष आक्रमक. महायुतीच्या नेत्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी आपली मर्यादा ओळखावी. मनोज जरांगे पाटलांकडून आंदोलनाच्या नावाखाली सुरू असलेले राजकारण बंद करावे. महायुती सरकार कायदेशीर तोडगा काढत असताना मनोज जरांगे पाटलांकडून मात्र वैयक्तिक द्वेषातून महायुतीच्या नेत्यांवर आरोप करीत आहे. जरांगे पाटील यांनी भाषेवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पक्ष चोख उत्तर देईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष अमित सोनवणे यांनी दिलाय.

  • 08 Aug 2026 09:59 AM (IST)

    पंतप्रधान मोदी पक्षपाती आहेत – संजय राऊत यांची टीका

    मोदी हे भाजपमधल्या एका गटाचे पंतप्रधान. ते गद्दारांना जमवतात, चहाला बोलावू आश्वासन देतात. पंतप्रधान मोदी पक्षपाती आहेत – संजय राऊतांनी बोचरी टीका केली.

  • 08 Aug 2026 09:49 AM (IST)

    तटकरे, प्रफुल पटेलांनी पवार कुटुंबासोबत रहायला हवं होतं- रुपाली- ठोंबरे पाटील

    सुनिल तटकरे मोठे नेते आहेत, पक्ष संघटनेसाठी दुसऱ्यांना संधी द्यावी. तटकरे, प्रफुल पटेलांनी पवार कुटुंबासोबत रहायला हवं होतं. सुनेत्रा पवारांसोबत बंधू म्हणून उभं रहायला हवं होतं – असं म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

  • 08 Aug 2026 09:42 AM (IST)

    राष्ट्रवादीत तटकरेंविरोधात सूर, प्रदेशाध्यक्षपद सोडा – रुपाली ठोंबरे यांची मागणी

    राष्ट्रवादीत तटकरेंविरोधात सूर उमटताना दिसत आहे. तटकरेंशी वाद नाही, पण त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडावं अशी मागणी रुपाली  ठोंबरे-पाटील यांनी केली आहे.

  • 08 Aug 2026 09:31 AM (IST)

    जळगावात पत्रकार असल्याची बतावणी करत तरुणाकडे 5 लाख मागणाऱ्या दोघांन अटक

    जळगावात पत्रकार असल्याची बतावणी करत तरुणाकड पाच लाखांची मागणी करणाऱ्या दोघांना एम आय डी सी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कोमल बापुराव पाटील व जितेंद्र रूपसिंग चौधरी अशी अटक करण्यात आलेल्या दोघा तोतया पत्रकारांची नावे आहेत.

    या प्रकरणी रफीक कुरेशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • 08 Aug 2026 09:17 AM (IST)

    नागपूरच्या 28वर्षीय महिलेची नोकरीच्या आमिषाने पोर्तुगालमध्ये विक्री

    नागपूरच्या २८ वर्षीय महिलेची नोकरीच्या आमिषाने थेट पोर्तुगालमध्ये विक्री करण्यात आल्याचे उघड झाले.  पुणे पोलिसांत आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  युरोपमध्ये दरमहा 1 लाख 50 हजार रुपयांच्या पगाराची नोकरी देण्याचं आमिष दसखवत पुण्यातील कन्सल्टन्सीने महिलेकडून तब्बल 11लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. कॅशिअरच्या नोकरीसाठी पोर्तुगालला पाठवलं होत. तिथे पोहोचताच आरोपींनी पासपोर्ट काढून घेत दोन दिवस खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप महिलेने केला आहे.

  • 08 Aug 2026 09:14 AM (IST)

    जळगाव – दहावीतील विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

    जळगावात जुन्या वादातून दहावीतील अल्पवयीन विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला   केला. जळगावातील अयोध्या नगरातील बी यू एन रायसोनी शाळेपासून १०० मीटरच्या अंतरावर परिसरात ही घटना घडली . हल्ल्यात जखमी असलेल्या जखमी विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. सकाळी ते तुळजाभवानी मातेच दर्शन घेऊन पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील. 10 वाजता उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावात मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. नाशिक महानगरपालिकेची आज महासभा असून खड्ड्यांच्या मुद्द्यावर वादळी होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातील खड्डे रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे घेतलेल्या बळी या मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होणार . रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असून लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. माटुंगा-मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक लोकल फेऱ्यांमध्ये बदल होईल. नागपुरातील अजनी केबल स्टेट उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला आता वेग आला असून 28 पैकी 8 सेगमेन्ट ची यशस्वी लॉंचिंग . उच्च क्षेमतेच्या केबल वर हा पूल उभारला जात आहे. यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांची अपडेट तुम्हाला इथं वाचता येईल.

Published On - Aug 08,2026 9:07 AM

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता